वेध माझा ऑनलाइन - मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा पहिला लता मंगेशकर पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला. मात्र, या कार्यक्रमाला ह्रदयनाथ मंगेशकर गैरहजर होते. या कार्यक्रमाला इतर
मंगेशकर कुटुंबीय सदस्य हजर होते.
मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा पहिला लता मंगेशकर पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला. आज हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला यावेळी व्यासपीठावर आशा भोसले, मिनाताई खाडीलकर, आदिनाथ मंगेशकर उपस्थित होते. यांच्या हस्तेच हा पुरस्कार पंतप्रधान मोदींना प्रदान करण्यात आला.
दरम्यान, या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गैरहजर राहिले. राज्य सरकारच्या वतीने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सुभाष देसाई हजर होते. तर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील कार्यक्रमाला हजर होते.
No comments:
Post a Comment