वेध माझा ऑनलाइन - महामार्गावरील टोल नाक्यांमध्ये केल्या जाणाऱ्या टोल वसुलीबाबत सर्वजण नाराजी व्यक्त करतात. कारण टोलची भरमसाठ रक्कम द्यावी लागते शिवाय ती रक्कम देताना पैशावरुन, चिल्लरवरुन वादही होतात. मात्र, आता टोलवरून जाताना पैसे भरावे लागणार नाहीत. कारण टोल टॅक्स वसूल करण्यासाठी FASTag ऐवजी दुसऱ्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. टोल टॅक्स नियमात बदल करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच केली आहे.
मंत्री नितीन गडकरी यांनी टोल टॅक्सच्या नियमात बदल करण्यात आल्याबाबत माहिती देताना म्हंटले आहे की, महामार्गावरुन दररोज प्रवास करणाऱ्यांना टोल भरावा लागतो. आता केंद्र सरकार टॅक्सच्या नियमात बदल करणार आहे. टोल टॅक्स संदर्भात एक विधेयक मांडले जाणार आहे. आगामी काळात टोल टॅक्स वसूल करण्यासाठी FASTag ऐवजी दुसऱ्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. टोल टॅक्स वसूलीतील काही पद्धत बदलण्यात येणार आहे.
या सर्वासाठी कायद्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. टोल टॅक्स न भरणाऱ्या वाहनधारकांना शिक्षेची कोणतीही तरतूद करण्यात आली नाही. त्यामुळे नवीन कायदेशीर प्रस्तावानुसार, टोल टॅक्स थेट बँक खात्यातून कापला जाणार आहे. त्यामुळे आता टोल नाक्यावर तास न तास थांबण्याची आवश्यकता भासणार नाही. टोलची रक्कम ही थेट बँक खात्यातून वळती केली जाणार आहे.
‘2019 मध्ये आम्ही एक नियम केला होता की, कार कंपनीने फिट केलेल्या नंबर प्लेटसह येतील. त्यामुळे गेल्या 4 वर्षांत आलेल्या वाहनांवर वेगवेगळ्या नंबरप्लेट असतात. 2024 पूर्वी देशात 26 मोठे महामार्ग तयार होतील आणि भारत रस्त्यांच्या बाबतीत अमेरिकेच्या बरोबरीने असेल. यासोबतच आगामी काळात टोल कर वसुलीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावरही भर देण्यात येणार असल्याचे मंत्री गडकरी यांनी सांगितले
No comments:
Post a Comment