Monday, April 18, 2022

पृथ्वीराजबाबा व पालकमंत्र्यांनी केले एकमेकांच्या कार्याचे कौतुक...तर, श्रीनिवास पाटील म्हणाले... आम्ही तिघे म्हणजे महाआघाडी...काय आहे बातमी वाचा...


वेध माझा ऑनलाइन - येथील प्रीतिसंगम घाट येथे नुकतेेच पोलीस चौकीचे उदघाटन झाले यावेळी आमदार पृथ्वीराजबाबांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले तर...पालकमंत्र्यांनी पृथ्वीराज बाबांच्या कार्याची वाहवा केल्याचे पहायला मिळाले...खासदार श्रीनिवास पाटील हे याचवेळी आपल्या भाषणात आम्ही तिघे म्हणजे महाआघाडी आहोत... असे एका विषयाचा संदर्भ सांगताना म्हणाले...  एकूण च या पोलीस चौकीच्या उद्घाटन प्रसंगाचे औचित्य सााधून होणाऱ्या येथील पालिका निवडणुकीत हे दोन्ही आमदार महाआघाडी म्हणून एकत्र येणार असल्याचे संकेतच त्यानी यावेळी दिले अशी चर्चा सुरू झाली आहे

काल सोंमवारपासून येथील प्रीतिसंगम घाट परिसरात पोलीस चौकी कार्यरत झाली आहे... याठिकाणी पोलीस चौकी व्हावी अशी मागणी बरेच दिवस जोर धरून होती... पालिकेचे मुख्याधिकारी डाके यांनी या मागणीला उचलून धरत येथील पोलीस स्टेशनचे अधिकारी बी आर पाटील यांच्या सहकार्याने पोलीस चौकी तेथे उभी केली... त्याचे उदघाटन करण्यासाठी कराड दक्षिण, व उत्तरचे असे दोन्ही आमदार उपस्थित होते... खासदार श्रीनिवास पाटील यावेळी आवर्जून उपस्थित होते... औपचारिक उदघाटन झाल्यावर दोन्ही आमदारांनी आपल्या भाषणात एकमेकांवर एकमेकांच्या कार्याबद्दल कौतुक करत स्तुतीसुमने उधळली... माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पोलिसांच्या  राहण्याची सोय करण्याच्या ड्रीष्टिकोनातून बांधलेले येथील पोलिसांचे संकुल ही साकारलेली सुंदर संकल्पना असल्याचे पालकमंत्री यावेळी म्हणाले, तर  पालकमंत्र्यांनी विशेष प्रयत्नांनी पोलिसांसाठी मोठ्या प्रमाणात फोर व्हीलर गाड्यां उपलब्ध करून दिल्याने जिल्ह्यात पोलिसांना सर्वत्र उपलब्ध राहून कमी वेळात जास्त काम करणे सोपे जाईल असे सांगत पृथ्वीराज बाबांनी पालकमंत्र्यांचे कौतुक केले... तसेच इतर कामाचाही उडत उडत बोलता-बोलता या प्रत्येकाने पाढा वाचत एकूण आतापर्यंत केलेले काम लोकांपर्यंत पोचवले...याचवेळी बोलताना खासदार श्रीनिवास पाटील "संगम' या शब्दाच्या रेफरन्स ने आमच्या तिघांचा संगम आहे... आम्ही तिघे महाआघाडी आहोत असे सांगत... या उदघाटन प्रसंगी आम्ही भविष्यात होणाऱ्या निवडणुका एकत्र लढणार आहोत असेच एकप्रकारे सुचवले...या कार्यक्रमाला भाजप चे नगरसेवक कार्यकर्ते देखील आवर्जून उपस्थित होते... पत्रकारही हजर होते... याचमुळे सर्वांना हा मेसेज जावा या कारणाने खासदार पाटील यांनी यावेळी वरील संकेत दिले... तसेच पोलिसांना काही अडचण असेल तर आम्ही तिघे आहोत काहीही काम सांगा... असे म्हणत दोन आमदारांसाह आपली राजकीय "वीण' एकत्रपणे घट्ट असल्याचे विरोधकांसह सर्वांसमोरच एकप्रकारे त्यांनी उघड केले... 
येथील पालिका निवडणूक थोड्याच अंतरावर राहिली आहे... या निवडणुकीच्या अनुषंगाने आजपर्यंत केवळ आपला वापरच झाला आणि आपल्या दुफळीचा फायदा उठवला गेला अशी धारणा  कराड दक्षिण आणि उत्तरच्या दोन्ही आमदारांची झाल्याचे समजते... त्यामुळे यावेळच्या शहराच्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून ताकही फुंकून पिताना हे दोन्ही आमदार सध्या दिसत आहेत... म्हणूनच पालिकेच्या निवडणुकीत हे दोघे एकत्र येऊन ही निवडणूक लढतील असे राजकीय भाकीत व्यक्त होत आहे... तसे झाल्यास गटबाजी करणारा संपूर्ण विरोध थोपवण्यास मदत होणार आहे असे जाणकारांचे मत आहे...महत्वाचे म्हणजे या दोन आमदारांनी एकत्र यावे अशी लोकभावनाही आहे... त्यामुळेच प्रीतिसंगम घाटावरील पोलीस चौकीच्या उदघाटन प्रसंगाच्या निमित्ताने खासदार श्रीनिवास पाटील यांनी दक्षिण उत्तरच्या दोन्ही आमदारांची महाआघाडी शहराच्या होणाऱ्या निवडणुकीत एकत्रपणे लढणार असे एकप्रकारे सुचवले ! तर दोन्ही आमदारांनी एकमेकांच्या कार्याचे कौतुक करत त्याला दुजोराही दिला...! या दोन्ही आमदारांचा एकमेकांबरोबर कार्यक्रम घेण्याचा सपाटा आणि त्यातून या दोघांचा समन्वय खूपच वाढला आहे...आणि हेच समोर बसलेल्या विरोधकासहींत पत्रकारांना देखील दाखवण्याचा काल प्रयत्न झाला...त्यासाठी प्रीतिसंगम घाट येथील पोलीस चौकीच्या उदघाटनाचे निमित्त निवडले गेले इतकंच ! अशी चर्चा आहे...

No comments:

Post a Comment