वेध माझा ऑनलाइन - मला इथ येऊन घरी आल्यासारखं वाटतय...सातारा जिल्हा माझी जन्मभूमी आहे... या जिल्ह्याविषयी मला विशेष प्रेम आहे... अशा शब्दांनी आपल्या भाषणाची सुरुवात करत कराडकरांच्या भावनांचा थेट ठाव घेतच मुख्यमंत्र्यांनी आपले मनोगत व्यक्त करायला सुरुवात केली... ते म्हणाले... कराड शहराच्या विकासकामांसाठी माझ्याकडे निधीची मागणी करण्यात आली आहे...लिस्ट खूप मोठी आहे..., पण काळजी करू नका... मी शब्द देतो कराडला विकासनिधीची कमतरता भासणार नाही... भरघोस निधी मिळेल अशी ग्वाही देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कराड येथे बोलताना दिली... बाळासाहेबांची शिवसेनेचा मेळावा दत्त चौकात पार पडला. कराड नगरपालिकेतील यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्यासह नगरसेवकांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळी ते बोलत होते
यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार महेश शिंदे, आमदार शहाजीबापू पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला युवक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही गद्दारी केली असा आरोप आमच्यावर करतात; पण खरेतर टीका करणाऱयांनी बाळासाहेब ठाकरे विचारांशी व हिंदुत्वाशी गद्दारी केली आहे. आम्ही तर त्याला कामाने उत्तर देत आहोत. हा मिंदे गट नव्हे तर हा बाळासाहेबांच्या विचारांचा सच्चा शिंदे गट आहे. आम्ही जे करायचं ते उघड करतो. लपून-छपून काहीच करीत नाही. मी फक्त काम करत राहणार व महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणार आहे.
बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन आम्ही निघालो आहोत. जुने शिवसैनिक माझ्याबरोबर का येतात? याचे आत्मचिंतन विरोधकांनी केलले बरे काहीही झाले तरी आम्ही हिंदुत्वाशी गद्दारी करणार नाही असेही ते यावेळी म्हणाले.
राजेंद्रसिह यादव म्हणाले...
राजेंद्रसिंह यादव भूमिका स्पष्ट करताना म्हणाले, एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्याच्या शिरपेचतील मानाचा तुरा आहेत ते आपले वाटणारे आणि तळागाळातून आलेले असे कर्तृत्ववान नेते आहेत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी सहकार्य करावे अशी भावना त्यांनी व्यक्त केली आणि कराडचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय आहे असेही यादव यावेळी म्हणाले
No comments:
Post a Comment