Wednesday, November 9, 2022

राज्यातील सात हजार 751 ग्रामपंचायतच्या निवडणुका जाहीर ; 18 डिसेंबरला मतदान तर 20 डिसेंबरला होणार मतमोजणी

वेध माझा ऑनलाइन - राज्यातील सात हजार 751 ग्रामपंचायतच्या निवडणुका  आज (ता. ९) अखेर जाहीर करण्यात आल्या आहेत. या ग्रामपंचायतीसाठी 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीबाबतची नोटीस प्रसिद्ध केली आहे. अर्ज भरण्यास 28 नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे. दोन डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. उमेदवारी अर्ज छाननी पाच डिसेंबरला होणार आहे.
अर्ज मागे घेण्याची तारीख साथ डिसेंबर आहे. तर त्याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. यामुळे आता पुन्हा एकदा राज्यातील सात हजार 751 गावांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे. 

No comments:

Post a Comment