वेध माझा ऑनलाइन - शिवसेनेत दोन गट पडल्यापासून राजकीय घडामोडींना अतिशय वेग आला आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसतात. ठाकरे गटातील प्रवक्त्या सुषमा अंधारे अनेकदा शिंदे गटातील नेत्यांवर सडकून टीका करताना दिसतात. मात्र, आता एक अतिशय मोठी बातमी समोर आली आहे. सुषमा अंधारे यांचे पतीच आता बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
आज दुपारी सुषमा अंधारे यांचे पती शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. टेंभी नाका येथील आनंद मठात हा प्रवेश होणार आहे.
उद्धव ठाकरेंच्या पक्षाला हा पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. अंधारे कुटुंबीयात फूट पडली आहे. शिवसेनेची तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुषमा अंधारेंचे पती एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश करत आहेत. यावर सुषमा अंधारे यांचे पती वैजनाथ वाघमारे यांनी स्वतःच प्रतिक्रिया दिली आहे.
वैजनाथ वाघमारे यांनी सांगितलं की 'आम्ही दोघं अनेक वर्षांपासून विभक्त राहातो. आमचा काहीही संबंध नाही. एकनाथ शिंदेंची भूमिका पटली म्हणून मी त्यांच्या पक्षात प्रवेश करत आहे. एकनाथ शिंदेंसोबत चर्चा केली आहे. त्यांच्यासमोर काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी हो म्हटलं आणि आज प्रवेश करत आहे, अशी माहिती वाघमारे यांनी दिली आहे. पक्ष जी जबाबदारी देईल ती आपण पार पाडेल, असंही ते यावेली बोलताना म्हणाले.
No comments:
Post a Comment