वेध माझा ऑनलाइन - राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे. धनंजय मुंडे यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. धनंजय मुंडे यांनी प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी धनंजय मुंडे यांच्या छातीत दुखायला लागले होते. त्यामुळे त्यांना तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तपासणी केली असता धनंजय मुंडे यांना ह्रदयविकाराचा सौम्य धक्का बसला असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना तातडीने अतिदक्षता विभागात हलवण्यात आले आहे. त्यांच्यासोबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हजर होते.
No comments:
Post a Comment