वेध माझा ऑनलाइन - राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही याचा प्रत्यय औरंगाबादमध्येआला.औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे हे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या फेस्टिव्हलला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे उपस्थित होते. त्यावेळी जलील देखील त्यांच्यासोबत होते. या दोघांनी क्रिकेट सामन्याचा आनंद देखील लुटला.
काही महिन्यांपूर्वी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी शिवसेनेत बंड केले. यानंतर शिवसेनेतील आमदारांनी आणि खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. यानंतर उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यासोबत केलेल्या युतीवरुन शिंदे गटाकडून ठाकरे गटावर टीका सुरु आहे. याच दरम्यान श्रीकांत शिंदे आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे एकाच मंचावर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या कार्यक्रमात शिंदे यांनी जलील यांच्या गळ्यात हात घालून भाषण देखील केले. दोन कट्टर विरोधक एकाच मंचावर आल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत
No comments:
Post a Comment