वेध माझा ऑनलाइन - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राहिलेले आमदार, खासदार पक्षातून फुटू नये म्हणून राष्ट्रवादी जरी प्रयत्नशील असली तरी राष्ट्रवादी नेहमी सत्तेत राहिली आहे आणि हे लोक सत्तेशिवाय राहूच शकत नाहीत. त्यामुळे थोड्याच दिवसात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मोठी फुट पडणार आहे. त्यांचे अनेक खासदार-आमदार, भाजप आणि शिंदे गटात येणार आहेत,असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कराडात केला.बावनकुळे हे कऱ्हाडच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे
दरम्यान, सातारा जिल्ह्यत येऊन त्यांनी हे स्टेटमेंट केल्याने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या गळाला राष्ट्रवादीचा कोण नेता लागलाय का? या चर्चांना यानिमित्ताने उधाण आले आहे... एकीकडे स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका कधीही होतील अशी परिस्थिती असताना जिल्ह्यात येऊन आ. बावनकुळे यांनी केलेला गौप्यस्फोट याचा अर्थाअर्थी काही सम्बन्ध असावा का? हे कळणे महत्वाचे आहे...
राज्याचे राष्ट्रवादीचे अनेक दिगग्ज नेते भाजपमध्ये गेले आहेत...विखे-पाटील असतील...मोहिते- पाटील असतील...राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीही भाजप मध्ये जाणार अशी चर्चा होती...स्वतः अजितदादा राष्ट्रवादीवर नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत...त्यांचा पहाटेचा शपथविधी आजही राज्यात चर्चेचा विषय असतो...सातारा जिल्ह्यात खा उदयनराजे आणि आ शिवेंद्रसिंहराजे राष्ट्रवादी सोडून यापूर्वीच भाजप मध्ये गेले आहेत...स्वतः जयकुमार गोरे काँग्रेसला रामराम करून भाजपवासी झाल्याचे सर्वानाच माहीत आहे फलटणच्या रामराजेंचीही भाजपमध्ये जाणार अशी जोरदार चर्चा होती... आजही असते...
दुसरीकडे, जिल्हाध्यक्ष आ जयकुमार गोरे यांनी भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्या नंतर जिल्ह्यातील अनेक राष्ट्रवादी व काँग्रेस चे आजी-माजी नेते भाजप मध्ये दिसतील असे विधान त्यांनी केले होते... त्यानंतर त्यांनी एकेकाळचे काँग्रेसचे कराड उत्तरचे ताकदीचे नेते धैर्यशील कदम यांना भाजपमध्ये आणले...जिल्ह्यत आजही आ. गोरे यांच्या अनेक नेत्यांबरोबर भाजप प्रवेशासंदर्भात चर्चा / बैठका होत असल्याच्या बातम्या येत आहेत...अगदी कराडच्या अनेक आजी-माजी नगरसेवकाशीही ते याबाबत संपर्कात आहेत अशी माहिती आहे...म्हणजेच आ गोरे यांचे जिल्ह्याला भाजपमय करण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत हेच स्पष्ट दिसते... दुसरीकडे भाजप व राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी छुपी युती करून वेळप्रसंगी त्या-त्या ठिकाणच्या निवडणुका लढवल्या असल्याचे संपुर्ण जिल्हा जाणतो...हे चित्र यापुढही जिल्ह्यतील काही ग्रामीण निवडणुकीमध्ये दिसेल अशी शक्यताही आहे... असे असताना, आ.बावनकुळे यांनी काल याच जिल्ह्यत येऊन राष्ट्रवादी बद्दल असा गौप्यस्फोट करणे हा योगायोग समाजायचा की...जिल्ह्यातील आजी-माजी नेत्यांशी बावनकुळे जयकुमार गोरेंच्या माध्यमातून संपर्क ठेवून आहेत असे समजायचे ? हेच कळणे गरजेचे आहे...बावनकुळे हे जरी राज्याच्या भविष्यतील राजकारणाचे राष्ट्रवादीबद्दल भाकीत करत असले तरी ते या जिल्ह्यात येऊन असे स्टेटमेंट करतात म्हणजे काहीतरी या विधानाचा जिल्ह्याच्या राष्ट्रवादीशी सम्बन्ध असावा का ? अशी शंका यायला वाव आहे ? अशी सध्या चर्चा आहे
No comments:
Post a Comment