वेध माझा ऑनलाइन - मॉर्निंग वॉक करणाऱ्या वयोवृद्धांच्या गळ्यातील चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना कराड पोलिसांनी जेरबंद केलं आहे त्यांच्याकडून तीन लाख दहा हजारांचा मुद्देमाल केला जप्त केला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे या त्वरित झालेल्या कारवाई बद्दल पोलिसांचे अभिनंदन होत आहे
मॉर्निंग वॉकला गेलेल्या वयोवृधांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसका मारून घेऊन जाणाऱ्या शहरातीलच दोन चोरट्यांना जेरबंद करण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे अनिकेत राहुल वाडीकर सोमवार पेठ व नागेश तायाप्पा गायकवाड मंगळवार पेठ कराड अशी दोघांची नावे आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कराड शहरात 15 ऑक्टोबर रोजी पहाटे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या वयोवृद्ध इसमाला रस्त्यात अडवून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसका मारून चोरी झाली होती यासंदर्भात कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता दरम्यान काही सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आणि मोटरसायकलच्या वर्णनावरून गुन्हे प्रकटीकरण शाखेने शोध सुरू केला मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी दोघांना मोटरसायकलसह जेरबंद केले संबंधित आरोपींनी गुन्हा कबूल केला पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांनी अत्यंत कौशल्य पूर्ण तपास करून दोन्ही गुन्ह्यातील चोरीला गेलेले साडेचार तोळ्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेले मोटरसायकल असा एकूण तीन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे अधिक तपास डांगे करीत आहेत
No comments:
Post a Comment