वेध माझा ऑनलाइन - जामीनावर बाहेर आलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीकडून नोटीस आली आहे. चौकशीसाठी हजर राहण्याचं या नोटीसमध्ये म्हटलं आहे. विशेष पीएमएलए कोर्टातून संजय राऊत यांना जामीन देत असताना चौकशीसाठी व तपासासाठी सहकार्य करावे अशी अट ठेवण्यात आली होती. त्यामुळे पत्राचाळ प्रकरणातील तपास ईडीने अजूनही पुढे सुरू ठेवला आहे, आणि त्याच प्रकरणातील चौकशीसाठी पुन्हा एकदा संजय राऊत यांना हजर राहण्यासंबंधी नोटीस पाठवण्यात आली आहे. 18 नोव्हेंबर रोजी संजय राऊत यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे.
तब्बल 100 दिवसानंतर शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांना बुधुवारी (9 नोव्हेंबर 2022) कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला होता. आता ईडीनं चौकशीसाठी संजय राऊत यांना पुन्हा नोटीस पाठवली आहे. 18 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस ईडीकडून राऊतांना पाठवण्यात आली आहे. त्याशिवाय संजय राऊत यांचा जामीन रद्द करावा, अशी याचिका ईडीनं कोर्टात केली आहे.
No comments:
Post a Comment