वेध माझा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात राज्य महिला आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार महिलेने केली. आव्हाडांविरोधात विनयभंगाची तक्रार देणाऱ्या महिलेने आज मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेत आमदार आव्हाड यांनी केलेले कृत्य हे जाणीवपूर्वक होते... गर्दीत धक्का लागतो... आणि पकडून धक्का दिला जाणे..., यात फरक असल्याचेही या महिलेने म्हटले आहे...महिला आयोगान स्वतः दखल घ्यावी आणि त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
पीडित तक्रारदार महिलेने पत्रकार परिषदेत सांगितले की, रविवारी, मुंब्रा येथील उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी मला देखील निमंत्रण होते. ज्यावेळी घटना घडली त्यावेळी प्रचंड गर्दी होती. मी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले. त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी तू इथे काय करतेस म्हणत मला बाजूला ढकललं. त्यांनी ढकलल्याने तिथं उपस्थित असलेल्या पुरुषांच्या अंगावर गेले. या प्रकारानंतर मुख्यमंत्री तोपर्यंत निघून गेले होते. त्यांची भेट झाली नाही. मात्र, मी पोलीस ठाण्यात गेले आणि तक्रार दाखल केली.
दरम्यान, आमदार आव्हाड यांनी केलेले कृत्य हे जाणीवपूर्वक होते... गर्दीत धक्का लागतो... आणि पकडून धक्का दिला जाणे..., यात फरक असल्याचेही या महिलेने म्हटले. महिला आयोगान स्वतः दखल घ्यावी आणि त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
No comments:
Post a Comment