Thursday, March 30, 2023

महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालय नपुंसक म्हणतंय हा सरकारचा कमीपणा ; अजित पवार यांचा शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात ;

वेध माझा ऑनलाइन - शिंदे-फडणवीस सरकारच्या कारभारावर सुप्रीम कोर्टाने कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. यामुळे या सरकारवर मोठी नामुष्की ओढावली आहे. सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढताना महाराष्ट्र सरकारचा कारभार नपुंसक असल्याचे म्हटले आहे. यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. हा महाराष्ट्राचा अपमान झाला नाही का? असा संतप्त सवाल अजित पवार यांनी सरकारला केला आहे. ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आता दोष कुणाला द्यायचा
अजित पवार म्हणाले, काल सर्वोच्च न्यायालयाने या सरकारला नपुंसक सरकार म्हटलंय. हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? हा सरकारचा कमीपणा नाही का? आम्ही अधिवेशनाच्या निमित्ताने 4 आठवडे तेच सांगत होतो की आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात आहे. अजून त्यावर निकाल लागलेला नाही. त्यावर बोललं तर सरकारमधल्या प्रमुखांना वाईट वाटतं. महाराष्ट्राला आणि इथल्या सरकारला सर्वोच्च न्यायालय नपुंसक म्हणतंय. कारभार कशाप्रकारे चालतोय कुणास ठाऊक. आता दोष कुणाला द्यायचा, त्याचं आत्मपरीक्षण  त्यांनी करावं, असा घणाघात अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला.

सरकारने आत्मचिंतन केलं पाहिजे
अजित पवार पुढे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने मत नोंदवल्यानंतर सगळ्यांनी त्या गोष्टीचा आदर करुन सरकारने आत्मचिंतन केले पाहिजे. 1960 पासून आत्ता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होईपर्यंत कधीच सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातल्या कोणत्या सरकारला नपुंसक म्हटल्याचे ऐकलं का? जर सर्वोच्च न्यायव्यवस्थाच तसं म्हाणायला लागली तर खरच सरकारने ही बाब गांभीर्याने घेतली पाहिजे. तुषार मेहतांना कोर्टाने ऐकवलं. त्यांच्याशी संपर्क साधून नेमकं काय झालं, पुढे काय कारवाई केली पाहिजे यावर निर्णय घेतला पाहिजे, असा सल्ला अजित पवार यांनी सरकारला दिला.

काय आहे प्रकरण?
केरळमधील एका पत्रकाराने महाराष्ट्रात काही सभांमधून हिंदू संघटनांकडून करण्यात येत असलेल्या द्वेषपूर्ण भाषणांवर महाराष्ट्र पोलीस कारवाई करत नसल्याचा मुद्दा उपस्थित
करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने परखड टिप्पणी करताना,हे सगळं घडतंय कारण राज्य सरकार नपुंसक आहे, असमर्थ आहे, वेळेत कारवाई करत नाही.जर हेच घडत असेल, तर मग आपल्याला कोणत्याही राज्य सरकारची गरज काय आहे?
अशा शब्दांत न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारलं होतं.


कराडात उद्यापासून कृष्णा महोत्सव ; डॉ. अतुल भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन...एकनाथ बागडी , मुकुंद चरेगावकर, रमेश मोहिते व माजी नगरसेवक सुहास जगताप यांनी दिली माहिती ;

वेध माझा ऑनलाइन - भाजपचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त शहर भाजप व वाढदिवस संयोजन समितीच्या वतीने 31 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान कृष्णा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शहराध्यक्ष एकनाथ बागडी, मुकुंद चरेगावकर, रमेश मोहिते माजी नगरसेवक सुहास जगताप यांनी दिली.

यावेळी माजी नगरसेवक महादेव पवार, समाधान चव्हाण, किरण मुळे, प्रमोद शिंदे, उमेश शिंदे घनश्याम पेंढारकर आदी उपस्थित होते

शुक्रवार 31 रोजी सकाळी 10 वाजता वेणूताई चव्हाण सभागृहात आयुष्यमान भारत स्मार्ट कार्ड वाटप व आशा सेविकांचा सन्मान करण्यात येणार आहे. शनिवार 1 रोजी सायंकाळी 6 वाजता कृष्णा घाटावर होम मिनिस्टर, खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होणार आहे. सिनेस्टार मळेगावकर या सादरकर्त्या आहेत. रविवारी 2 रोजी कृष्णा रन या भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे 5.30 वाजता शिवाजी विद्यालयापासून प्रारंभ होणार आहे.  
रविवारी 2 रोजी सायंकाळी 6 वाजता भूपाळी ते भैरवी हा लोककलांचा कार्यक्रम कृष्णा घाटावर होणार आहे. तर सोमवार 3 एप्रिल रोजी रंगयात्री गुप पुणे यांच्यातर्फे सायंकाळी 6 वाजता गीतरामायण कार्यक्रम कृष्णा घाटावर होणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली
.

सातारा जिल्ह्यात 5 जण बाधित ; देशात 3016 नवीन रुग्णांची नोंद ; एका दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत दुप्पट वाढ

वेध माझा ऑनलाइन - देशातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एका दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली आहे. देशात आज 3016 नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. सोमवारी हा आकडा 1573 इतका होता. त्यामुळे सोमवारच्या तुलनेत देशातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. मंगळवारी देशात 2 हजार 151 कोरोनाबाधित सापडले होते. देशातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण वाढून 2.73 टक्के झालं आहे दरम्यान आज सातारा जिल्ह्यात 5 जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत

सक्रिय रुग्णांची संख्या 13 हजारांच्या पुढे
देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचे प्रमाणदेखील वाढले आहे. सध्या देशात 13 हजारहून अधिक उपचाराधीन रुग्ण आहे. देशातील कोरोनाबाधित बरे होण्याचे प्रमाण 98.78 टक्के आहे. देशात आता 13,509 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. तसेच गेल्या 24 तासांत 1,396 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या दैनंदिन रुग्ण सकारात्मकता दर 2.73 टक्के तर आठवड्याच्या रुग्ण सकारात्मकता दर 1.71 टक्के इतका आहे. 

 काळजी घ्या, कोरोना टाळा
भारतात सध्या कोरोना व्हायरससोबतच H3N2 चा संसर्गही वाढताना दिसत आहे. वाढता धोका पाहता गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन नीती आयोगानं केलं आहे. तसेच सोशल डिस्टंसिग पाळा आणि शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, असं आवाहन आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात येत आहे. घाबरुन जाणू नका, तर काळजी घ्या, असा सल्ला आरोग्य विभागानं दिला आहे.
 व्हेरियंटने चिंता वाढवली
देशात सध्या कोरोना व्हायरसच्या नव्या XBB 1.16 व्हेरियंटने चिंता वाढवली आहे. जगासह देशातही कोविड व्हायरस संसर्ग अजूनही सुरुच आहे. कोरोनाच्या XBB 1.16 व्हेरियंटचा प्रसार इतर विषाणूंच्या तुलनेत खूप जास्त आहे. यामुळे सरकारने सावधगिरी खबरदारी बाळगण्यास सांगितलं आहे. देशात आतापर्यंत चार कोटीहून अधिक रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. 
 कोरोनासंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्वे जारी
आरोग्य मंत्रालयाच्या नव्याने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे की, श्वास घेण्यास त्रास, ताप आणि खोकला 5 दिवसांपेक्षा जास्त काळ राहिल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. गंभीर लक्षणे किंवा उच्च ताप असलेल्या रुग्णांच्या बाबतीत पाच दिवसांसाठी रेमडेसिव्हिर औषधं घेतलं जाऊ शकतं पण, ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावं.

Wednesday, March 29, 2023

हे सरकार नपुंसक अन् शक्तिहीन...'; सर्वोच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारला झापले

वेध माझा ऑनलाइन -विद्वेषी वक्तव्ये रोखण्याची जबाबदारी राज्यांचीच असून कारवाईचा बडगा उगारण्यात यंत्रणा अपयशी ठरत आहे. सरकार नपुंसक, शक्तिहीन झाले आहे. ते वेळेवर कोणावरही कारवाई करत नाही. जर हे असेच सुरू राहिले तर या सरकारची गरजच काय, असा थेट सवाल सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केला. राजकीय नेत्यांनी धर्माचा राजकारणासाठी वापर करण्याचे टाळले तर विद्वेषी वक्तव्येही बंद होतील, असेही न्यायालयाने म्हटले. 

महाराष्ट्रात सकल हिंदू समाज या संघटनेने काढलेल्या रॅलींमध्ये विद्वेषी वक्तव्ये करणाऱ्यांविरोधात कारवाई न केल्याबद्दल यंत्रणा व अधिकाऱ्यांविरोधात अवमानाची कारवाई करावी, अशी याचिका न्यायालयात दाखल झाली आहे. विद्वेषी वक्तव्ये करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल होण्याची वाट न पाहता व आरोपी कोणत्या धर्माचा आहे याचा विचार न करता अधिकाऱ्यांनी अशा प्रकरणांची दखल घेऊन कारवाई करावी, असे आदेश याआधी सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. 
खंडपीठाने म्हटले आहे की, राजकीय नेत्यांनी धर्माचा राजकारणासाठी वापर करण्याचे टाळले तर विद्वेषी वक्तव्येही बंद होतील, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश के. एम. जोसेफ व न्या. बी. व्ही. नागरत्ना यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. विद्वेषी वक्तव्ये हे एक प्रकारचे दुष्टचक्र असून त्यापासून लोकांनी दूर राहिले पाहिजे, असे खंडपीठाने म्हटले आहे.

नेहरू, वाजपेयींची भाषणे लोक आवर्जून ऐकत’
सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, पं. जवाहरलाल नेहरू, अटलबिहारी वाजपेयी यांची भाषणे ऐकण्यासाठी अगदी दुर्गम भागांतील लोक देखील मोठ्या संख्येने येत असत. मात्र आता राजकीय नेत्यांनी धर्म व राजकारण यांची सरमिसळ केली असून त्याचा लोकशाहीला मोठा धोका आहे. किती लोकांवर कारवाई करायची यालाही एक मर्यादा आहे. काही लोक दरदिवशी इतरांबद्दल व्देष पसरविणारी वक्तव्ये टीव्हीतील कार्यक्रम तसेच सार्वजनिक समारंभांतून करत असतात. त्यापेक्षा अन्य समुदायांविरोधात आम्ही विद्वेषी वक्तव्ये करणार नाही अशी देशांतील नागरिकांनी शपथ घेतल्यास अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल.

महासत्ता बनायचे तर आधी कायद्याचा सन्मान राखा’
काही जणांनी केलेली विद्वेषी वक्तव्ये समाजातील मोठ्या घटकाला मान्य नाहीत. पाकिस्तानात चालते व्हासारखी वक्तव्ये विशिष्ट समुदायाला उद्देशून करण्यात आली. इतक्या खालच्या थराला कोणीही जाऊ नये. कोणालाही कायदे मोडण्याचा अधिकार दिलेला नाही. जर तुम्हाला देशाची प्रगती करायची असेल व महासत्ता बनायचे असेल तर आधी कायद्याचा सन्मान करायला शिका. -सर्वोच्च न्यायालय 
चार महिन्यांत ५० हिंदू जन आक्रोश मोर्च महाराष्ट्रात काढले. त्यामुळे विद्वेष पसरविला गेला. त्याविरोधात काहीच कारवाई न झाल्याने अवमान याचिका दाखल केल्याचे याचिकादाराचे वकील ॲड. निझाम पाशा यांनी खंडपीठाला सांगितले होते. त्यावर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, केरळमध्ये एका व्यक्तीने विद्वेषी उद्गार काढले. पण याचिकादार शाहिन अब्दुल्ला यांनी अशा उद्गारांबद्दल माहिती देताना निवडकच उदाहरणे दिली. त्यानंतर विव्देषी वक्तव्यांबाबतच्या चर्चेला तोंड फुटले.


पोस्ट कोविडला घाबरण्याची गरज नाही - डॉ. चिन्मय एरम ; वातावरणीय बदलांमुळे संसर्गजन्य आजारांचा फैलाव, औषधोपचार व त्यानंतरच्या आजारांबाबत नागरिकांमध्ये गैरसमज

वेध माझा ऑनलाइन -  गेल्या दोन-तीन महिन्यांपासून वातावरणीय बदलांमुळे सर्वत्र सर्दी, ताप, खोकला अशा प्रकारचे संसर्गजन्य आजार उद्भवत आहेत. तसेच अलीकडे कोविडचे रुग्णही काही प्रमाणात आढळून आल्याने नागरिकांमध्ये एकप्रकारची धास्ती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. परंतु, कोविडच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेतील विषाणूप्रमाणे पोस्ट कोविड हा तितकासा घातक नाही. हा बहुतांशी वातावरणीय बदलाचा परिणाम असून योग्य उपचारांनी पोस्ट कोविड बरा होत असल्याची माहिती शारदा क्लिनिक एरम हॉस्पिटलचे  वैद्यकीय संचालक डॉ. चिन्मय एरम यांनी दिली.
कराड येथे शारदा क्लिनिक एरम हॉस्पिटल, कराडच्या वतीने बुधवार दि. 29 रोजी कोविडनंतर रुग्णांमध्ये उद्भवणारे आजार, पोस्ट कोविड आणि वातावरणीय बदलांमुळे उद्भवणाऱ्या विविध आजारांबाबत प्रसारमाध्यमांसाठी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. याप्रसंगी पत्रकारांनी उपस्थित केलेल्या विविध शंकांचे निरसनही  डॉ. एरम यांनी यावेळी केले.
कार्यशाळेत उपस्थित विविध प्रश्नांच्या उत्तरादाखल बोलताना डॉ. चिन्मय एरम म्हणाले, कोविडनंतर काही रुग्णांमध्ये विविध प्रकारचे आजार उद्भवल्याचे समोर येवू लागले आहेत. कोविडवरील औषोधोपचार, रेमडीसिव्हर, कोविड प्रतीबंधिक लसीकरण व बुस्टर डोस आदींचे दुष्परिणाम रुग्णांवर विविध आजारांच्या माध्यमातून दिसून येत आहेत. त्यात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या घटनांचे प्रमाण जास्त आहे. परंतु, सदरच्या व्यक्तीचा कोविड व त्यावरील औषधांमुळेच मृत्यू झाल्याचे म्हणता येणार नाही. याबाबत नागरिकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. परंतु, काहींमध्ये संधिवात, मानेचे व मणक्याचे आजार, त्वचारोग आदींसारखे आजार उद्भवल्याचे दिसून येत आहे. मात्र, सध्या वातावरणीय बदलांमुळे बहुतांश ठिकाणी सर्दी, खोकला व ताप अशा प्रकारचे संसर्गजन्य आजार आढळून येत आहेत. तसेच सध्या पोस्ट कोविडचे काही रुग्ण आढळून येत असल्याने लोकांमध्ये संभ्रमावस्था आहे. परंतु, हा पोस्ट कोविड पहिल्या लाटेतील कोविड-19, तसेच H1N1 यासारख्या विषाणू इतका घातक नाही. ग्रामीण भागामध्ये बहुतांशी लोक किरकोळ आजारांवर प्राथमिक स्तरावर उपचार घेऊन बरे होत आहेत. त्यातील काही जणांना त्रास झाल्यानंतर किंवा प्रतिकारशक्ती कमी असलेले रुग्ण रुग्णालयांमध्ये ऍडमिट होतात. मात्र, योग्य औषधोपचाराने ते पूर्णपणे बरे होत असून नागरिकांनी पोस्ट कोविडला घाबरून जाण्याची गरज नाही.
पोस्ट कोविडमध्ये प्रामुख्याने मानसिक तणाव आणि शारीरिक कमकुवतपणा हे महत्वाचे दोन घटक आहेत. सध्या संपूर्ण जग खुले झाले आहे. तसेच काही टक्के वगळता लसीकरणही पर्ण झाल्याने पोस्ट कोविडचा तितका प्रभाव पडत नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

शासकीय आरोग्य योजनांची आर्थिक मर्यादा वाढवावी
महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये रुग्णांना दीड लाख रुपयांपर्यंत सुरक्षा कवच देण्यात येते. तसेच प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये पाच लाख रुपयांचे सुरक्षा कवच देण्यात येते. परंतु, जर कुटुंबातील दोन-तीन सदस्य आजारी पडले, तर एका वर्षात सर्वांची मिळून दोन-तीन लाखांपर्यंत मोफत उपचार होऊ शकतात. या योजनांमध्ये ठराविक आजारच समाविष्ट असून त्यामध्ये रुग्णालयात उपचार घेण्याचे दिवस आणि खर्च यावर मर्यादा आहेत. यामध्ये संपूर्ण उपचार मोफत केले जात असून रुग्णांकडून कोणत्याही प्रकारे पैसे घेतले जात नाहीत. परंतु, काही आजारांसाठी रुग्णालयांना शासनाकडून मिळणारा निधी आणि प्रत्यक्षात रुग्णावर होणारा खर्च यामध्ये मोठी तफावत असून अशा आजारांसाठी शासनाने शासकीय आरोग्य योजनांची आर्थिक मर्यादा वाढवावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

विधानसभेचा बिगुल वाजला; कर्नाटकात एकाच दिवशी मतदान, निकालाची तारीखही ठरली

वेध माझा ऑनलाइन - कर्नाटकच्या २२४ विधानसभेच्या जागांसाठी निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये, अनुसूचित जातीसाठी ३६ जागांवर आरक्षण आहे, तर अनुसूचित जमातींसाठी १५ जागा राखीव आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी १० मे रोजी मतदान घेण्यात येणार असून  १३ मे रोजी निकाल जाहीर करण्यात येत आहे. विशेष म्हणजे राज्यात एकाच टप्प्यात मतदान होत आहे. त्यासाठी, अर्ज करण्यासंदर्भातील नोटीफिकेशन १३ एप्रिल रोजी निघणार आहे. 

कर्नाटक मध्ये ५८,२८२ मतदान केंद्र असून २०,८६६ शहरी केंद्र आहेत. ज्यामध्ये ५०% मतदान केंद्रांवर म्हणजेच २९,१४० केंद्रावर वेबकास्टिंग करण्यात येणार आहेत. तर, कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकांसाठी २४० मतदान केंद्रांना मॉडेल पोलिंग स्टेशन बनवण्यात येत असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली. 

२४ मे रोजी संपतोय विधानसभेचा कार्यकाळ
यापूर्वीच्या पंचवार्षिक म्हणजेच २०१८ मधील कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम २७ मार्च रोजी जाहीर झाला होता. यंदा आज म्हणजेच २९ मार्च रोजी तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. कर्नाटकात १० मे रोजी मतदान होत असून १३ मे २०२३ रोजी निकाल हाती येणार आहेत. मागील निवडणुकीप्रमाणे यंदाही एकाच टप्प्यात मतदान घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ २४ मे रोजी संपत आहे.

कर्नाटकमधील सध्याचं संख्याबळ
कर्नाटकमध्ये २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं. मात्र, भाजपने २२४ जागांपैकी सर्वाधिक १०४ जागा जिंकत वर्चस्व मिळवले होते. तर, काँग्रेसने ८० जागा जिंकल्या होत्या, जेडीएसने ३७ जागा जिंकल्या. मात्र, सुरुवातीला सर्वात मोठा पक्ष असूनही भाजप सत्तेपासून दूर राहिला होता. अखेर, भाजपने बंडखोर आमदारांसोबत एकत्र येत कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन केली, तेव्हा मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा हे होते.  


गिरीश बापट यांच्या आठवणीत राष्ट्रवादीचा नेता ढसा ढसा रडला ;

वेध माझा ऑनलाइन - आठवड्यातून मी दोनवेळा भाजपचे नेते गिरीश बापट  भेटायला जायचो. त्यांना दडपे पोहे आवडत होते. माझ्या बायकोने त्यांच्यासाठी पोहे केले होते. ते मी घेऊन गेलो, त्यावेळी ते म्हणाले 'अरे मला पोटात काही जात नाही, कशाला आणले' ते ऐकून मला खूप दुख झालं' असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांना अश्रू अनावर झाले.

भाजपचे नेते गिरीश बापट आणि राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे हे वेगवेगळ्या पक्षात असले तरी त्यांची मैत्रीही राजकारणापलीकडची होती. आज आपला मित्र सोडून गेल्यामुळे काकडे यांना अश्रू अनावर झाले.
'1996 पासून मी आणि बापट निवडून आलो. मी काँग्रेसकडून आलो, बापट हे भाजपकडून आले. शांतीलाल सुरजवाला हे प्रथम नागरिक संघटनेकडून आले. ज्यावेळी पुलोद झालं. त्यावेळी ते स्थायी समितीचे अध्यक्ष झाले. त्यावेळी गिरीश बापट यांना मदत करतील, शांतीलाल, ढोले पाटील, यांना मतदान देणार नाही. शांतीलाल आणि ढोले पाटील यांची निवडणूक झाली. त्यावेळी त्यांना मतं मिळतील की नाही, अशी शक्यता होती. त्यावेळी हे प्रकरण शरद पवारांकडे गेलं. ते तिन्ही चांगले मित्र आहे, ते त्यांच्या पक्षासोबत एकनिष्ठ राहतील, असं शरद पवार यांनी सुचवलं होतं. त्यानंतर निवडणुकीत हे तसंच झालं' असं म्हणत काकडे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
काही दिवसांपूर्वी बालगंधर्वमध्ये झालेल्या कार्यक्रमात शरद पवार हे गंमतीने बोलले होते. पण, त्यांना माहिती होतं, मी आणि बापट हे मित्र असलो तरी आपआपल्या पक्षासोबत एकनिष्ठ आहे. राजकारणामध्ये आपआपल्या पक्षासोबत एकनिष्ठ राहावे. पण मैत्रीच्या बाबतीत राजकीय बाण येऊ नये, हे आम्ही आज रात्री 12.30 वाजेपर्यंत पाळलं. माझी सोमवारी भेट झाली होती, नुकतेच ते डायलिसीस करून आले होते. आठवड्यातून मी दोनवेळा त्यांना भेटायला जायचो. त्यांना दडपे पोहे आवडत होते. माझ्या बायकोने त्यांच्यासाठी पोहे केले होते. ते मी घेऊन गेलो, त्यावेळी ते म्हणाले अरे मला पोटात काही जात नाही, कशाला आणले. ते ऐकून मला खूप दुख झालं होतं, असं म्हणत अंकुश काकडे यांना अश्रू अनावर झाले.
'गिरीश बापट हे प्रचारासाठी व्हिलचेअरवर आले होते. कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव हा बापट यांची गैरहजेरी होती. बापट जर सक्रीय असते तर निवडणुकीचा निकाल काय लागला असता हे आता सांगणे कठीण आहे. बापट यांची गैरहजेरी ही यापुढे भाजपला कायम जाणवणार आहे, असंही काकडे म्हणाले.

 

पत्रकार सुलतान फकीर यांना पितृशोक ;

वेध माझा ऑनलाइन -  कराडचे पत्रकार सुलतान फकीर यांचे वडील व कराड तालुका पेन्शन संघटनेचे माजी अध्यक्ष व प्रगतशील शेतकरी अमानुल्ला गणी फकीर (गुरुजी) यांचे 28 मार्च रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.कराड तालुका पेन्शन संघटनेचे अध्यक्ष या नात्याने अमानूल्ला फकीर यांनी पेन्शन धारकांच्या विविध प्रश्नांना मार्गी लागण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम आज 30 रोजी सायं 5.30 वाजता त्यांच्या घरी वैकुंठ धाम स्मशानभूमी (कब्रस्तान) कोळे (ता. कराड) येथे होणार आहे. 

खासदार गिरीश बापट यांचे निधन ;

वेध माझा ऑनलाइन - खासदार गिरीश बापट यांचं दीर्घ आजाराने निधन  झालं आहे. मागील काही दिवस त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अंत्यविधी संध्याकाळी 7  वाजता वैकुंठ स्मशान भूमीत होणार आहे. 1973 पासून ते राजकारणात सक्रिय होते. पुण्यात भाजपची यशस्वी वाटचाल करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. पुण्याची ताकद गिरीश बापट अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.  पुण्यातील कसबा मतदार संघात आणि इतर पुण्यात भाजप पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत केली होती. 

बापटांची राजकीय कारकीर्द...
टेल्को कंपनीत 1973 ला कर्मचारी म्हणून काम करत असताना कामगार संघटनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला होता. 1983 ला पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. सलग तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 1993 ला झालेल्या कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीत गिरीश बापट यांचा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर त्यांनी राजकारणात मागे वळून पाहिलं नाही.1995 पासून कसबा पेठ मतदारसंघात सलग पाचवेळा आमदार म्हणून विजयी झाले होते.  राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक खात्यांचे मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून काम केलं आहे. त्यानंतर 2019 ला पुण्याचे खासदार म्हणून विक्रमी मताधिक्याने निवडून आले होते. 

पोटनिवडणुकीच्या वेळी सक्रिय सहभाग...
महिन्याभरापूर्वी दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे पोटनिवडणुक झाली. या निवडणुकीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. सुरुवातीला प्रकृतीमुळे प्रचारात सक्रिय राहणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र पक्षनिष्ठा जपत ते पोटनिवणुकीसाठी ऑक्सिजन लावून आणि व्हिलचेअरवर भाजपच्या मेळाव्यासाठी पोहचले होते. त्यांनी आजारी असतानाही मतदानाचा हक्क बजावला होता. त्यानंतर गुढीपाडव्यानिमित्त कसबा गणपतीसमोर गिरीश बापटांच्या खासदार निधीतून करण्यात आलेल्या विकास कामांच्या उद्घाटनाला गिरीश बापट यांच्याकडून कॉंग्रेसचे विद्यमान आमदार रविंद्र धंगेकर आणि त्यांचे भाजपमधील प्रतिद्वंद्वी हेमंत रासने यांना आमंत्रित करण्यात आले होते. हा सर्वसमावेशकपणा हेच गिरीश बापट यांच्या राजकारणाचे वैशिष्ट्य होते आणि चाळीस वर्षांच्या यशस्वी राजकीय कारकीर्दीचे रहस्य होते. 


Tuesday, March 28, 2023

गौतमी पाटीलच्या अदाकारीने जावलीकर घायाळ ; कार्यक्रमादरम्यान आमदार शिवेंद्रराजेंनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव केला डान्स ...साडी चोळी देऊन गौतमी पाटीलचा केला सन्मान ;

वेध माझा ऑनलाइन - आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त जावळी तालुक्यातील कुडाळ येथे प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमास युवकांची तुफान गर्दी झाली हाेती. या कार्यक्रमात प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिने अदाकारी सादर केल्यानंतर तिचा आमदार शिवेंद्रराजेंनी साडी चोळी देऊन सन्मान केला.

आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा 30 मार्चला होणाऱ्या वाढदिवसानिमित्त दोन दिवस आधीपासूनच सातारा तालुक्यासह जावली तालुक्यात कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा विषयक उपक्रम माेठ्या प्रमाणात साजरे केले जात आहेत.जावली तालुक्यात आमदार शिवेंद्रराजे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला जावळी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.
यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले हे देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान आमदार शिवेंद्रराजेंनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव स्टेजवर डान्स केला. आमदार शिवेंद्रराजे त्यांच्या कार्यकर्त्यांसह स्टेजवर हात वर करून थिरकलेले पाहायला मिळाले

भाजप नेते अतुल भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उसळला जनसागर ; रेठरे बुद्रुक येथे अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात; विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा

वेध माझा ऑनलाइन -  भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी तथा कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुलबाबा भोसले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी रेठरे बुद्रुक येथील निवासस्थानी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा जनसागर उसळला होता. 
प्रारंभी डॉ. अतुलबाबा भोसले यांनी कृष्णा हॉस्पिटल येथील सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर त्यांचे रेठरे बुद्रुक येथे आगमन होताच कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात व जोरदार उत्साहात स्वागत केले. याठिकाणी डॉ. अतुलबाबा भोसले यांनी त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. गौरवी भोसले यांच्यासह श्री महादेव मंदिरात अभिषेक केला. तसेच श्री जोतिर्लिंग मंदिरात व कै. पै. मारुती कापूरकर यांच्या समाधीचे दर्शन घेऊन ते रेठरे बुद्रुक येथील निवासस्थानी आले. याठिकाणी मातोश्री सौ. उत्तरा भोसले यांनी त्यांचे औक्षण केले. त्यानंतर कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, श्री. पृथ्वीराज भोसले, श्री. विनायक भोसले, सुदन मोहिते यांच्यासह अलोट गर्दीच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. अतुलबाबा भोसले यांना शुभेच्छा देत, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सुयश व्यक्त केले. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सहकारमंत्री अतुल सावे, खासदार श्रीनिवास पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, पोलीस अधिक्षक समीर शेख, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव श्री. खतगावकर, हुतात्मा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन वैभव नायकवडी, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई आदी मान्यवरांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. 
याप्रसंगी माजी आमदार आनंदराव पाटील, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, भाजपचे नेते सम्राट महाडिक, धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ, मनोज घोरपडे, आर. टी. स्वामी, सांगली जि. प. चे माजी उपाध्यक्ष रणजित पाटील, जयवंतदादा जगताप, दिलीपराव पाटील,  मानसिंगराव जगदाळे, राजाभाऊ पाटील-उंडाळकर, कराडच्या माजी नगराध्यक्ष सौ. रोहिणी शिंदे, माजी नगरसेवक सुहास जगताप, स्मिता हुलवान, विजय वाटेगावकर, अतुल शिंदे, हणमंतराव पवार, माजी जि.प. सदस्या सौ. श्यामबाला घोडके, माजी पं. स. सदस्य बाळासाहेब निकम, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याने व्हॉईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक जे. डी. मोरे, जितेंद्र पाटील, धोंडीराम जाधव, बाबासो शिंदे, संजय पाटील, दीपक पाटील, निवासराव थोरात, बाजीराव निकम, लिंबाजीराव पाटील, अविनाश खरात, संभाजीराव पाटील, दयानंद पाटील, दत्तात्रय देसाई, सयाजी यादव, शिवाजी पाटील, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सी. एन. देशपांडे, माजी संचालक ब्रम्हानंद पाटील, पांडुरंग होनमाने, ब्रिजराज मोहिते, अमोल गुरव, मनोज पाटील, वैभव जाखले, प्रदीप पाटील, कृष्णा बँकेचे उपाध्यक्ष दामाजी मोरे, संचालक शिवाजीराव थोरात, हर्षवर्धन मोहिते, प्रदीप थोरात, प्रमोद पाटील, नारायण शिंगाडे, विजय जगताप, संचालिका सारिका पवार, सरिता निकम, सचिन तोडकर, बँकेचे माजी चेअरमन शिवाजीराव जाधव, भाजपचे तालुकाध्यक्ष धनंजय पाटील, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, कोरेगावचे सरपंच बाळासाहेब पाटील, रेठरे बुद्रुकच्या सरपंच सौ. सुवर्णा कापूरकर, दादा शिंगण, दिलीपराव चव्हाण, मुकुंद चरेगावकर, घनश्याम पेंढारकर, रमेश मोहिते, पंकज पाटील, बंटी जाधव, तानाजी देशमुख, रामभाऊ सातपुते, उमेश शिंदे, डॉ. सारिका गावडे, सीमा घार्गे, शिवाजी पवार, प्रमोद शिंदे, अक्षय सुर्वे, प्रवीण सोनवणे, बाबुराव यादव, मलकापूरचे नगरसेवक दिनेश रैनाक, माजी नगराध्यक्ष आबासाहेब गावडे, बाळासाहेब घाडगे, हिंदकेसरी पैलवान संतोष वेताळ, इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष भगवानराव पाटील, आनंदराव मोहिते, दीपक जाधव, चंद्रहास जाधव, राहुल पाटील, एम. के. कापूरकर, महादेव पवार, सर्जेराव पाटील,  सुनील पवार, श्रीकांत घोडके, वसीम मुल्ला, अण्णासो काशीद, राजू मुल्ला, विक्रमसिंह मोहिते, धनंजय पाटील, संग्रामसिंह पाटील, सुरज शेवाळे, हेमंत पाटील, व्ही. के. मोहिते, चंद्रकांत देसाई, उमेश मोहिते, अरविंद पाटील, देवानंद पाटील, पंजाबराव पाटील, दीपक गावडे, संदीप यादव, सुनील पाटील, सचिन पाचूपते, जयराम स्वामी वडगावकर मठाचे मठाधिपती विठ्ठलस्वामी महाराज, एम. के. कापूरकर, अधिकराव पाटील, कविता कचरे यांनी शालेपयोगी साहित्य भेट स्वरूपात देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी वह्यांची तुला करण्यात आली. याचबरोबर तसेच गजराजाने सोंडेच्या माध्यमातून डॉ. अतुल भोसले यांच्या गळ्यात पुष्पमाला घालून आशीर्वाद दिला. 


छगन भुजबळ आणि शंभूराज देसाई झाले कोरोना पॉझिटिव्ह ;

वेध माझा ऑनलाइन -महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने डोकं वर काढायला सुरूवात केली आहे. सुरूवातीला छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता मंत्री शंभुराज देसाई यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. स्वत: शंभुराज देसाई यांनी सोशल मीडियावरून त्यांना कोरोना झाल्याची माहिती दिली आहे.

'माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी गृह विलगीकरणात डॉक्टरांकडून उपचार घेत आहे. माझी प्रकृती ठीक असून काळजी करण्याचे कारण नाही. गेल्या तीन-चार दिवसांमध्ये माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांनी त्यांना काही लक्षणे आढळल्यास त्वरित कोविड चाचणी करून घ्यावी, ही विनंती आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन यानिमित्ताने करतो', असं शंभुराज देसाई त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
भुजबळांनाही कोरोना
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार छगन भुजबळ यांची कोरोना टेस्टही पॉझिटिव्ह आली आहे. सोमवारी येवल्याहून नाशिकला परत येत असताना अचानक भुजबळ यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे थंडी ताप वाढल्याने त्यांना तातडीने अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यानंतर त्यांची टेस्ट केली असता ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले. भुजबळ हे सध्या नाशिकच्या त्यांच्या घरी विलगीकरणात आहेत.
आमदार चिंतेत
दरम्यान भुजबळ आणि शंभुराज देसाई यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे इतर आमदारही चिंतेत आहेत. नुकतंच महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपलं, या अधिवेशनामध्ये भुजबळ आणि शंभुराज देसाई इतर आमदारांच्याही संपर्कात आले होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी राहुल भोसले तर उपाध्यक्षपदी सुदेश थोरवडे

वेध माझा ऑनलाइन - भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी तमाम आंबेडकरी जनता व तरुण कार्यकर्त्यांची मिटींग डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉल बुधवार पेठ कराड येथे समाजभूषण आप्पासाहेब गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली.

       या बैठकीमध्ये जुनी कमिटी बरखास्त करण्यात आली व नवीन कमिटी एकमताने निवडण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी राहुल भोसले तर उपाध्यक्षपदी सुदेश थोरवडे यांची एकमताने निवड करण्यात आली.यावेळी सचिव संतोष विनायक बोलके, उपसचिव पंकज दिलीप काटरे, खजिनदार ओंकार मिलिंद थोरवडे, उपखजिनदार अभिजीत प्रमोद थोरवडे, कार्याध्यक्ष सागर शंकर लादे, उपकार्याध्यक्ष संदीप बाळू थोरवडे, प्रसिद्धी प्रमुख रोहन गौतम लादे यांची एकमताने निवड करण्यात आली. या मीटिंगमध्ये प्रास्ताविक किशोर आठवले यांनी केले. मिटींगला तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलिसांनी कराडमध्ये 14 देशी बनावटीच्या पिस्टल व 22 जिवंत काडतूसे, मिरची पुड, कोयता असा एकूण 9 लाख 11 हजार 900 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला - काय आहे बातमी

वेध माझा ऑनलाइन - विटा मार्गावर उसाच्या शेतालगत आडोशास एकत्रित जमून सशस्त्र दरोड्याची तयारी करणाऱ्या 10 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयितांकडून पोलिसांनी 14 देशी बनावटीच्या पिस्टल व 22 जिवंत काडतूसे, मिरची पुड, कोयता असा एकूण 9 लाख 11 हजार 900 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.सदरील संशयिता विरुद्ध कराड शहर पोलीस ठाणेस दरोडा टाकण्याचे पूर्व तयारीचा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी दिली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड शहरात कोबिंग ऑपरेशन राबवित असताना पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे विश्वसनीय सूत्रामार्फत मिळालेल्या माहितीवरून मौजे राजमाची गावचे हद्दीत कराड ते विटा रोडवर जानाई मळाई मंदिराजवळ रस्त्याचे बाजूला असलेल्या उसाच्या शेताच्या जवळ काही इसम जमून दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत.  अशी माहिती मिळाल्याने पोलिसांच्या पथकाने याबाबत माहिती देवुन वरील अधिकारी व पोलीस अंमलदार असे 2 पंचासह प्राप्त माहितीच्या लगेच रवाना झाले. नमुद ठिकाणी आल्यानंतर पथकास उसाच्या शेतालगत आडोशास सुमारे 8 ते 10 इसम उभे असल्याचे दिसले. नमुद इसमांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची चाहुल लागताच ते पळून जाण्याचा प्रयत्नात असताना पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी नमुद इसमांना ताब्यात घेतले. त्याच्या कब्जातून 9 लाख 11 हजार 900 रुपये किमतीच्या 14 देशी बनावटीच्या पिस्टल व 22 जिवंत काडतूसे, मिरची पुड, कोयता असा मुद्देमाल जप्त केला असून त्यांचे विरुद्ध कराड शहर पोलीस ठाणेस दरोडा टाकण्याचे पूर्व तयारीचा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे.

पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित पाटील यांचे सूचनाप्रमाणे अजय कोकाटे, पोलीस निरीक्षक भगवानराव पाटील, पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षण रमेश गर्जे, संतोष पवार, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, विश्वास शिंगाडे, उदय दळवी, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, तानाजी माने, अतिश घाडगे, संतोष पवार, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष सपकाळ, शरद बेबले, साबीर मुल्ला, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, अमोल माने, मुनीर मुल्ला, शिवाजी भिसे, निलेश काटकर, मोहन पवार, प्रविण कांबळे, गणेश कापरे, रोहित निकम, विशाल प्रचार, सचिन ससाणे, मयुर देशमुख, मोहसिन मोमीन, धीरज महाडीक, पृथ्वीराज जाधव, प्रविण पवार, वैभव सावंत, कापरे, संभाजी साळूंखे, पंकज बेसके, येळवे, कुलदिप कोळी, अमित बाघमारे, सज्जन जगताप, सचिन निकम, सागर बर्गे यांनी सदरची कारवाई केलेली असून कारवाईत सहभाग घेतला.

Monday, March 27, 2023

छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण !; काल येवल्याहून नाशिकला परत येत असताना अचानक भुजबळ यांची प्रकृती बिघडली होती

वेध माझा ऑनलाइन - राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. काल येवल्याहून नाशिकला परत येत असताना अचानक भुजबळ यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे थंडी ताप वाढल्याने त्यांना तातडीने अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तपासणी करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता मात्र अधिक तपासणी केल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण  झाल्याची माहिती समोर आली आहे

कृष्णा'ला सहकारातील वैभवशाली कारखाना बनविण्यासाठी प्रयत्नशील : डॉ. अतुल भोसलेगळीत हंगामाची सांगता; १० लाख ६० हजार मे. टन गाळप

वेध माझा ऑनलाइन -  येत्या गळीत हंगामात उसाच्या नोंदीपासून ते ऊस गाळप होईपर्यंत चांगले नियोजन करून शेतकऱ्यांना अधिक चांगला दर द्यायचा आमचा प्रयत्न आहे. कृष्णा कारखान्याला सहकारातील एक वैभवशाली कारखाना बनविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी केले. य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२२-२३ च्या ६३ व्या गळीत हंगाम सांगता समारंभात ते बोलत होते.

प्रारंभी संचालक बाबासो शिंदे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुमन शिंदे यांच्या हस्ते गळीत हंगाम समाप्तीनिमित्त श्री सत्यनारायण पूजा संपन्न झाली. यावेळी व्हा. चेअरमन जगदीश जगताप, संचालक जितेंद्र पाटील, संजय पाटील, जे डी मोरे, बाजीराव निकम, बाबासो शिंदे, सयाजी यादव, विलास भंडारे, शिवाजी पाटील, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सी. एन. देशपांडे , प्र.कार्यकारी संचालक मुकेश पवार, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील, वैभव जाखले, माजी पं स सदस्य बाळासाहेब निकम, संजय पवार, टेक्निकल को ऑर्डीनेटर एस डी कुलकर्णी, मुख्य शेती अधिकारी प्रकाश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

डॉ. अतुल भोसले पुढे म्हणाले, चेअरमन डॉ. सुरेशबाबा यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यात संचालक मंडळाने गेली आठ वर्षे उत्कृष्टपणे कारभार केला आहे. आपण कारखाना तांत्रिक दृष्टया आणखी सक्षम करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. येणारा हंगाम लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने वाटचाल करणे आवश्यक आहे. त्यासाठी ऑफ सिझनची कामे वेळेत पूर्ण करावी लागणार आहेत. तसेच टप्याटप्याने कारखान्यात सुधारणा कराव्या लागणार आहेत. कारखान्याबरोबरच उपपदार्थ निर्मिती प्रकल्पाचे विस्तारही येत्या काळात करायचे आहेत.

ऊस तोडणी वाहतूकदार यांची बिले वेळेत देण्याबरोबरच हार्वेस्टर मशीनच्या अनुदानासाठी मी राज्य सरकार व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहे, अशी ग्वाही डॉ. अतुल भोसले यांनी दिली.

व्हाईस चेअरमन जगदीश जगताप म्हणाले, या हंगामात नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला. त्यामुळे गाळप कमी झाले. परंतु येत्या हंगामात कर्मचाऱ्यांना अधिक चांगले काम करून गळीत हंगाम यशस्वी पार पाडावा लागणार आहे.

कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सी.एन देशपांडे म्हणाले, शेतकरी सभासद, तोडणी वाहतूकदार, कंत्राटदार, अधिकारी व कर्मचारी या सर्वांच्या सहकार्याने येणारा गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडूया. तसेच आपण सर्वांनी मिळून कृष्णा कारखान्याचे नाव अधिक उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करूयात.

प्र. कार्यकारी संचालक मुकेश पवार यांनी प्रास्तविकात कारखान्याचा गळीत हंगामाचा आढावा सादर केला. ते म्हणाले, कृष्णा कारखान्याने १३० दिवसांमध्ये १० लाख ६० हजार मेट्रिक टन ऊसाचे गळीत केले असून, ११ लाख ७८ हजार २१० क्विंटल साखर निर्मिती केली आहे. कारखान्याचा यंदाचा साखर उतारा १२.६१ टक्के इतका राहिला आहे.

यावेळी ऊस तोडणी वाहतूकदार व शेती विभागाचे कर्मचारी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. शेतकरी सभासद, ऊस तोडणी वाहतूकदार, सर्व अधिकारी व कर्मचारी आदी याप्रसंगी उपस्थित होते. संचालक संजय पाटील यांनी आभार मानले.

कसब्यात टिळक कुटुंबातल्या कुणाला उमेदवारी का दिली नाही ; चंद्रकांत पाटील यांनी केला गौप्यस्फोट

वेध माझा ऑनलाइन - कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजपचा धक्कादायक पराभव झाला.।महाविकासआघाडीकडून रिंगणात उतरलेले रवींद्र धंगेकर यांनी हेमंत रासणे यांना धक्का दिला. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होत होती, पण भाजपने टिळक कुटुंबातल्या कुणालाही उमेदवारी दिली नाही. टिळक कुटुंबाला उमेदवारी नाकारणं भाजपच्या पराभवाचं कारण ठरल्याच्या चर्चाही झाल्या. तसंच उमेदवारी न मिळाल्यामुळे टिळक कुटुंब नाराज असल्याचंही बोललं गेलं.कसबा पेठ पोटनिवडणुकीतल्या या पराभवानंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी गौप्यस्फोट केला आहे. टिळक कुटुंबातल्या कुणाला उमेदवारी का दिली नाही, याचं कारण चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.
मुक्ता टिळक यांच्या आजारपणामुळे टिळक कुटुंबाचा मतदारांशी राजकीय संपर्क तुटला होता, त्यामुळेच कसबा पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबाबाहेर भाजपने उमेदवारी दिली, असा गौप्यस्फोट भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी एका वाहिनीशी बोलताना केला आहे. 
'ज्या घरातला माणूस जातो, त्या घरातल्या कुणालातरी तिकीट द्यावं लागतं. पण आजारपणामुळे मुक्ताताईंचं दिसणं, असणं, अस्तित्व हे संपलं होतं. त्यांचे पती आणि त्यांचा मुलगा यांना मुक्ताताईंच्या सेवेत इतका वेळ द्यावा लागला, त्यामुळे त्यांचा राजकीय आणि सामाजिक एक्जिस्टन्सही कमी झाला होता. मुक्ताताई चांगल्या कार्यकर्त्या होत्या, म्हणून त्या महापौर झाल्या, आमदारही झाल्या. त्यांचे पती सक्रीय आणि त्यांचा मुलगा आमचा पदाधिकारी, पण घरातल्या परिस्थितीमुळे त्यांचा एक्जिस्टन्स कमी झाला,' असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

डॉ. अतुलबाबा भोसले यांचा आज वाढदिवस ; . अतुलबाबा भोसले आज सकाळ पासून रेठरे येथील निवासस्थानी शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार ;

वेध माझा ऑनलाइन ;  भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी तथा कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुलबाबा भोसले यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे. त्यानिमित्ताने आज मंगळवारी  डॉ. अतुलबाबा भोसले हे सकाळी ८ पासून रेठरे बुद्रुक इंजिन पाणंद येथील निवासस्थानी शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार असून नागरिकांनी हार, तुरे, बुके न आणता शालेपयोगी साहित्य शुभेच्छा स्वरूपात आणावे, असे आवाहन वाढदिवस संयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

दरम्यान, डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त कराड दक्षिण मतदारसंघात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. सोमवार दि. २७ मार्च रोजी शेरे येथे सायंकाळी ७ वाजता प्रा. श्रीधर साळुंखे यांचे व्याख्यान, २८ मार्च रोजी सकाळी ९ वाजता रिमांड होम येथे भोजन वाटप, सकाळी ९.३० वाजता कराड उपजिल्हा रुग्णालय आणि कोळे येथील जिजाऊ अनाथाश्रमात फळे व खाऊ वाटप, नेर्ले येथे वृद्धाश्रमात मध्यान्ह व सायंकाळ भोजन वाटप, तसेच नांदगाव येथे सकाळी १०.३० वाजता सर्वरोग निदान व दंत चिकित्सा शिबीर आणि रेठरे बुद्रुक येथे सायंकाळी ७ वाजता गणेश शिंदे यांचे 'जीवन सुंदर आहे' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

बुधवारी २९ मार्च रोजी गोंदी येथे सकाळी १० वाजता ठेव पावती वितरण समारंभ व अल्पदरात कृषी साहित्य वाटप, सायंकाळी ५ वाजता मलकापूर येथे भव्य बैलगाडी शर्यती, सायंकाळी ६ वाजता नांदगाव येथे स्नेहमेळावा, रेठरे बुद्रुक येथे सायंकाळी ७ वाजता 'खेळ पैठणीचा', तसेच चचेगाव येथे सायंकाळी ८ रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. 

गुरुवारी ३० मार्च रोजी कार्वे येथे सकाळी १० वाजता भव्य रक्तदान शिबिर, रेठरे बुद्रुक येथे सकाळी १० वाजता प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धा, कोडोली येथे सकाळी ११ वाजता महिला सक्षमीकरण व बचत गट मार्गदर्शन कार्यक्रम, कराड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सायंकाळी ७ वाजता जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा, ३१ मार्च रोजी कराड येथे वेणूताई चव्हाण सभागृहात आयुष्यमान भारत स्मार्ट कार्ड वाटप व आशा सेविका यांचा सन्मान, मलकापूर येथे सायंकाळी ४ वाजता सिनेअभिनेत्री डॉ. भाग्यश्री शिंदे यांचा मनोरंजनात्मक कार्यक्रम, तसेच ओंड येथे दुपारी २ वाजता भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवारी १ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता कोयना वसाहत येथे नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू तपासणी शिबीर ,  वारुंजी येथे सायंकाळी ५ वाजता भव्य बैलगाडी शर्यती व कराड येथील प्रीतिसंगम घाटावर सायंकाळी ६ वाजता 'होम मिनिस्टर' कार्यक्रम, रविवारी २ एप्रिल रोजी कराड शिवाजी विद्यालय आवारात सकाळी ६ वाजता भव्य मॅरेथॉन स्पर्धा, सकाळी ११ वाजता आटके टप्पा येथील विराज मल्टिपर्पज हॉलमध्ये कृष्णा बँकेचे खातेदार, उद्योजक व व्यावसायिकांचा मार्गदर्शन मेळावा आणि सायंकाळी ६.३० वाजता कराड येथील प्रीतिसंगम घाटावर 'भूपाळी ते भैरवी' या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

सोमवारी दि. ३ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता कराड येथील प्रीतिसंगम घाटावर ग. दि. माडगूळकर यांचे 'गीतरामायण', ५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता घोणशी येथे भव्य बैलगाडी शर्यती, ६ एप्रिल रोजी रेठरे खुर्द येथे सायंकाळी ७ वाजता क्रिकेट स्पर्धा, ८ एप्रिलला सैदापुर येथे सकाळी १० वाजता शालेय साहित्य व फळे वाटप, ९ एप्रिल रोजी सैदापुर येथील समर्थ मल्टिपर्पज हॉलमध्ये दुपारी २ वाजता 'खेळ पैठणीचा' व सायंकाळी ८ वाजता महिलांचा फॅशन शो असे विविधांगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, असे संयोजन समितीच्यावतीने कळविण्यात आले आहे. 

क्रिकेटपटू केदार जाधव याचे वडील पुण्यातून झाले बेपत्ता ; यांच्याजवळ असलेला फोनही लागतोय बंद ;

वेध माझा ऑनलाइन - टीम इंडियाचा क्रिकेटपटू केदार जाधव याचे वडील पुण्यातून बेपत्ता झाले आहेत. केदार जाधवचे वडील महादेव जाधव गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील कोथरूड भागातून आज सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास केदारचे वडील बेपत्ता झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार केदार जाधव याचं कुटुंब कोथरूड भागात राहतं. महादेव जाधव आज सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास रिक्षाने बाहेर गेले, पण आतापर्यंत त्यांचा शोध लागलेला नाही. महादेव जाधव यांच्याजवळ असलेला फोनही बंद आहे. केदार जाधवच्या कुटुंबाने पोलिसांकडे महादेव जाधव हरवल्याची तक्रार दिली आहे. आता पोलीस महादेव जाधव ज्या रिक्षेने गेले, त्या रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत. रिक्षाचालकाचा शोध लागल्यानंतर केदार जाधवचे वडील रिक्षेतून नेमके कुठे उतरले आणि नंतर कुठे गेले, याचा शोध घेणं पोलिसांना सोपं जाणार आहे.
2019 वनडे वर्ल्ड कपनंतर केदार जाधव टीम इंडियाकडून खेळलेला नाही. सुरूवातीपासूनच केदार जाधव महाराष्ट्राकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत आहे. रणजी ट्रॉफीच्या या मोसमातही केदार जाधव महाराष्ट्राकडूनच खेळला आहे. अनेक वर्षांपासून केदार जाधव हा पुण्यात राहत आहे.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची तब्बेत अचानक बिघडली,...; वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन - राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रकृतीबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. येवल्याहून नाशिकला परत येत असताना अचानक भुजबळ यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे थंडी ताप वाढल्याने त्यांना तातडीने अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तपासणी करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

छगन भुजबळ हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने येवल्याला गेले होते. येवल्यावरून परत येत असताना अचानक त्यांची तब्येत बिघडली. ताप आणि थंडी वाढल्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यांना तातडीने वाटेत अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी केली. त्यानंतर त्यांना घरी जाण्यास मुभा दिली. त्यांची प्रकृती स्थिर आहे. घाबरण्याचं कोणतंही कारण नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं. सध्या भुजबळ हे नाशिक मधल्या घरी पोहोचले आहे.
दरम्यान, भुजबळ हे पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. 'राहुल गांधी प्रकरण याचा ओबीसीशी संबंध नाही. मोदी साहेबांनी का नाही इम्पिरिकल डेटा दिला. तुम्ही ओबीसी लोकांना का पाठिंबा दिला नाही. जे लोक बाहेर पळून गेले, ते ओबीसी नाही. देशातले सगळे विरोधी पक्ष राहुल गांधी यांना सपोर्ट करत आहे, असंही भुजबळ म्हणाले.




महसूल विभागात खळबळ ; सैदापूर येथील मंडलाधिकारी विनायक दिलीप पाटील यांला 10 हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडले ;

वेध माझा ऑनलाइन - सैदापूर ता. कराड येथील मंडलाधिकारी विनायक दिलीप पाटील यांला 10 हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. या लाचलुचपतच्या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. संशयित आरोपी विनायक पाटील यांचा शोध घेणे सुरू आहे

याबाबतची अधिक माहिती अशी, तक्रारदार याने खरेदी केलेल्या जमिनीच्या दस्ताच्या नोंदीवर हरकत आल्याने त्याची सुनावणी वर आदेश काढून तशी नोंद धरण्याकरिता व सातबारा उतारा देण्याकरता 15 हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती. परंतु तडजोडीअंती खाजगी इसम मंगेश उत्तम गायकवाड रा. सुपने, ता. कराड यांच्या कडून 10 हजार रुपये लाच स्वीकारले.पुणे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, सातारा पोलीस उप अधीक्षकम श्रीमती उज्वल वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विक्रम पवार, पोलीस नाईक राजपुरे व जाधव यांनी ही कारवाई केली.

Sunday, March 26, 2023

डॉ अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त होणार भरगच्च कार्यक्रम ; रेठरे बुद्रुक येथे मंगळवारी अभिष्टचिंतन सोहळा; शुभेच्छा स्वरूपात शालेपयोगी साहित्य देण्याचे आवाहन...

वेध माझा ऑनलाइन - भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी तथा कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुलबाबा भोसले यांचा वाढदिवस मंगळवार दि. २८ मार्च रोजी साजरा होत आहे. यानिमित्त २७ मार्च ते ९ एप्रिलपर्यंत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, मंगळवारी (ता. २८) डॉ. अतुलबाबा भोसले हे सकाळी ८ पासून रेठरे बुद्रुक इंजिन पाणंद येथील निवासस्थानी शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार असून; नागरिकांनी हार, तुरे, बुके न आणता शालेपयोगी साहित्य शुभेच्छा स्वरूपात आणावे, असे आवाहन वाढदिवस संयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त कराड दक्षिण मतदारसंघात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सोमवार दि. २७ मार्च रोजी शेरे येथे सायंकाळी ७ वाजता प्रा. श्रीधर साळुंखे यांचे व्याख्यान, २८ मार्च रोजी सकाळी ९ वाजता रिमांड होम येथे भोजन वाटप, सकाळी ९.३० वाजता कराड उपजिल्हा रुग्णालय आणि कोळे येथील जिजाऊ अनाथाश्रमात फळे व खाऊ वाटप, नेर्ले येथे वृद्धाश्रमात मध्यान्ह व सायंकाळ भोजन वाटप, तसेच नांदगाव येथे सकाळी १०.३० वाजता सर्वरोग निदान व दंत चिकित्सा शिबीर आणि रेठरे बुद्रुक येथे सायंकाळी ७ वाजता गणेश शिंदे यांचे 'जीवन सुंदर आहे' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

बुधवारी २९ मार्च रोजी गोंदी येथे सकाळी १० वाजता ठेव पावती वितरण समारंभ व अल्पदरात कृषी साहित्य वाटप, सायंकाळी ५ वाजता मलकापूर येथे भव्य बैलगाडी शर्यती, सायंकाळी ६ वाजता नांदगाव येथे स्नेहमेळावा, रेठरे बुद्रुक येथे सायंकाळी ७ वाजता 'खेळ पैठणीचा', तसेच चचेगाव येथे सायंकाळी ८ रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. 

गुरुवारी ३० मार्च रोजी कार्वे येथे सकाळी १० वाजता भव्य रक्तदान शिबिर, रेठरे बुद्रुक येथे सकाळी १० वाजता प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धा, कोडोली येथे सकाळी ११ वाजता महिला सक्षमीकरण व बचत गट मार्गदर्शन कार्यक्रम, कराड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सायंकाळी ७ वाजता जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा, ३१ मार्च रोजी कराड येथे वेणूताई चव्हाण सभागृहात आयुष्यमान भारत स्मार्ट कार्ड वाटप व आशा सेविका यांचा सन्मान, मलकापूर येथे सायंकाळी ४ वाजता सिनेअभिनेत्री डॉ. भाग्यश्री शिंदे यांचा मनोरंजनात्मक कार्यक्रम, तसेच ओंड येथे दुपारी २ वाजता भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवारी १ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता कोयना वसाहत येथे नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू तपासणी शिबीर ,  वारुंजी येथे सायंकाळी ५ वाजता भव्य बैलगाडी शर्यती व कराड येथील प्रीतिसंगम घाटावर सायंकाळी ६ वाजता 'होम मिनिस्टर' कार्यक्रम, रविवारी २ एप्रिल रोजी कराड शिवाजी विद्यालय आवारात सकाळी ६ वाजता भव्य मॅरेथॉन स्पर्धा, सकाळी ११ वाजता आटके टप्पा येथील विराज मल्टिपर्पज हॉलमध्ये कृष्णा बँकेचे खातेदार, उद्योजक व व्यावसायिकांचा मार्गदर्शन मेळावा आणि सायंकाळी ६.३० वाजता कराड येथील प्रीतिसंगम घाटावर 'भूपाळी ते भैरवी' या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

सोमवारी दि. ३ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता कराड येथील प्रीतिसंगम घाटावर ग. दि. माडगूळकर यांचे 'गीतरामायण', ५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता घोणशी येथे भव्य बैलगाडी शर्यती, ६ एप्रिल रोजी रेठरे खुर्द येथे सायंकाळी ७ वाजता क्रिकेट स्पर्धा, ८ एप्रिलला सैदापुर येथे सकाळी १० वाजता शालेय साहित्य व फळे वाटप, ९ एप्रिल रोजी सैदापुर येथील समर्थ मल्टिपर्पज हॉलमध्ये दुपारी २ वाजता 'खेळ पैठणीचा' व सायंकाळी ८ वाजता महिलांचा फॅशन शो असे विविधांगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, असे संयोजन समितीच्यावतीने कळविण्यात आले आहे. 

Saturday, March 25, 2023

मोदींच्या डोळ्यात मी भीती पाहिली. संसदेतील माझ्या भाषणाला ते घाबरले म्हणून माझी खासदारकी रद्द केली ; राहुल गांधी यांचा हल्लाबोल

वेध माझा ऑनलाइन -  २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी आडनावावरून केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी राहुल गांधी यांना सूरत न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द केलं. राहुल गांधी यांच्या शिक्षेच्या अंमलबजावणीला सध्या स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान, खासदारकी रद्द केल्यानंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

देशात लोकशाहीवर आक्रमण होत असल्याचं म्हणत राहुल गांधी यांनी आपल्यावर झालेले आरोप खोटे असल्याचं म्हटलं. ससंदेत माझ्यावर खोटे आरोप झाले. माझी खासदारकी रद्द करून मला गप्प बसवू शकत नाहीत. मी लोकशाहीसाठी लढतोय आणि लढत राहणार. मला कुणीही घाबरवू शकत नाही असं राहुल गांधी म्हणाले.
संसदेत मी पुरावे दिले आणि फोटोही दाखवले. संसदेत मंत्र्यांनी माझ्याबाबत खोटं सांगितलं. मोदींच्या डोळ्यात मी भीती पाहिली. संसदेतील माझ्या भाषणाला ते घाबरले म्हणून माझी खासदारकी रद्द केली असंही राहुल गांधी म्हणाले.

मी लोकसभा अध्यक्षांना पत्रे लिहून सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे. वक्तव्यांबाबत आणि त्याच्या संदर्भात मी सर्व काही सांगितलं आहे. मुद्दा भरकटवण्यासाठी आणि प्रश्नांपासून पळण्यासाठी खासदारकी रद्द करण्याचा घाट घालण्यात आल्याचं म्हणत राहुल गांधींनी केंद्र सरकारवर घणाघात केला

राहूल गांधी यांना जेलमध्ये ठेवलं पाहिजे, घाण्याला जुंपलं पाहिजे ; मुख्यमंत्री शिंदेंची राहुल गांधींच्या सावरकर विधानावरून टीका ;

वेध माझा ऑनलाइन - सावरकर हे देशाचा अभिमान आहे. राहूल गांधी यांना त्या जेलमध्ये ठेवलं पाहिजे आणि त्या घाण्याला जुंपलं पाहिजे. मग त्यांना कळेल. आज ही ते म्हणाले की माफी मागायाला मी सावरकर आहे का? त्यांना याची शिक्षा मिळाली पाहिजे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहामध्ये निवेदन दिलं. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या सावरकर विधानावरून टीका केली.

'हा कायदा काँग्रेसने केला आहे. त्यानुसार लालू प्रसाद यादव आणि इतर लोकांवर यांची कारवाई झाली. त्यावेळी कोणी निदर्शने केली नाही. त्यावेळी कोणी म्हणाले नाही की लोकशाही धोक्यात आहे. त्यावेळी राहुल गांधी यांनी अध्यादेश फाडला होता. लोकसभेने ती कारवाई केली आहे. महाराष्ट्रातील जनता त्यांना माफ करणार नाही. रस्तावर फिरु देणार नाही. ओबीसी समाजाचा अवमान केल्यामुळे त्याचा जाहीर निषेध करतो, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवरील कारवाईचं समर्थन करत आज टीका केली.


काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे पुन्हा सावरकरांवर वादग्रस्त विधान ;

वेध माझा ऑनलाइन - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा विनायक सावकर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. शिवसेनेचं हिंदुत्व बेगडी असल्याचं सांगत भाजपने ठाकरेंवर हल्ला केलाय. सावरकरांवर काँग्रेसने केलेल्या टिकेचा उल्लेख करत भाजपने शिवसेनेला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. युवासेना प्रमुख (ठाकरे गट) आदित्य ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अनेक पक्षाच्या वेगवेगळ्या भुमिका असतात. पण, आम्हाला सावरकरांबाबत त्यांची भुमिका मान्य नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

राहुल गांधी काय म्हणाले?
मानहानीच्या प्रकरणात खासदारकी रद्द केल्यानंतर शनिवारी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने त्यांना लंडनमध्ये दिलेल्या भाषणाबाबत प्रश्न विचारला असता राहुल गांधी चांगलेच संतापलेले दिसले. भाजप नेते तुम्हाला संसदेत माफी मागायला सांगत होते, मग तुम्ही माफी का मागितली नाही, असा सवाल राहुल गांधींना करण्यात आला. तुम्ही याबद्दल काय विचार करता? या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधींनी उत्तर देताना, माझे नाव सावरकर नाही, माझे नाव गांधी आहे. गांधी कोणाची माफी मागत नाहीत असे ते म्हणाले

आदित्य ठाकरे काय म्हणाले?
राहुल गांधी यांच्या विधानानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनेक पक्षाच्या वेगवेगळ्या भुमिका आहेत. तशी काग्रेसची देखील एक भुमिका आहे. पण आम्हाला सावरकरांबाबत त्यांची भुमिका मान्य नाही. जसं भाजप पीडीपी बरोबर गेली ते सुद्धा आम्हाला मान्य नव्हते, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी भाजपलाच टोला लगावला आहे. प्रत्येकाचा विचार वेगळा आहे. ही लोकशाहीसाठी असलेली लढाई, असल्याचेही ठाकरे म्हणाले.

मोदी सरकारवर हल्लाबोल करताना काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, 'मी प्रश्न विचारणे सोडणार नाही. अदाणींचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी काय संबंध आहे? मी या लोकांना घाबरत नाही. जर त्यांना वाटत असेल की माझी खासदारकी रद्द करून, धमकावून, मला तुरुंगात पाठवून ते मला बंद करू शकतात. पण, मी भारताच्या लोकशाहीसाठी लढत आहे आणि लढत राहीन.

कराडच्या दत्त चौकात राहुल गांधींच्या पुतळ्याला जोड्याने मारले ; कराडसह जिल्ह्यातील भाजप आक्रमक ;

वेध माझा ऑनलाइन - सगळे मोदी नावाचे चोर का असतात असा सवाल करणाऱ्या राहुल गांधींना नुकतीच 2 वर्षाची शिक्षा झाली आहे तसेच त्यांची खासदारकी देखील रद्द करण्यात आली आहे दरम्यान त्यांच्या या वक्तव्याने समस्त ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत हा समस्त ओबीसी समाजाचा अपमान आहे बाहेरच्या देशात जाऊन ते भारताची बदनामी  करत आहेत एकूणच या सगळ्या कारणाने आज कराड येथील दत्त चौकात भाजप ओबीसी समाजाच्या वतीने राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात आले तसेच त्यांच्या विरोधात घोषणाही देण्यात आल्या त्यांचा निषेधही यावेळी ओबीसी समाजाने केला

यावेळी भाजप ओबीसी समाजाचे सर्व पदाधिकारी महिला तसेच शहर व तालुका  स्तरावरील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

Friday, March 24, 2023

मी भाजपमध्ये नाराज नाही ; विनोद तावडे यांची स्पष्टोक्ती ; म्हणाले, राहुल गांधींच्यात राजकीय परिपक्वता नाही ;

वेध माझा ऑनलाइन - मी आणि पंकजा मुंढे भाजपमध्ये नाराज होतो हा चुकीचा समज आहे मी नाराज असतो तर कुठेतरी तसे आलेही असते मात्र, तसे काहीच नाही मी राज्यात मंत्री होतो आणि सध्या पक्षाचा पदाधिकारी आहे ही अडजेस्टमेंट नाही तर आमच्या पक्षात जो आदेश दिला जातो त्याचे पालन केले जाते अशी पद्धत आहे असा खुलासा भाजप चे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी आज पत्रकार परिषदेत केला दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे बोलणे वागणे राजकीय ड्रीष्टीने परिपक्व नसल्याचेही विधान तावडे यांनी यावेळी केले 

केंद्राच्या लोकसभा प्रवास योजनेंतर्गत सातारा लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीसाठी कराड येथे आले असता कराडच्या सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते
भाजपचे राज्याचे पदाधिकारी डॉ अतुल भोसले विक्रम पावसकर तसेच कराड उत्तरचे नेते रामकृष्ण वेताळ धैर्यशील कदम मनोज घोरपडे यांच्यासह शहर अध्यक्ष एकनाथ बागडी तसेच अनेक महिला पदाधिकारी कार्यकर्ते आणि सातारा लोकसभा प्रवास समितीचे जिल्ह्याचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते

ते पुढे म्हणाले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारणात हिंदुत्व आणले मात्र काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीला मांडीला लावून उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व संपवण्यासाठी प्रयत्न केले त्यांना लोक स्वीकारणार नाहीत शिवसेनेने सोडलेले हिंदुत्व व त्यामुळे त्यांच्यापासून लांब गेलेली 8 टक्के हिंदूत्वाची मते भाजप मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे असेही ते म्हणाले मनसे बरोबर भाजपची युती होण्याची शक्यता तावडे यांनी फेटाळून लावली

भाजप ने आता लोकसभा प्रवास योजना राबवण्यास सुरुवात केली आहे राज्यातील 48 पैकी 18 लोकसभा मतदार संघात याची प्रत्यक्ष अमलबजावणी सुरु झाली आहे पंतप्रधान मोदींनी सुरू केलेल्या गरीब कल्याणकारी योजना किती लोकांपर्यंत पोचल्या याचा याद्वारे आढावा घेण्यात येणार आहे तसेच त्या त्या राज्यात बद्दललेली राजकीय समीकरणे याबाबतचा ही आढावा यातून घेण्यात येईल 40 केंद्रीय मंत्री या प्रवास योजनेत सहभागी होऊन दिल्लीतला मंत्री गल्लीत या योजनेअंतर्गत सहभागी झालेले दिसणार आहेत असेही तावडे यावेळी म्हणाले

काँग्रेस ला झटका ; राहुल गांधी यांची खासदारकी रद्द ; मोठी बातमी;

वेध माझा ऑनलाइन - मोदी आडनावाविरोधात वादग्रस्त विधान केल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरात मधील सुरत कोर्टाकडून २ वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली होती, त्यामुळे आता त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभेच्या अध्यक्षांनी त्यांच्यावर ही मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.

राहुल गांधी हे केरळमधील वायनाड मतदारसंघाचे खासदार आहेत. सुरत न्यायालयाने त्यांना २ वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणी भाजप नेत्यांनी केली होती. त्यानंतर आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द केलं आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.

Thursday, March 23, 2023

शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन संजय राऊतांची हकालपट्टी, ‘या’ ज्येष्ठ नेत्याची नेतेपदी निवड

वेध माझा ऑनलाइन - शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर संसदीय नेतेपदी खासदार गजानन किर्तीकर यांची निवड करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून महिती दिली. संजय राऊतांना संसदीय नेतेपदावरुन हटवून शिंदे यांनी ठाकरे गटला मोठा धक्का दिला आहे.

शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्ष टोकला गेला आहे. यातच निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्याने यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयावरुन ठाकरे गट आक्रमक झाला असून खासदार संजय राऊत हे सातत्याने शिंदे गटावर हल्लाबोल करत आहेत. यावरुन शिंदे गटाच्या आमदारांनी पलटवार करताना राऊतांनी आधी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि नंतर आमच्यावर टीका करावी असे म्हटले आहे. त्यातच आता संजय राऊतांची संसदीय नेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

लोकसभेतील 18 पैकी 13 खासदार शिंदे गटात सामिल झाले आहेत.त्यामुळे शिंदे गटाकडून संसदेतील शिवसेनेच्या गटनेतेपदी खासदार राहुल शेवाळे यांची यापूर्वीच नियुक्ती केली आहे.आता खासदार संजय राऊत यांना शिवसेनेच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदावरुन हकालपट्टी केली असून त्यांच्या जागी ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती केली आहे.दरम्यान यासंदर्भात काही दिवसांपूर्वीच राहुल शेवाळे यांनी पत्रकारांना तशी माहिती दिली होती.त्यानुसार, गुरुवारी ही निवड करण्यात आली आहे.

राहुल गांधी दोषी, दोन वर्षांची शिक्षा ; काय आहे प्रकरण ?


वेध माझा ऑनलाइन -  राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून केलेली टीका महागात पडली आहे. मोदी आडनावावरून अपमान केल्याच्या आरोपाखाली दाखल झालेल्या खटल्यात राहुल गांधींना सुरतच्या न्यायालयाने दोषी ठरविले आहे. 

राहुल गांधी यांनी २०१९ च्या लोकसभा प्रचारावेळी मोदींवर टीका करताना सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे काय असा सवाल केला होता. याविरोधात गुजरातमधील मोदी समाजाने राहुल गांधींवर खटला दाखल केला होता. सुरतच्या सीजेएम कोर्टाने सकाळी ११ वाजता आपला निर्णय दिला आहे. 
राहुल गांधी आज या कोर्टात पोहोचले होते. यावेळी कोर्टाने राहुल गांधींना तुम्हाला यावर काही सांगायचे आहे का असे विचारले. यावेळी राहुल यांनी मी नेहमी भ्रष्टाचाराविरोधात बोलतो. मी कोणाच्या विरोधात मुद्दामहून बोललो नाही. यामुळे कोणाला नुकसान झालेले नाही, असे सांगितले. सुरतच्या जिलल्हा सत्र न्यायालयात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला होता. 
या प्रकरणी निकाल देताना न्यायालयाने आयपीसीच्या कलम ५०४ अन्वये मानहानीच्या आरोपाखाली दोषी ठरवले. आयपीसीच्या कलम ५०४ मध्ये दोषी आढळल्यास दोन वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे. न्यायालयाने निर्णय जाहीर केला असून राहुल यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यानंतर राहुल यांना लगेचच जामिनही दिला आहे.

Wednesday, March 22, 2023

"त्या' रात्री मदन कदमसह कुटुंबाला मारहाण ; 10 जणांवर पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ; मदन कदम याचा मुलगा गौरव कदम याने दिली फिर्याद ;

वेध माझा ऑनलाईन - पाटण तालुक्यात शिंद्रुकवाडीमध्ये रविवारी रात्री ठाण्याचे माजी नगरसेवक मदन कदम याने श्रीरंग जाधव आणि सतीश सावंत याच्यावर गोळ्या झाडल्या. या प्रकरणी पोलिसांनी मदन कदम याला अटक केली आहे. मात्र, त्या रात्री कदमसह कुटुंबाला मारहाण करण्यात आली होती. आणि या प्रकरणी आता 10 जणांवर पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मदन कदम याचा मुलगा गौरव कदम याने फिर्याद दिली आहे. 

दरम्यान,  गौरव कदम याने दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, रविवारी रात्री कारची काच फोडल्याचा राग मनात धरून आठ वाजण्याच्या सुमारास श्रीरंग जाधव यांच्यासह दहाजण घराच्या कंपाउंडमधून आत घुसले. त्यांनी वडील मदन कदम, भाऊ योगेश कद6म व मला लाकडी दांडके, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान माजी नगरसेवक मदन कदम याचा मुलगा गौरव कदम याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी श्रीरंग जाधव यांच्यासह अनोळखी नऊजणांचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विकास पाडळे करीत आहेत.दरम्यान ज्या बंदुकीतून गोळीबार केला, ती बंदूक पोलिसांनी जप्त केली आहे. झाडलेल्या गोळ्यांपैकी तीन गोळ्या श्रीरंग जाधव व सतीश सावंत यांना लागल्या. कदम याने बारा बोअरच्या बंदुकीतून गोळीबार केला होता. तसेच ज्या बंदुकीतून गोळीबार केला त्या बंदुकीचा परवाना असल्याचेही तपासातून समोर आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘राष्ट्रीय दर्जा’ धोक्यात ?निवडणूक आयोगाकडून फेरविचार सुरू

वेध माझा ऑनलाईन - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘राष्ट्रीय दर्जा’चा निवडणूक आयोगाकडून फेरविचार करत असल्याची बाब समोर आली आहे. मंगळवारी आयोगासमोर पक्षाच्या वतीने बाजू देखील मांडण्यात आली.  प्रफुल्ल पटेल यांच्यासह पक्षाचे वकील सुनावणीला हजर असल्याची  माहिती सूत्रांनी दिली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम ठेवावा का याबाबत सध्या निवडणूक आयोगाकडून चाचपणी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. नुकतेच आयोगाच्या कार्यालयात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना देखील आपलं म्हणण मांडण्यासाठी बोलावण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्यानुसार स्वतः राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल हे आयोगाच्या कार्यालयातून जाऊन आले आहेत 
मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून निवडणूक आयोगाने सध्या राष्ट्रीय दर्जा कायम ठेवण्यासाठी फेरआढावा घेण्यास सुरुवात केली आहे. या निर्णयाचा फेरविचार करावा अशी विनंती करण्यात आल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोबतच निवडणूक आयोगाच्यावतीने याआधी मायावती यांचा बसप, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांनाही 2019 साली निवडणूक आयोगाकडून नोटीस बजावण्यात आली होती. त्या वर्षीचा लोकसभा निवडणुकीतील संबंधित पक्षाची कामगिरी पाहता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा का काढून घेऊ नये असा सवाल उपस्थित करण्यात आला होता.  या संपूर्ण प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जाणार असल्याच्या बातम्या धुडकावून लावल्या आहेत. तसेच प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात गेलेल्या राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाची आणि निवडणुक आयोगातील अधिकाऱ्यांची सकारात्मक चर्चा झाली असून पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा अबाधित राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य महाराष्ट्रासह नागालँड, केरळ आणि झारखंड या राज्यात  आहेत. तसेच निवडणूक आयोगाने घातलेल्या अटी शर्थी पूर्ण करत असल्यामुळे आम्हांला अडचण नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं म्हणणं आहे.  मात्र आता निवडणूक आयोग काय निर्णय घेतोय याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे.


कराडमध्ये शंभू स्मारकाच्या बांधकामास प्रारंभ ; शहर व परिसरातील शिवशंभूप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती ;

वेध माझा ऑनलाईन - येथील शंभू तीर्थावर स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्याच्या बांधकामाचा प्रत्यक्ष शुभारंभ गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करवडीचे मठाधिपती विजयलिंग महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक, शिवशंभूप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कराडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक व्हावे, अशी कराडकर नागरिकांची गेल्या अनेक वर्षांची मागणी आता पूर्णत्वास जात आहे. या स्मारकासाठी स्थापन झालेल्या स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीने सचिव रणजितनाना पाटील यांच्या माध्यमातून केलेल्या पाठपुरावामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या स्मारकासाठी सुमारे आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. निधी मंजूर झाल्यानंतर या स्मारकाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आज प्रत्यक्ष स्मारकाच्या बांधकामास प्रारंभ झाला. या कामाची मदत सुमारे दोन वर्षे आहे. या माध्यमातून राज्यातील भव्य स्मारक कराडला उभारण्यात येणार आहे. आज शंभुतीर्थावर मठाधिपती विजयलिंग महाराज यांच्या हस्ते बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. तत्पूर्वी सौ. रूपाली तोडकर व प्रमोद तोडकर यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. गुढी उभारण्यात आली. सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पिसाळ याही यावेळी उपस्थित होत्या. या कार्यक्रमास स्मारक समितीचे  सचिव रणजितनाना पाटील, तसेच घनःश्याम पेंढारकर, एकनाथ बागडी, राजेंद्र माने, राजेंद्रआबा यादव, शिवराज इंगवले, मुकुंद चरेगावकर,महादेव पवार, विष्णू पाटसकर, समितीचे सर्व सदस्य, माजी नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी, शहर व तालुक्यातील शिवशंभूप्रेमी तसेच कराड तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाचे सर्व समन्वयक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खाजगी ट्रॅव्हल्सकडूनही महिलांना ५० टक्के सूट ; गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर अमलबजावणी सुरू ;

वेध माझा ऑनलाईन ; राज्य सरकारने एसटी महामंडळाच्या बसमध्ये महिला प्रवाशांना ५० टक्के सूट देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर याची अंमलबजावणीसुद्धा केली जात आहे. दरम्यान, खाजगी ट्रॅव्हल्सकडूनही बसमध्ये महिलांना ५० टक्के सूट देण्याची घोषणा चंद्रपूरमध्ये कऱण्यात आलीय. चंद्रपूर-गडचिरोली ट्रॅव्हल्स असोसिएशनने ही घोषणा केली. संघटनेची काल बैठक झाल्यानतंर हा निर्णय घेतला गेला. याची अंमलबजावणी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू झालीय.


राज्याचा अर्थसंकल्प जाहीर करताना उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक घोषणा जाहीर केल्या. यामध्ये एसटी प्रवासात महिलांना प्रवास तिकिट दरात ५० टक्के सवलत देणार असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर आता चंद्रपूर गडचिरोली ट्रॅव्हल्स असोसिएशनने महिला प्रवाशांना खाजगी बसमध्ये ५० टक्के सूट देण्याचं जाहीर केलंय. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. खाजगी बसमधूनही प्रवास करताना सूट मिळणार असल्याने महिलांनी याबाबत आनंद व्यक्त केलाय. 

राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयाचं खाजगी ट्रॅव्हल्स मालकांकडून स्वागत करण्यात आलं आहे. तसंच खाजगी ट्रॅव्हल्सनेसुद्धा मोठ्या प्रमाणावर महिला प्रवास करतात. या महिलांच्या सन्मानासाठी आम्ही तिकिटात ५० टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला असल्याचं असोसिएशनचे अध्यक्ष चंदन पाल यांनी सांगितलं.राज्य सरकारनंतर खाजगी ट्रॅव्हल्सकडून घेण्यात आलेल्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो असं महिला प्रवाशांनी म्हटलंय. या निर्णयामुळे महागाईचा भारही कमी होईल अशा शब्दात महिला प्रवाशांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

राज ठाकरे मुखमंमंत्री होऊ शकतात ; संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य ;

वेध माझा ऑनलाईन - आज मनसेचा पाडवा मेळावा होणार आहे. शिवाजी पार्कवर होणाऱ्या या मेळाव्यासाठी मनसैनिकांकडून जोरदार तयारी सुरू आहे. मात्र मेळाव्यापूर्वी शिवाजी पार्क परिसरात आणि शिवसेना भवनासमोर मनसेकडून लावण्यात आलेले पोस्टर सर्वाचं लक्ष वेधून घेत आहेत. या पोस्टरवर जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री म्हणून राज ठाकरे यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या पोस्टरवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांनी शिवसेना भवनासमोर लावलेल्या त्या पोस्टरवर प्रतिक्रिया दिली आहे. देशात लोकशाही आहे. कोणी ही मुख्यमंत्री होऊ शकतो. आमचा लोकशाहीवर विश्वास आहे. त्यांच्याकडे बहुमत असेल तर होऊ शकतात. बहुमत हे चंचल असतं. आज आमच्याकडे असेल उद्या दुसऱ्या कोणाकडे असेल असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना राऊत यांनी केंद्र सरकारला देखील जोरदार टोला लगावला आहे.  महाराष्ट्राची गुढी म्हणून शिवसेनेचा उल्लेख कोला जातो.  त्या गुढीवर केंद्र सरकारने मोगलाईन पद्धतीनं आक्रमक केले आहे. त्यामुळे राज्यातील जनता दुःखी आहे. पण जनतेचा संकल्प आहे, नव्या वर्षात ही गुढी घराघरात उभारल्या शिवाय राहणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Tuesday, March 21, 2023

सोलापुरात शालेय पोषण आहाराच्या तांदळामध्ये आढळला चक्क प्लास्टिकचा तांदूळ ; शाळकरी मुलांचे आरोग्य धोक्यात ; सोलापूरमध्ये खळबळ ;

वेध माझा ऑनलाईन - आपण बाजारातून किंवा रेशन कार्डद्वारे आणलेल्या धान्यामध्ये खडे किंवा कचऱ्याची भेसळ पाहतो. धान्य शेतातून येत असल्याचं आपण गृहित धरुन सर्व धान्य साफ करतो. मात्र, तांदळात प्लास्टिकची भेसळ होत आहे असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही ना? पण असा प्रकार प्रत्यक्षात सोलापुरात घडला आहे. सोलापुरात शालेय पोषण आहाराच्या तांदळामध्ये चक्क प्लास्टिकचा तांदूळ आढळला आहे. या भेसळयुक्त तांदळामुळे शाळकरी मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याप्रकरणी शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

काय आहे प्रकरण?
सांगोला तालुक्यातील घेरडीच्या सरपंच सुरेखा पुकळे यांनी पुराव्यासह भेसळयुक्त तांदळाचा प्रकार उघडकीस आणला आहे. विशेष म्हणजे शालेय पोषण आहारासह रेशनच्या दुकानांमध्ये देखील प्लास्टिकचा तांदूळ भेसळयुक्त असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. प्लास्टिकच्या तांदळाच्या मुद्द्यावरुन सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील हे सुद्धा आक्रमक झाले आहेत.
आमदार शहाजी बापू पाटील यांनी भेसळयुक्त प्लास्टिकच्या तांदळाबाबत तहसीलदारांना चौकशीच्या सूचना दिल्या आहेत. पण सोलापूर जिल्ह्यात प्लास्टिकच्या तांदळाचा प्रकार उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अन्न व भेसळ विभागासह जिल्हा प्रशासनाकडून भेसळयुक्त तांदळाबाबत ठोस निर्णय होण्याची गरज असल्याचं मत सर्वसामान्यांकडून व्यक्त केलं जात आहे.

सरपंचांनी नेमका आरोप काय केला?
“रेशनमधला तांदूळ जेव्हा बघितला तेव्हा माझ्या लक्षात आलं की, तांदळामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकची भेसळ केलेली आहे. त्यामुळे मी गावातील दोन-तीन शाळांतील तांदूळ तपासला. त्यावेळीदेखील मला तांदूळमध्ये प्लास्टिकची भेसळ केल्याचं आढळून आलं. आपण म्हणतो की, प्लास्टिकचा वापर बंद केला पाहिजे. कारण प्लास्टिक हानिकारक आहे. प्लास्टिक कुजायला हजारो वर्ष लागतात. तेच प्लास्टिक आपल्या सरकारचा पुरवठा विभाग तांदळात मिक्स करतं”, असा आरोप सरपंच सुरेखा पुकळे यांनी केला आहे

उद्धव ठाकरेंनंतर निवडणूक आयोगाचा पवारांना धक्का, राष्ट्रवादीच्या घड्याळाबाबत मोठा निर्णय!

वेध माझा ऑनलाईन -उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह काढून घेतल्यानंतर आता निवडणूक आयोग राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत आहे.

शरद पवारांच्या हातातून घड्याळ जाणार?
 उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह काढून घेतल्यानंतर आता निवडणूक आयोग राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत आहे. निवडणूक आयोग राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आलेल्या राष्ट्रीय पक्षाच्या दर्जाची समीक्षा करणार आहे, यासाठी निवडणूक आयोगाने पक्षाच्या प्रतिनिधीला आज निवडणूक आयोगाच्या कार्यालयात बोलावलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आता राष्ट्रीय पक्षाच्या दर्जाखाली राहू शकत नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

एखादा राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा तेव्हाच प्राप्त होतो जेव्हा त्याला लोकसभा निवडणुकीवेळी चार किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांमध्ये 6 टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळतात. याशिवाय पक्षाला लोकसभेच्या एकूण जागांच्या 2 टक्के म्हणजेच तीन राज्यांमधून 11 जागा जिंकाव्या लागतात.आता राष्ट्रवादी बाबत काय निर्णय होतो ते पहावे लागणार आहे
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यामुळे राजकीय पक्षांना अनेक फायदे मिळतात. सर्व राज्यांमध्ये त्यांना एकाच चिन्हावर निवडणूक लढण्यात येते. तसंच दिल्लीमध्ये राष्ट्रीय पक्षाच्या कार्यालयाला जागा दिली जाते. निवडणुकीच्या वेळी सरकारी प्रक्षेपणांमध्ये वेळही दिला जातो.

निवडणूक आयोगाची नोटीस
2019 सालच्या लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीप्रमाणेच सीपीआय आणि ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचं राष्ट्रीय पक्ष म्हणून अस्तित्व समिक्षेखाली आलं होतं. पण राज्यांमधल्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे निवडणूक आयोगाने याबाबत कोणताही निर्णय घेतला नव्हता.
1968 सालच्या सिम्बॉल ऑर्डरनुसार एखाद्या पक्षाची राष्ट्रीय मान्यता गेली तर त्याला देशभरातल्या राज्यांमध्ये एकाच चिन्हावर निवडणूक लढता येत नाही. राष्ट्रवादीच्या प्रतिनिधीने केलेल्या अपीलवर निवडणूक आयोगाचं समाधान झालं नाही, तर राष्ट्रवादीला इतर राज्यांमध्ये पुढच्या निवडणुका घड्याळ या चिन्हावर लढता येणार नाहीत. पण राष्ट्रवादीला महाराष्ट्रातला प्रादेशिक पक्ष म्हणून दर्जा असल्यामुळे त्यांना महाराष्ट्रात घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढता येईल.





आता... प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनविणे व विक्री करण्यावर प्रतिबंध ; आदेशाचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई ;

वेध माझा ऑनलाईन - दरवर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे प्रशासनाकडूनही आवाहन केले जाते. परंतु काही मूर्तिकार प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार करतात मात्र आता अशा मूर्तींवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस) च्या मूर्ती बनविणे व विक्री करण्यावर प्रतिबंध घातला असून आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने सर्व जिल्हाधिकारी व नगरपालिका/नगरपंचायत यांना पत्रान्वये पीओपी च्या मूर्ती बनविणे व विक्री करणेस प्रतिबंध करणेबाबत कळविण्यात आले आहे. जिल्हाधिकारी सातारा यांच्या आदेशान्वये पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस) च्या मूर्ती बनविणे व विक्री करणेस प्रतिबंध करण्यात आलेले आहे.

यापूर्वी सातारा जिल्हयात पीओपीच्या मूर्ती वितरण तसेच विक्री करणेस मुभा देण्यात आलेली होती. परंतु दि. 01/09/2022 पासून सातारा जिल्हयामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस च्या सर्व प्रकारच्या मूर्ती बनविणे, आयात करणे, वितरण करणे, खरेदी व विक्री करणेस प्रतिबंध केलेला आहे. तसेच सदर आदेशान्वये प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मूर्ती बनविणे व विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आल्याने मुख्याधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सातारा यांना आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत आदेश देण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी यांनी म्हंटले आहे

कराडच्या वेणूताई चव्हाण महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाची स्थापना ; मराठी माध्यमाच्या १९९६-९७ च्या बॅचचा पुढाकार ः शिवाजी शिक्षण संस्थेकडून सर्वतोपरी सहकार्याचे जंयत पाटील यांचे आश्वासन ;

वेध माझा ऑनलाईन - वेणूताई चव्हाण महाविद्यालयाच्या १९९६-९७ च्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी २५ वर्षानी घेतलेल्या गेट टुगदेरच्या कार्यक्रमात कॉलेजच्या माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्याची घोषणा शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जंयत पाटील यांनी नुकतीच केली. 

वेणूताई चव्हाण महाविद्यालय व माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून तब्बल २५ वर्षांनी गेट टुगेदरचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. माजी प्राचार्या प. ता. थोरात, माजी प्रचार्य बी. ए. कालेकर, विद्यमान प्राचार्य एल. बी. जाधव, प्रा. सुनील फलटणकर, प्रा. व्ही. व्ही जगदाळे, प्रा. बी. जाधव, प्रा. घोरपडे, प्रा. सौ. नागरे-पाटील, जिवाजी कांबळे, तानाजी काटकर आदींची उपस्थिती होती. यावेळी उपस्थीत शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात अनेकविध कार्यक्रमांचे आय़ोजन करण्यात आले होते. मृत झालेल्यांना श्रध्दांजली, गुरूजनांचा सत्कार ते फनी गेम्सही यावेळी आयोजीत करण्यात आल्या होत्या.

श्री. पाटील म्हणाले, तब्बल २५ वर्षानंतर एकत्रीत आलेल्या विद्यार्थ्यांचा उत्साह फारच चांगला आहे. त्यांनी पुढाकार घेवून घेतलेल्या या अनोख्या कार्यक्रमामुळे नवी प्रेरणा मिळाली आहे. शक्यतो गेट टुगेदर बाहेर होते. मात्र आपण खास महाविद्यालयात आयोजीत केलेल्या कार्यक्रमामुळे कॉलेजचाही सन्मान झाला आहे. मराठी माध्यमाच्या बॅचच्या निमित्ताने कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांच्या संघाची स्थापना केली जाणार आहे. त्यासाठी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, संस्था हवी ती मदत करण्यास तयार आहे. यावेळी प्रचार्य थोरात, प्राचार्य कालेकर, प्राचार्य जाधव, प्रा. फलटणकर, इंद्रजीत पाटील, सौ. दीपाली देवकर यांची मनोगते झाली. यावेळी दिवसभर फनी गेम्स झाल्या, त्यासोबत मीमीक्रीचाही कार्यक्रम पार पडला. अबुबकर सुरात यांनी सुत्रसंचालन केले. फारूक शेख यांच्या गाण्यांचा कार्यक्रमही यावेळी सादर झाला. श्री. भोईटे यांनी मीमीक्री सादर केली. महेश कुंभार यांनी आभार मानले. अवधूत कलबुर्गी यांनी प्रास्ताविक केले.श्याम पेटकर व मित्र परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले

अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. 
तब्बल २५ वर्षांनी एकत्रीत आलेल्या विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या आठवणी सांगितल्या, अनेकांनी केलेल्या स्ट्रगलचे वर्णन करताना उपस्थित मित्रांच्याही डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. प्रत्येकवर्षी असाच कार्यक्रम घेवून हा संघच कॉलेजचा माजी विद्यार्थी संघ म्हणून रजीस्ट्रेशन करण्याची जबाबदारी यावेळी अवधूत कलबुर्गी यांच्याकडे देण्यावर एकमत झाले. त्याला महाविद्यालयानेही सहमती दिली. 


नितीन गडकरीना पुन्हा जीवे मारण्याची धमकी ; फोनवरून मागितली 10 कोटींची खंडणी ; धमकीच्या फोनमुळे खळबळ ;

वेध माझा ऑनलाइन- भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. नितीन गडकरी यांच्या कार्यालयात जयेश पुजारी या गुंडाच्या नावाने हा धमकीचा फोन आला असून 10 कोटींची खंडणी मागितली आहे. या धमकीच्या फोनमुळे खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील कार्यालयात पुन्हा एकदा धमकीचा फोन आला. दोन वेळा हा फोन करण्यात आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने जयेश पुजारीच्या नावाने फोन केला होता. फोनवर या व्यक्तीने 10 कोटींची खंडणी मागितली. एकापाठोपाठ दुसऱ्यांदा फोन आल्यामुळे नितीन गडकरी यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी याची माहिती तातडीने पोलिसांना दिली याआधी देखील गडकरींच्या कार्यालयात धमकीचे फोन आले होते. जयेश पुजारी या नावानेच हे फोन आले होते. या प्रकरणी पोलिसांनी बंगळुरला जाऊन चौकशी केली होती. पण त्याने हे फोन कॉल केले नाही अशीच माहिती दिली होती. आता या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी गडकरींच्या कार्यालयात चौकशी करत आहेत.

Monday, March 20, 2023

पेन्शनचं मिशन संपलं ; संप मागे ;

वेध माझा ऑनलाईन - जुन्या पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी मागील 7 दिवसांपासून संप पुकारला होता. अखेरीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर या संपावर तोडगा निघाला आहे. सरकारी कर्मचारी संघटनेनं आपला संप मागे घेतला आहे.

आज राजपत्रित अधिकाऱ्यांनी 28 मार्चपासून संपात प्रत्यक्ष सामिल होण्याचा इशारा दिला होता. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी या कर्मचाऱ्यांची आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचारी संघटनेला विधान भवनात बैठकीसाठी बोलावलं होतं. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आणि कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. जुनी पेन्शन योजना लागू होईल, असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं आहे. त्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या मंगळवारपासून कर्मचारी कामावर परत येणार आहे.

जुनी पेन्शन योजना लागू करा, या मागणीसाठी राज्यभरातील जवळपास 18 लाख सरकारी- निम सरकारी कर्मचारी संपावर होते. आज सुकाणू समितीच शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी विधान भवनात पोहोचले. एकूण 16 जणांचे शिष्टमंडळ विधानभवनातील मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक झाली.

काय आहेत सरकारी कर्मचाऱ्यांच्या  प्रमुख 18 मागण्या?
- नवीन पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा
- कंत्राटी व योजना कामगार प्रदिर्घकाळ सेवेत असल्यामुळे, सर्वांना समान किमान वेतन देऊन त्यांच्या सेवा नियमित करा
- सर्व रिक्त पदे तत्काळ भरा. (आरोग्य विभागास अग्रक्रम द्या) तसेच चतुर्थश्रेणी व वाहन चालक कर्मचाऱ्यांच्या पदभरतीस केलेल्या मज्जाव तात्काळ हटाव
- अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या विनाशर्त करा. तसेच कोरोना काळात मृत पावलेल्या कर्मचान्यांच वयाधिक झालेल्या पाल्यांना विहित वय मर्यादित सूट द्या
- सर्व अनुषंगिक भत्ते केंद्रासमान मंजूर करा. (वाहतूक, शैक्षणिक व इतर भत्ते)
- चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची मंजूर पदे निरसित करू नका. चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेने मांडलेल्या इतर सर्व प्रलंबित मागण्या सत्वर मंजूर करा.
- शिक्षक-शिक्षकेतर कर्मचान्यांचे प्रश्न ( सेवतंर्गत आशवासित प्रगती योजना १०:२०:३० वर्ष व इतर) तत्काळ सोडवा.
- निवृत्तीचे वय ६० वर्षे करा.
- नवीन शिक्षण धोरण रद्द करा.
- नर्सेस/ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आर्थिक आणि सेवाविषयक समस्यांचे तत्काळ निराकरण करा
- मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे सद्या रोखलेले पदोन्नती सत्र तत्काळ सुरु करण्यात यावे
- उत्कृष्ट कामासाठी आगाऊ वेतनवाढी देण्यासंदर्भातील कार्यवाही पूर्ववत सुरु करण्यात यावी. या संदर्भात मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करण्यात यावे
- वय वर्षे ८० ते १०० या वयातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाने विहित केल्याप्रमाणे मासिक पेन्शनमध्ये वाढ करण्यात यावी
- कामगार-कर्मचारी-शिक्षकांच्या हक्कांचा संकोच करणारे कामगार कायद्यातील मालकधार्जिणे बदल रद्द करा
- आदिवासी नक्षलग्रस्त भागातील कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजने व्यतिरिक्त एकस्तर वेतनवाढीचा लाभ कायम ठेवण्यात यावा व संबंधित कर्मचान्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे प्रोत्साहन भत्ता लागू करण्यात यावा
- शिक्षणसेवक, ग्रामसेवक आदिना मिळणाच्या मानधनात वाढलेल्या महागाईचा विचार करुन वृद्धि करण्यात यावी
- शासकीय विभागात कोणत्याही स्वरुपाच्या खाजगीकरण/कंत्राटीकरणास सक्त मज्जाव करण्यात यावा
- पाचव्या वेतन आयोगापासूनच्या वेतन त्रुटींचे निराकरण करण्यास बक्षी समितीला अपयश आले आहे. त्यामुळे याबाबत सखोल पुनवचार करुन सर्व संबंधित प्रवर्ग कर्मचारी-शिक्षकांना न्याय देण्यात यावा.

एकाच रुममध्ये 2 तरुणांची आत्महत्या ; एकाने पेटवून घेतले तर दुसऱ्याने घेतला गळफास ; सातारा जिल्हा हादरला ;

वेध माझा ऑनलाईन - सातारा जिल्ह्यामध्ये गोळीबाराची घटना ताजी असताना एकाच रुममध्ये 2 तरुणांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील कोरेगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील अनन्या रेसिडेन्सी मधील तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या दोन युवकांनी राहत्या रुममध्ये रात्रीच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना रात्रीच्या सुमारास झाल्याने कोरेगावसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.यामध्ये एकाने पेटवून घेतले तर दुसऱ्या‌ने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या दोघांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कोरेगाव पोलीस दाखल झाले दोन्ही तरुणाचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल ; राऊतांच्या अडचणी वाढणार! ते प्रकरण अंगलट येणार !

वेध माझा ऑनलाईन - ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीयेत. संजय राऊतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. एका प्रकरणात संजय राऊत यांनी पीडित मुलीचा फोटो ट्विट केला होता. यामुळे पीडित मुलीची ओळख समोर आल्यानं गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. गुन्हा दाखल झाल्यानं राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

काय आहे नेमकं प्रकरण? 
बार्शीमध्ये काही दिवसांपूर्वी एक अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता. या घटनेतील पीडितेचा फोटो संजय राऊत यांनी ट्विट केला होता. पीडिता ही अल्पवयीन होती, आणि या फोटोद्वारे तिची ओळख पटत असल्यानं संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र संजय राऊत यांच्यावर कोणत्या कलमातर्गंत गुन्हा दाखल झाला आहे यांची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये. संजय राऊत यांच्याविरोधात पोक्सो 23,  जुवेनाईल जस्टीस 74, आयपीसी 228 अ या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे 
संजय राऊत यांनी या मुलीचा फोटो ट्विट करत भाजपवर गंभीर आरोप केले होते. देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. 'देवेंद्रजी हे चित्र बार्शीतले आहे. मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका. भाजप पुरस्कृत गुंडांनी हा हल्ला केला आहे. पाच मार्चला हा हल्ला झाला आहे. आरोपी अद्याप मोकाट आहेत' असं राऊत यांनी म्हटलं होतं. आता या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे.

पाटण गोळीबार प्रकरण ; सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले यामागचे कारण ;

वेध माझा ऑनलाईन - रविवारी पाटण तालुक्यात एका ठाण्याच्या माजी नगरसेवकाने तीन जणांवर गोळीबार केला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषद घेत महत्वाची माहिती दिली. रविवारी रात्री पवनचक्कीच्या जुन्या व्यवहाराच्या वादातून तसेच गाडीचा झालेल्या एका अपघातावरून  वाद सुरु होता. यानंतर याप्रकरणी गोळीबार झाला. या प्रकरणातील आरोपींवर 302 कलमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे असेही यावेळी समीर शेख म्हणाले

समीर शेख म्हणाले की, पाटण तालुक्यातील मोरणा खोर्‍यात रविवार, दि. १९ रोजी शिद्रुकवाडी येथे काही कारणांनी युवकाची भांडणे झाली होती. तसेच काही दिवसापूर्वी गाडीच्या अपघातावरून भांडणे सुरु होती. हा वाद सुरु असताना काल पुन्हा गाडीच्या अडवण्यावरून देखील भांडणे झाली.यावेळी झालेल्या वादावादीत आरोपीचे साथीदार त्या ठिकाणी आले असता मुख्य आरोपी मदन कदम याने त्याच्याकडे असलेल्या बंदुकीतून गोळ्या झाडल्या. यामध्ये दोन लोकांना गोळ्या लागल्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यावेळी एक व्यक्ती जखमी झाली असून त्याला तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आता त्या व्यक्तीची प्रकृती ठीक आहे.या गोळीबार प्रकारणी मुख्य आरोपीवर 302 कलमान्वये हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Sunday, March 19, 2023

पाटण तालुक्यात गोळीबार ; 2 जण ठार ; एकच खळबळ ; हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात ;

वेध माझा ऑनलाईन - पाटण तालुक्यातील शिद्रुकवाडी येथे गोळीबार केल्याची घटना नुकतीच घडली आहे. यामध्ये 2 जण जागीच ठार झाले अशी माहिती मिळाली आहे या घटनेमुळे पाटण तालुक्यात खळबळ उडाली आहे. गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.हल्लेखोर मदन कदम यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गोळीबार केल्याची माहिती समजताच पाटण पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करित आहेत. पाटण तालुक्यातील मोरणा विभागात झालेल्या गोळीबारामुळे तालुक्यातील तणावाचे वातावरण आहे. 

माझ्या अंगावर 109 केसेस आहेत, तुमच्यावर किती केसेस आहेत? तुम्हाला बोलायचा अधिकार काय? खेड च्या सभेत मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल ;

वेध माझा ऑनलाईन - काहीच दिवसांपूर्वी खेडच्या गोळीबार मैदानात उद्धव ठाकरेंची जाहीर सभा झाली होती, याच मैदानात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही जाहीर सभा झाली. या जाहीर सभेतून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत एकनाथ शिंदे यांनी मागचं सर्व उकरुन काढत ठाकरेंना लक्ष्य केलं. उद्धव ठाकरे यांनी भाजप-शिवसेना युती असताना महाविकास आघाडीतील नेत्यांवर केलेल्या टीकेची आठवण करत माझ्या अंगावर 109 केसेस आहेत, तुमच्यावर किती केसेस आहेत? तुम्हाला बोलायचा अधिकार काय? असा थेट सवाल केला आहे.

तुमच्या डोक्यात पवारांनी मुख्यमंत्रीपदाचा बल्ब पेटवला : मुख्यमंत्री शिंदे
तुमच्या डोक्यात पवारांनी मुख्यमंत्रीपदाचा बल्ब पेटवला आणि सगळंच बिघडलं. सगळे वाईट होते ते चांगले झाले, सगळं विसरून गेलात. अशोक चव्हाणांनी शेण खाल्लं असं तुम्ही म्हणालात, मग त्यांच्या पंगतीत बसून तुम्ही काय खात आहात, सांगा? कोण कोणाला डोळा मारत होता, ते आपण पाहिलं. गळ्यात गळे घालत आहेत ते कधी गळा दाबतील कळणार नाही. त्यांचा पूर्व इतिहास तपासून बघा. आम्हाला तुम्ही मिंधे म्हणताय. एकनाथ शिंदे वफादार आहे, मी गद्दार नाही खुद्दार आहे. बेईमानी माझ्या रक्तात नाही, असं एकनाथ शिंदेंनी सुनावलं. शिवसेनेसाठी आयुष्य घालवलं, केसेस अंगावर घेतल्या त्यांना तुम्ही गद्दार आणि खोके म्हणता, तुम्हाला बोलताना थोडंतरी काही वाटलं पाहिजे. एकनाथ शिंदेंच्या अंगावर 109 केसेस आहेत, तुमच्यावर किती केसेस आहेत? तुम्हाला बोलायचा अधिकार काय? असं एकनाथ शिंदे म्हणाले.
येत्या काही दिवसांमध्ये महाविकासआघाडीच्या राज्यभरात सभा होणार आहेत, यावरूनही मुख्यमंत्र्यांनी टीका केली आहे. सर्कशीप्रमाणे राज्यभरात त्यांचे शो होणार आहेत असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

बावनकुळेंच्या वक्तव्यावर शिवसेना आक्रमक ; बावनकुळे यांच्या एका विधानामुळे भाजप-शिवसेनेत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

 वेध माझा ऑनलाईन - आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधीच भाजप-शिवसेना (शिंदे गट) यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. याला कारणीभूत ठरलंय भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं एक विधान. आगामी विधानसभा निवडणुकीत 240 जागा लढवण्याचा भाजपाचा विचार आहे त्यामुळे तयारीला लागा, असं आवाहन बावनकुळे यांनी नुकतंच पक्षाच्या प्रवक्त्यांना केलं आहे. या वक्तव्यावरून शिवसेनेच्या शिंदे गट आक्रमक झाला आहे. माध्यमांच्या प्रतिनिधींनी शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांना बावनकुळे यांच्या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

आम्ही काय मुर्ख आहोत का : संजय शिरसाट
शिवसेना आमदार संजय शिरसाट यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, "चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्टेटमेंटमध्ये दम नाही. त्यांना एवढे अधिकार कोणी दिले, हे माहिती नाही? अशा वक्तव्यामुळे युतीमध्ये वाद निर्माण होतो, याची जाणीव बावनकुळे यांना असायला पाहिजे. आम्ही काय मुर्ख आहोत का फक्त 48 जागा लढवायला? दोन्ही पक्षातील जागावाटपासाठी वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल, अशी तिखट प्रतिक्रिया शिरसाट यांनी दिली आहे
आमदार संजय गायकवाड म्हणाले की, “सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हा शिंदे गट नाही तर ही शिवसेना आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना. भाजप-शिवसेनेची ही युती बाळासाहेबांनी केलेली आहे. त्यामुळे इतर कुठला नेता काही घोषणा करत असेल तर त्यांच्या शब्दाला काही अर्थ नाही. आमची युती पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहे. युतीचा विषय या नेत्यांसोबत आहे.”, असं म्हणत बावनकुळे यांनी आम्ही महत्त्व देत नाही अशीच काहीशी त्यांची प्रतिक्रिया होती.