वेध माझा ऑनलाइन - राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांना लास्ट वार्निंग दिली होती. या वार्निंगनंतर अब्दुल सत्तार हे चांगलेच अँलर्ट झाले असून त्यांनी आता अधिकचे राजकिय भाष्य करण्यास नकार दिला आहे. आज (दि.10) संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात सत्तार यांनी मराठवाड्यातील शेतीच्या नुकसानी संदर्भात बैठक घेतली. या बैठकीत नंतर त्यांनी आज मला राजकीय प्रश्न विचारू नका असं पत्रकारांना सांगितलं. पत्रकारांनी अधिकच हट्ट धरल्याने सत्तार यांनी राऊत यांच्या जामीनाबाबत मात्र भाष्य केलं.
यावेळी सत्तार म्हणाले की, राऊत यांना माझ्या शुभेच्छा, पण ते वाघ आहे की नाही हे मला माहित नाही. न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करायला हवा असं सांगत मी अधिकच बोललो तर तुम्ही मला अडकवाल अशी आठवण करून द्यायलाही सत्तार विसरले नाहीत. अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात मराठवाडयातील पीक नुकसान आढावा बैठक घेतली यावेळी त्यांनी या बैठकी व्यतरिक्त अधिकचे बोलणे टाळले. मात्र... संजय राऊत वाघ आहे का नाही...हे मला माहित नाही... असे त्यांच्या स्टाईलने बोलून त्यांनी पुन्हा शिवसेनेला डिवचले खरे ! पण... त्यामुळे आता नव्या चर्चेला पुन्हा तोंड फुटणार का? अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.
No comments:
Post a Comment