Monday, November 7, 2022

कृष्णा पुलावरून उडी घेऊन आत्महत्या करणाऱ्या त्या विद्यार्थ्यांचा मृतदेह तीन दिवसानंतर आज सापडला ; वाचा सविस्तर...


वेध माझा ऑनलाइन - 
कृष्णा पुलावरून उडी घेऊन आत्महत्या करणाऱ्या त्या विद्यार्थ्यांचा मृतदेह अखेर तीन दिवसानंतर आज सापडला  या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांने कृष्णा नदीत तीन दिवसापूर्वी उडी घेऊन आत्महत्या केली होती आज त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही

कराडच्या कृष्णा पुलावरून तीन दिवसापूर्वी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उडी घेऊन आत्महत्या केली होती त्या विद्यार्थ्यांचा मृतदेह आज तिसऱ्या दिवशी कृष्णा नदी पात्रात मिळून आला आहे गेली तीन दिवस मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते सामाजिक कार्यकर्ते साबीर मिया मुल्ला व त्यांच्या मित्र मंडळाच्या साहाय्याने तसेच सावळ्या टीमच्या वतीने आज पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली सदर विद्यार्थ्यांने ज्या ठिकाणी उडी मारली त्या ठिकाणापासून काही अंतरावर संबंधित विद्यार्थ्यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला साहिल अनवर मुल्ला वय 17 (राहणार मंगळवार पेठ, कराड ) असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो कराडच्या आयटीआय कॉलेजमध्ये शिकत होता ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी साहिल घरातून दुपारी निघून गेला होता असे समजते त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही

No comments:

Post a Comment