वेध माझा ऑनलाईन - राहुल गांधी यांच्या सावरकरांबाबतच्या वक्तव्यानंतर काँग्रेस नेत्यांकडून आपली भूमिका मांडली जात आहे. काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका कार्यक्रमात राहुल गांधी व सावरकर यांच्याबाबत आपली भूमिका मांडली आहे. ‘कोणत्याही ऐतिहासिक पुरुषाकडे आजच्या स्थितीतून पाहताना प्रत्येकाने सावधगिरी बाळगली पाहिजे. देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी सत्तेत असताना सावरकरांच्या नावाचं तिकीट काढलं होतं हे विसरता कामा नये,” असेही चव्हाण यांनी म्हंटले आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र टाईम्सने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानाबाबत मुंबईत आपले मत व्यक्त केले आहे. यावेळी ते म्हणाले की, ज्याप्रमाणे इतिहासाचे अभ्यासक एखाद्या ऐतिहासिक घटनेकडे पाहतात त्याचप्रमाणे सामान्य माणूस बघत नाही. आपल्याला जे सोयीस्कर वाटते तेच तो पाहतो आणि त्यावरून आपले मत बनवतो. इतिहासातील कोणत्याही व्यक्तीकडे पाहिले तर त्याच्यात काहीतरी गुण-दोष आढळतात त्याच्यातील गुण-दोषांचे योग्य मूल्यमापन झाले पाहिजे. एखाद्याने चांगलयाप्रकारचे काम, कार्य केले असेल तर चांगलेच म्हंटले पाहिजे.देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी या ज्यावेळी सत्तेत होत्या. त्यावेळी त्यांनी सावरकर यांच्या नावाचे तिकीट काढले होते. सावरकरांनी इंग्रजांना पत्रे लिहिली आहेत, त्यांना पेन्शनही मिळत होती त्याचप्रमाणे त्यानी जे योगदान दिले आहे तेही विसरता येणार नाही असेही चव्हाण यांनी म्हटले आहे
No comments:
Post a Comment