अजिंक्य गोवेकर
कराड-
येथील नगरसेवक व नियोजन सभापती विजय वाटेगावकर यांचा वाढदिवस अगदी साधेपणाने साजरा करण्यात आला.वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधी करीता 11000 रुपयांचा धनादेश पालकमंत्री आ. बाळासाहेब पाटील यांच्याकडे सुपूर्त केला तसेच पोलीस स्टेशनला मदत,गरिबांना भोजन असे काही छोटेखानी उपक्रमही त्यांनी या दिवशी राबवले.
शहराच्या स्वच्छतेसह अनेक उपक्रमांमध्ये हिरीरीने सहभाग घेणारे वाटेगावकर यांनी शहरातून होणाऱ्या प्रत्येक सामाजिक उपक्रमामधून आपला सहभाग नोंदवत आपले समाज्याप्रति असणारे कर्तव्य वेळोवेळी पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे. नियमित नगरपालिकेत उपस्थित राहून कोणत्याही प्रभागातील लोकांना कधीही,काहीही अडचण आल्यास पुढे होऊन ती सोडवताना त्यांना अनेकांनी पाहिलंय. विशेष म्हणजे शहरातील असणाऱ्या प्रत्येक राजकीय पार्टीमध्ये त्यांना मानाचे स्थान आहे. ते या राजकीय पार्ट्यांमधील सदस्यामध्ये असे काहीवेळा मिक्स झालेले दिसतात,जणू त्याच पार्टीचे सदस्य वाटू लागतात... हे त्यांचं वैशिष्ठयच म्हणावे लागेल. अजातशत्रू म्हणून त्यांची शहरात ओळख आहे.त्यांचा वाढदिवस नुकताच साध्या पद्धतीने साजरा झाला. त्या दिवशी त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी समजून मुख्यमंत्री निधी साठी 11000 रुपयांचा चेक पालकमंत्र्यांकडे दिला तसेच,दुपारच्या सुमारास येथील पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तेथे हॅन्डफ्रि वॉश बेसिन भेट दिले. पोलिसांना सध्याच्या कोरोनाच्या विळख्यात काम करताना याचा उपयोग होणार आहे. उदात्त हेतूने केलेले हे साहाय्य खरोखरच अनेकांच्या कौतुकाचा विषय ठरले आहे.
त्यांनी आपल्या वाढदिनी शिवभोजन थाळी चे गरजूंना मोफत वाटप केले, म्हणजे त्या दिवशीचे सर्व जेवणाचे सर्वांचे पैसे त्यांनी स्वतः भरून आपली संवेदनशीलता दाखवली. त्यांनी मधल्या लॉक डाऊन काळातदेखील जीवनावश्यक वस्तूंचे समाजातील गोरगरिबांना वाटप केले होते. हे करताना प्रसिद्धीपासून लांब राहून आपले कर्तव्य म्हणून हे आपल्याला केले पाहिजे या भावनेने त्यांनी हे काम केले आहे .लॉक डाऊन सुरू असताना गरिबांच्या भावना ओळखून वाटेगावकर यांनी दिलेल्या या योगदानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:
Post a Comment