वेध माझा ऑनलाइन - आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रशासकीय इमारत, शासकीय विश्रामगृह याचे लोकार्पण होत आहे. राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे वित्तमंत्री असताना देखील त्यांना कार्यक्रमास निमंत्रण देण्यात आलेले नाही. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री,आ. बाळासाहेब पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कराड येथे यशवंतराव चव्हाण स्मृतीस्थळी आ. बाळासाहेब पाटील यांनी जाऊन अभिवादन केले यावेळी बाळासाहेब पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले, महाविकास आघाडी सरकार असताना किंवा त्या अगोदर असलेल्या सरकारमध्ये या दोन्ही वास्तूंना निधी मिळाला. तेव्हा अजित पवार हे उपमुख्यमंत्री वित्तमंत्री होते. त्यावेळेच्या सरकारने या वास्तूंना निधी दिला, त्यामुळे कराड शहराच्या परिसरात विकासात योगदान देणाऱ्या लोकांना या कार्यक्रमाचे निमंत्रित करणे गरजेचे होते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रण नसल्याची गोष्ट आम्हाला निमंत्रण पत्रिका वरून लक्षात आली आहे. प्रशासनाने मुख्यमंत्र्यांच्या लक्षात ही गोष्ट आणून द्यायला पाहिजे होती. ज्या- ज्या लोकांनी या विकास कामांमध्ये योगदान दिले त्यांना निमंत्रण देणे गरजेचे होते, असे पाटील यांनी म्हंटले.
No comments:
Post a Comment