वेध माझा ऑनलाइन - आज कराडात मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणाऱ्या प्रशासकीय कार्यक्रमांना राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले... कराडमध्ये काही शासकीय कार्यक्रम आहेत तर काही राजकीय आहेत. हा शासनाचा प्रश्न आहे कि तो कार्यक्रम कसा घ्यायचा आणि कुणाला बोलवायचे हे त्यांनी ठरवायचं आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून हा कार्यक्रम ठरवला गेला आहे असे चव्हाण यांनी म्हंटले आहे.
कराड येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रीतिसंगम याठिकाणी आज त्यांच्या स्मृतीस्थळावर काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त म्हणाले की, अजित पवार यांना काही शासकीय कार्यक्रमाचे निमंत्रण दिले गेले नाही. मुख्यमंत्र्यांचे आजचे काही कार्यक्रम हे शासकीय आहेत तर काही राजकीय आहेत. शासकीय कार्यक्रमांचे नियोजन हे मुख्यमंत्री कार्यालयाकडून केले जाते.
No comments:
Post a Comment