Monday, November 7, 2022

सुळे यांच्याबद्दल अपशब्द काढल्याने राष्ट्रवादी आक्रमक ; मंत्री अब्दुल सत्तारना दिसेल तिथे झोडपणार ...

वेध माझा ऑनलाइन - मंत्री अब्दुल सत्तार यांनी 24 तासाच्या आत माफी नाही मागितली तर दिसेल तिथे झोडपून काढू, असा इशारा राष्ट्रवादीनं दिला आहे. यांना 50 खोक्यांची मस्ती आली आहे, यांची मस्ती उतरवली जाईल, असं राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी म्हटलं आहे. 

सत्तारांनी सुप्रिया सुळेंबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. दहा पक्ष बदलणारे सत्तार हे सत्तार आहेत की सुतार आहेत. अब्दुल सत्तारांना सत्तेची मस्ती आलीय, ही मस्ती राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिरवेल. राज्यभर सत्तारांच्या पुतळ्यांना जोडे मारुन त्यांच्या पुतळ्याचं दहन राष्ट्रवादी युवक काँग्रेस करणार आहे. सत्तारांना धडा शिकवल्याशिवाय रायुकाँ स्वस्थ बसणार नाही, असं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांनी म्हटलं आहे. 

काय म्हणाले सत्तार 
सत्तार म्हणाले की, आम्हाला खोके म्हणणारी लोकं भिकार......... असल्याचं सत्तार म्हणाले. तर सुप्रिया सुळे यांच्या बाबतोतदेखील सत्तार यांनी असाच उल्लेख केला.... विशेष म्हणजे एकदा नाही तर दोनवेळा सत्तार यांनी हे आक्षेपार्ह विधान केले. त्यामुळे आता राज्यभरातून त्यांच्या या विधानाचा निषेध केला जात आहे.



 

No comments:

Post a Comment