सन 1994 साली अकोला येथे झालेल्या स्पर्धेत आटके गावचे सुपूत्र स्व. संजय पाटील यांनी महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकून सातारा जिल्हय़ाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला होता. यावर्षीची स्पर्धा सातारच्या मातीत होत आहे. याचा मनापासून आनंद होत आहे. लाल मातीच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आणि बंधूंच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी महाराष्ट्र केसरी किताब पटकावून दिमाखदार कामगिरी करणाऱया मल्लाला प्रोत्साहन देण्यासाठी एक लाख रूपये देणार असल्याचे पैलवान धनाजी पाटील यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment