वेध माझा ऑनलाईन - महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरचे नाटक अजून कोणीही विसरले नसताना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या आमदारांना घेऊन पुन्हा गुवाहाटी येथे जाणार आहेत. गुवाहाटीतील एका हॉटेलमध्येच राज्यातील सत्तानाट्य घडले होते. येत्या 21 नोव्हेंबर रोजी पुन्हा सर्व आमदार, एकनाथ शिंदेंसह गुवाहाटीला जाणार असल्याचे निश्चित झाले आहे.
सत्तांतराच्या काळात मुख्यमंत्री शिंदेनी कामाख्या देवीच्या दर्शनाला जाऊन मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा दर्शनाला येईन, असा नवस देवीला बोलला होता. त्यामुळेच मुख्यमंत्री सर्व खासदार आमदार आणि पदाधिकाऱ्यांना घेऊन कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहे. हा एक दिवसाचा हा दौरा असेल. दौऱ्यासाठी पूर्वतयारी सुरू करण्यात आली असून, सर्वांना याबद्दल सूचना देण्यात आल्या आहेत.
No comments:
Post a Comment