उपस्थित युवकांना मार्गदर्शन करताना आमदार बावनकुळे म्हणाले पंतप्रधान मोदीं व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकल्पनेतून युवा वारिअर्स ही संकल्पना साकारत आहे युवकांनी अभ्यासाबरोबर आपले इतर स्किल डेव्हलप करण्याच्या ड्रीष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे अशा शाखांमधून युवकांना शिक्षणाबरोबरच त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत संबंधित शाखेकडून तेथील युवकांच्या अशा प्रकारच्या सर्वतोपरी विकासासाठी प्रयत्न होणे अपेक्षित आहे
या शाखेचा प्रमुख ऋषीकेश अष्टेकर यानेही आपले मनोगत व्यक्त केले व सबंधीत शाखेच्या माध्यमातून अधिकाधिक युवकांना सर्व अपेक्षित मदत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले यावेळी ओंकार शिंदे यांची सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आली
भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून युवा वॉरिअरच्या शाखा कराड शहरातील प्रत्येक वार्डात उभारणार असल्याचे युवा मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष सुदर्शन पाटसकर यांनी उपस्थित पत्रकारांना सांगितले
याप्रसंगी प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ,प्रदेश सदस्यअतुल बाबा भोसले, जिल्हाध्यक्ष आ.जयकुमार गोरे,प्रदेश सचिव विक्रम पावसकर,प्रदेश उपाध्यक्ष युवा मोर्चा सुदर्शन पाटसकर,भाजप शहर अध्यक्ष एकनाथ बागडी सरचिटणीस प्रमोद शिंदे,नगरसेवक सुहास जगताप,जिल्हा प्रभारी अमृत मारणे,उपाध्यक्ष मुकुंद चरेगावकर, जिल्हाध्यक्ष निलेश नलावडे,स्वप्नील बोराटे,मयूर धुमाळ,युवा मोर्चा अध्यक्ष विशाल कुलकर्णी,शैलेश गोंदकर, कृष्णा चौगुले,सुदाम साळुंखे, तसेच माजी नगरसेवक घनश्याम पेंढारकर यासह अजय पावसकर, नितीन वासके तसेच महिला मोर्चा अध्यक्ष सीमा घार्गे,धनश्री रोकडे, भारती जाधव,सुषमा चव्हाण, आदी मान्यवर तसेच विद्यार्थी, विद्यार्थीनी युवक
यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते
No comments:
Post a Comment