वेध माझा ऑनलाइन - स्व यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराड येथील त्यांच्या स्मृतीस्थळावर राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या नेत्यांसह विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
खासदार श्रीनिवास पाटील, माजी सहकार मंत्री, आमदार बाळासाहेब पाटील, जेष्ठ नेते विक्रमसिंह पाटणकर, प्रभाकर देशमुख, माजी सभापती देवराज पाटील आदींसह भाजपचे प्रदेश सचिव अतुल भोसले व भाजप पदाधिकाऱ्यांनीही अभिवादन केले
यावेळी बाळासाहेब पाटील म्हणाले, यांत्रिकीकरण करण्याच्या माध्यमातून राज्याला पुढे नेले पाहिजे या यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने राज्याची प्रगती आजही चालू आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने आज पुरस्कार सोहळा असल्याने आज शरद पवार कराडला आले नसल्याची माहिती बाळासाहेब पाटील यांनी दिली.
डॉ अतुल भोसले म्हणाले...
सहकारी संस्थांबरोबर ग्रामीण अर्थव्यवस्था संस्था असतील याना बळकट करण्याचे काम यशवंतराव चव्हाण यांनी केले. महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेला नेले असे डॉ. अतुल भोसले यांवेळी म्हणाले
No comments:
Post a Comment