Tuesday, November 8, 2022

'तो" ग्रामपंचायतीच्या तिसऱ्या मजल्यावर चक्क रेड्यालाच घेऊन गेला; प्रश्न होता घराजवळील गटारीचा... हा काय प्रकार आहे?वाचा बातमी

वेध माझा ऑनलाइन ; घराजवळच्या गटाराचा प्रश्न सोडवण्यासाठीची तक्रार घेऊन तो आपल्या रेड्याला घेऊनच ग्रामपंचायतिच्या तिसऱ्या मजल्यावरच्या कार्यालयात गेला...त्याने तिथे रेड्यासह आपला  ठियाच मांडला...कराड तालुक्यातील वडगाव येथील ही घटना आहे,आणि याच घटनेची चर्चा सगळीकडे सुरू आहे...पण काय आहे हा प्रकार?काय आहे बातमी?... हे आपण जाणून घेऊया...

गेली दोन वर्ष ग्रामपंचायत घराजवळील गटाराचा प्रश्न सोडवीत नसल्याच्या कारणाने त्रस्त झालेल्या कराड तालुक्यातील वडगाव येथील ग्रामस्थांने चक्क रेड्यासह ग्रामपंचायत कार्यालय गाठले नुसते ग्रामपंचायत कार्यालय गाठून तो थांबला नाही तर तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालयात रेड्यासह ठिया मांडला आणि जोपर्यंत प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत आपण इथून हलणार नाही अशी भूमिका घेतल्याने ग्रामपंचायतीमधील कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.. या घटनेचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला असून याबाबतची चर्चा सर्वत्र रंगली आहे.. घराजवळच्या गटाराच्या पाण्याचा त्रास कुटुंबाला होत असल्याची तक्रार या ग्रामस्थांनी अनेकदा करूनही त्याची दखल घेतली नसल्याचे या ग्रामस्थांचे म्हणणे आहे

No comments:

Post a Comment