वेध माझा ऑनलाइन - राष्ट्रवादी एक नंबर का आमचा पक्ष एक नंबर हे जनता ठरवत असते. आमचा लोकांना उद्योग आणि सुविधा देण्यावर भर आहे. त्यामुळे याचा फायदा लोकांना होत आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. करोनामध्ये मृत्यू झालेल्या लोकांच्या वारसांना कर्जमाफी करण्याचा निर्णय आधीच्या सरकारनं घेतला होता. मात्र, पैसे आम्ही भागवले आहेत.असं एकनाथ शिंदे यांनी आज बोलताना सांगितले.
ते म्हणाले, आम्हाला कोणाला हात दाखवण्याची गरज नाही, आम्हाला तसली काही आवश्यकता नसून परिस्थिती बदलण्याची ताकद मनगटात असावी लागते. बाळासाहेबांनी आणि दिघे साहेबांनी आम्हाला बळ दिलं असून ३० जूनला आम्ही ते दाखवून दिलंय. आमच्या आत्मविश्वासावर बोलण्याचा कोणाला अधिकार नाही.जे लोक कमजोर असतात ते जोतिषाकडे जातात अघोरी विद्येचा आधार घेतात त्यांचा शेवट अघोरी होतो असंही ते एका प्रश्नावर बोलताना म्हणाले
No comments:
Post a Comment