वेध माझा ऑनलाइन - ढेबेवाडी जवळील वाजोली येथे शेतकऱ्यासमोरच बिबट्याने शेळीचा फडशा पाडल्याची घटना घडल्याने त्याठिकाणी बिबट्याचा वाढता उपद्रव आता स्पष्ट झाला आहे त्याठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने बिबट्याच्या बंदोबस्तासाठी ग्रामस्थांनी वनविभागाला साकडे घातले आहे
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार ढेबेवाडी विभागातील वाजोली येते शेतकऱ्यांसमोरच बिबट्याकडून शेळीवर हल्ला झाला.. या हल्ल्यात शेळी ठार झाल्याची घटना घडली वाजोली येथील शिंगणी नावाच्या शिवारानजीकच्या डोंगरात नेहमीप्रमाणे काही शेतकरी जनावरे चरण्यासाठी घेऊन गेले होते दुपारी तीनच्या सुमारास झुडपात दबा भरून बसलेल्या बिबट्याने अंजना आचरे यांच्या शेळीवर अचानक हल्ला केला शेतकऱ्यांसमोर हा प्रकार घडल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर शेळीला तेथेच टाकून बिबट्या पळून गेला या घटनेत शेळीचा मृत्यू झाला असून घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल एल व्ही पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुभाष राऊत मुबारक मुल्ला पोलीस पाटील विजय सुतार माजी सरपंच अशोक मोरे शिवाजी मोरे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे नुकसानग्रस्त शेतकरी महिलेला वनविभागाने तातडीने मदत देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली असून पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणीही करण्यात आली आहे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अशोक मोरे यांनी बिबट्याच्या उपद्रवात मोठी वाढ झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत पीक राखणीला जाणारे शेतकरी धास्तावले आहेत तरी वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे
No comments:
Post a Comment