Friday, November 11, 2022

भारत जोडो यात्रेदरम्यान अपघात ; एकाचा मृत्यू ;

वेध माझा ऑनलाइन - केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगणानंतर राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. नांदेडच्या देगलुरमध्ये भारत जोडोचं आगमन झालं आहे. दरम्यान आता या यात्रेदरम्यान नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. भारत जोडो यात्रेतील दोघांना आयचर ट्रकने उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका यात्रेकरूचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा जखमी झाला आहे.

नांदेड - नागपूर मार्गावरील पिंपळगाव जवळ गुरुवारी रात्री हा अपघात झाला. राहुल गांधी यांची सभा आटोपून यात्रेकरू मुक्काम स्थळी जात होते. मात्र, पिंपळगावजवळ एका भरधावत आयचरने दोघांना धडक दिली . यात 62 वर्षीय गणेशन यांचा मृत्यू झाला. घटनेतील मयत गणेशन हे तमिळनाडूचे राहिवाशी होते. अपघातात सयसूल नामक व्यक्ती जखमी झाला आहे.

No comments:

Post a Comment