वेध माझा ऑनलाइन - खोटे सोन्याचे बिस्किट देऊन खरे सोन्याचे दागिने केले लंपास केल्याची धक्कादायक घटना ढेबेवाडी येथील आठवडा बाजारात घडली भामट्यांकडून महिलेला गंडा घालून त्या महिलेची सोन्याची बोरमाळ या भामट्यांनी लंपास केली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ढेबेवाडी येथे आठवडा बाजारासाठी आलेल्या महिलेला भामट्याने सोन्याचे खोटे बिस्किट देऊन त्या बदल्यात तिच्याकडील सोन्याची बोरमाळ घेऊन पोबारा केल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली रात्री उशिरा या गुन्ह्याची ढेबेवाडी पोलीस ठाण्यात नोंद झाली एखाद्या चित्रपटातील कथानकाला शोभेल अशा पद्धतीने तिघा भामट्यानी हा डल्ला मारल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.. सुतारवाडी येथील संबंधित पंचावन्न वर्षीय महिला मंगळवारी आठवडा बाजारात आली होती यावेळी बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेजवळ चकाकणारी वस्तू पडलेली दिसून आली.. सदर वस्तू एका व्यक्तीने उचलून तो निघून गेला त्यानंतर लगेच दुसरी व्यक्ती ती वस्तू शोधण्याचा बहाना करून निघून गेली त्यावेळी बँकेच्या पायरीजवळ असलेल्या व्यक्तीने महिलेजवळ जाऊन आपण त्या माणसाला शोधूया असे म्हटले दोघेही शोध घेत थोड्या अंतरावर गेल्यावर ती व्यक्ती दुकानातून बाहेर आल्याचे पाहिल्यानंतर महिलेसोबत आलेल्या व्यक्तीने वस्तू दाखवण्यास सांगितले त्यावर ते तिघेही पाटणकडे जाणाऱ्या रोडवर आले यावेळी त्याने टेम्पोच्या आडोशाला जाऊन चकाकणारी दोन बिस्किटे दाखवत दोन लाख द्या व वस्तू घ्या असे सांगितले त्यावर दुसऱ्या व्यक्तीने स्वतःच्या बोटातील अंगठी देऊन एक बिस्कीट घेतले आणि मावशी तुमच्याही गळ्यातील बोरमाळ द्या तुम्हालाही सोन्याची बिस्किट मिळेल असे सांगून त्या महिलेलाही बोरमाळ देऊन बिस्कीट घ्यायला लावले त्यानंतर ते निघून गेले संबंधित महिला ती वस्तू घेऊन घरी आल्यानंतर ती वस्तू बनावट असल्याचे लक्षात आले याबाबत ढेबेवाडी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार देण्यात आली.. १२ ग्रॅम वजनाची 108 मण्यांची सोन्याची बोरमाळ चोरीला गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांनी तातडीने तपासाची चक्रे गतिमान करत त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी हाती घेतली आणि लवकरच या वप्रकरणाचा पडदा फाश करू असे सांगितले
No comments:
Post a Comment