वेध माझा ऑनलाइन - किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानच्या कबरी भोवती असणारे सर्व अनाधिकृत बांधकाम आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने हजारो पोलिसांच्या फौज फाट्याच्या बंदोबस्तात अत्याधुनिक मशनरीने जमीनदोस्त करण्यात आले. पहाटेपासूनच सर्व पोलीस यंत्रणा व प्रशासकीय यंत्रणा किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखान आणि सय्यद बंडाच्या कबरीच्या अवतीभवती असणारे सर्व अनाधिकृत बांधकाम पाडण्यासाठी हजर होती. त्याठिकाणी पायथ्याला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
दरम्यान, आज सातारा जिल्ह्यात 144 कलम लागू करून जागोजागी नाकाबंदी देखील केली गेली. त्या परिसरातील असणारे सर्व अनाधिकृत बांधकाम जमीन दोस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. पोकलॅंड, क्रेन जेसीबी, ट्रॅक्टर सर्व घटनास्थळी दाखल होऊन नियोजित आपापल्या दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडत होते. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आणि जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, डीवायएसपी डॉ. शितल जानवे- खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि पुणे वरून आलेले सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी डोळ्यात तेल घालून पहारा देत होते. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेत वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत असणारे सर्व अनाधिकृत बांधकाम आज अखेर जमीनदोस्त करण्यात आले
No comments:
Post a Comment