Wednesday, November 9, 2022

वेध माझा ऑनलाइन - शहरातील शनिवार पेठ येथील पवार कॉलनीत आज पुन्हा भटक्या कुत्र्यांची दहशत पहायला मिळाली या ठिकाणी भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे शहरातील वाखान परिसरातील एका लहान मुलांवर कुत्र्यांनी हल्ला केल्याने त्या मुलाचा त्यात मृत्यू झाला होता ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा कुत्र्यांनी पवार कॉलनीतील एका छोट्या मुलावर असाच हल्ला केला आहे. एक-दोन नाही तर अशा अद्याप 4 घटना घडल्या आहेत ही शहरातील 5 वी घटना आहे अनेकवेळा तक्रारी करून अद्यापही हा त्रास लोकांना होत आहेच... मग आता करायचे काय? हाच प्रश्न कुत्र्यांची दहशत असणाऱ्या सर्वच रहिवासी कॉलनीतील लोकांसमोर आहे

नगरपालिकेतील प्रशासनाला किंवा त्या-त्या भागात कार्यरत असणाऱ्या आजी-माजी-तसेच इच्छुक नगरसेवकाना याबाबत अनेकदा सांगूनही काही उपयोग होत नाही अशी भावना या प्रत्येक कॉलनीतील लोकांची आता झाल्याचे समजते त्यामुळे या प्रश्नावर नेमकं आता करायचं काय ? आणि हा प्रश्न सोडवणार कोण? तसेच लहान मुलांना चावा घेतल्याचं...ही मुलं जायबंदी झाल्याचं...फक्त डोळ्यांनी पहातच बसायचं का ? असे अनेक प्रश्न सध्या शहरासमोर आहेत...या प्रश्नाचे कायमचे सोल्युशन मिळणे शहराच्या ड्रीष्टीने आता मात्र गरजेचे आहे

दुसऱ्या बाजूचा विचार केल्यास जशी नगरपालिकेची किंवा नगरसेवकांच्या कडून लोक अपेक्षा करतात तशी लोकांचीही काही कर्तव्य आहेत आपण सगळे खरकटे उष्ठे अन्न उघड्यावरती टाकतो त्यामुळे ही भटकी कुत्रे तेथे जमा होतात व तिथेच आसपास आपला निवारा शोधतात व तेथे राहून त्रास देत*

No comments:

Post a Comment