वेध माझा ऑनलाइन - छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे नेते शुधांशू त्रिवेदी यांनी वादग्रस्त वक्तव्य केली. त्यांच्या वक्तव्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. याचे पडसाद ठिकठिकाणी उमटत आहे. कराडातही काँग्रेससह सामाजिक संघटनेचे नेते व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत राज्यपालांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडेमारो आंदोलन केले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी सर्वपक्षीय, संघटनेच्या नेत्यांकडून करण्यात आली.
कराड येथील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर सर्व संघटनेचे पदाधिकारी आज एकत्र आले. यावेळी त्यांनी सुरुवातीला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित महिला कार्यकर्त्यांनी राज्यपालांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारले. त्यानंतर त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी सर्वपक्षीय, संघटनेच्या नेत्यांकडून करण्यात आली.
No comments:
Post a Comment