Tuesday, May 5, 2020

सातारा जिल्ह्यात टप्या टप्याने दुकाने उघडण्याबाबत परवानगी दिली जाईल ; जिल्हाधिकारी

 
 सातारा
 जिल्ह्यात कोरोनाबाधितांची  संख्या वाढली आहे. आत्तापर्यंत दाेघांचा मृत्यू झाला असून अकरा जण काेराेनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कराड,सातारा या दाेन्ही ठिकाणी घरपाेच दूध, किराणा आणि आैषधांचा पूरवठा केला जाईल. दरम्यान जिल्ह्यामध्ये दुकाने टप्प्या टप्प्याने उघडण्याचे आदेश केले जाणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यावेळी पाेलिस अधीकक्षक तेजस्वी सातपुते उपस्थित हाेत्या.

जिल्हाधिकारी सिंह म्हणाले,सातारा जिल्हा हा रेड झाेनमध्ये असल्याने पुणे आणि मुंबईहुन येणाऱ्या कोणालाही जिल्ह्यात परवानगी देण्यात आलेली नाही. जिल्ह्यात शिवभोजन, सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून एकही नागरिक उपाशी राहू नये याची काळजी घेत आहोत.. सद्यस्थितीत सातारा जिल्ह्यात मद्य विक्री सुरु करण्याचा काेणत्याही विचार नाही. त्याबाबत याेग्य त्यावेळी निर्णय घेतला जाईल. याव्यतरिक्त जिल्ह्यातील ग्रामीण भागात टप्प्या टप्याने दुकान उघडण्यास परवानगी दिली जाईल.
सातारा आणि कराड या दाेन्ही शहरात काेणत्याही वैद्यकीय अधिकारी यांन खासगी दवाखाना बंद ठेवा असे सांगितलेले अथवा आदेश नाहीत. ज्या ठिकाणहून तक्रारी असतील तेथे कारवाई केली जाईल. नागरीकांनी 1077 या हेल्पलाईनवर तक्रारी नाेंदवाव्यात असे आवाहनही जिल्हाधिकारी सिंह यांनी केले.

No comments:

Post a Comment