गजबजलेल्या मलकापूर फाट्यापासून शहरात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर सतत वाहनांची वर्दळ असते रस्त्याच्या दुतर्फा दुकाने असल्याने ग्राहकांचीही चांगलीच वर्दळ असते या रस्त्यावर सध्या ग्राहक दोन्ही बाजूला गाड्या पार्किंग करतात यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या भेडसावते मलकापूर मध्ये सम विषम पार्किंगची घोषणा करण्यात आलेली आहे
मात्र ती अजूनही कागदावरच राहिलेली दिसते रस्त्याच्या दोन्हीकडे पार्किंग होत असल्यामुळे वाहनधारकांसह नागरिक व शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीतून कसरत करत जाण्याची वेळ येते.. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांचे पार्किंग झाल्याने मुख्य रस्ता अरुंद होतो यामुळे सर्वांनाच नाहक त्रास सहन करावा लागतो यातच फळांचे गाडे तसेच छोट्या विक्रेत्यांची भर असल्यामुळे या रस्त्यावर वरदळीचा चांगलाच ताण येतो पालिका प्रशासनाने सम विषम पार्किंग अंमलबजावणीसाठी दुतर्फा पट्टेही मारले होते मात्र अंमलबजावणी कागदावरच राहिल्याने पट्टे मुजून गेले आहेत वाहतूक कोंडीचा प्रश्न विचारात घेऊन नगरपालिकेने आता तरी जागे होऊन सम विषम पार्किंग करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे
No comments:
Post a Comment