वेध माझा ऑनलाइन - शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे उपनेत्या सुषमा अंधारे यांनी डोकेदुखी वाढवल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने त्यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांना त्यांच्या गटात समाविष्ट करून घेतले आहे. तेव्हा एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांची सुषमा अंधारे आणि त्यांच्यात झालेल्या घटस्फोटाचे कारण सांगितले आहे. सुषमा अंधारेंनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाण्याचे ठरवल्यानंतर आम्ही विभक्त झालो, असे त्यांनी सांगितले. तसेच येत्या चार दिवसात मोठा गौप्यस्फोट करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
वैजनाथ वाघमारेंनी चार दिवसात पत्रकार परिषद घेत सुषमा अंधारेंविषयी सगळं सविस्तरपणे सांगणार असल्याचा इशारा देत, ते म्हणाले, “चार दिवस सुषमा अंधारेंनी एका मंत्र्याला अश्लील आणि अश्लाघ्य पद्धतीने त्रास दिला. त्याच गावात जाऊन पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे काय चीज आहे, कोठून आल्या, काय झालं, कोणी आणलं हे सगळं सविस्तरपणे मांडणार आहे.”
No comments:
Post a Comment