वेध माझा ऑनलाइन - शिवसेना खासदार संजय राऊत याना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी जामीन मंजूर झाला आहे. राऊतांच्या आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली त्यावेळी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. संजय राऊत याना आज रात्री ७ वाजता तुरुंगातून सोडण्यात येणार आहे. तत्पूर्वी शिवसैनिकांकडून राऊतांच्या समर्थनार्थ मुंबईत बॅनरबाजी करण्यात आली आहे.
निष्ठा म्हणजे काय याचे जिवंत उदाहरण म्हणजे संजय राऊत अशा आशयाची बॅनरबाजी संजय राऊत यांच्या घराबाहेर करण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या जामिनामुळे शिवसैनिकांमध्ये नवा जोश आणि उत्साह संचारल्याचे दिसत आहे.
दरम्यान, आज संध्याकाळी ७ वाजता संजय राऊत याना तुरुंगातून बाहेर काढण्यात येणार आहे. संजय राऊत याचे भाऊ सुनील राऊत हे ऑर्थर रोड जेलच्या बाहेर पोचले आहेत. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राऊत सिद्धिविनायक चे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतील.
No comments:
Post a Comment