वेध माझा ऑनलाइन - काँग्रेसकडून देगलूर येथे दाखल होणाऱ्या भारत जोडो यात्रेसाठी येथील कार्यकर्ते रवाना झाले आहेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या कन्याकुमारी ते काश्मीर या भारत जोडो यात्रेचे आज सायंकाळी महाराष्ट्र राज्यात स्वागत होणार आहे. या यात्रेत सहभागी होण्यासाठी कराड व पाटण तालुक्यातील कार्यकर्ते सकाळी रवाना झाले.
या कार्यकर्त्यांना इंद्रजित चव्हाण, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड. उदयसिंह पाटील -उंडाळकर, प्रदेश प्रतिनिधी झाकीर पठाण, कराड दक्षिणच्या महिला अध्यक्षा विद्याताई थोरवडे, मलकापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा निलम येडगे, गिताजंली थोरात, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, शंकरराव खबाले, निवासराव थोरात, नगरसेवक राजेंद्र यादव (आबा) अप्पा माने इंद्रजीत गुजर या काँग्रेसच्या प्रमुख नेत्याच्या उपस्थितित झेंडा दाखवून रवाना करण्यात आले
No comments:
Post a Comment