वेध माझा ऑनलाइन - शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासंदर्भातली सर्वात मोठी बातमी समोर येतेय. संजय राऊत यांची संपत्ती ईडीनं जप्त केली. यात अलिबागमधील आठ भूखंड आणि दादरमधील फ्लॅटचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे. यावर खुद्द संजय राऊत यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.संजय राऊत यांनी सोशल मीडियावर ट्विट करुन आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ट्विट करत संजय राऊत म्हणाले की, असत्यमेव जयते!!
संजय राऊतांनी मनी लाँड्रिंगमधील पैशातून संपत्ती खरेदी केली असल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली आहे. तसंच संजय राऊत आणि त्यांच्या जवळील नेत्यांवरही कारवाई करण्यात आल्याची माहितीही समोर येतेय.
काय आहे प्रकरण?
गोरेगावमध्ये गुरुआशिष कंपनीला चाळीच्या पुनर्विकासाचं काम देण्यात आलं होतं. मात्र प्रवीण राऊत यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांच्या साथीनं या जागेतील एफएसआय परस्पर विकल्याचं प्रथमदर्शनी समोर आलं आहे. गोरेगाव पश्चिमेतील सिद्धार्थ नगर भागातील या झोपडपट्टीचं काम न करताच परस्पर काही वर्षांपूर्वी इथला एफएसआय बेकायदेशीररित्या विकण्यात आला. हा व्यवहार तब्बल 1000 कोटी रुपयांचा होता. एचडीआयएलच्या प्रमोटर्सना पैशांची अफरातफर करण्यात मदत केली, असा आरोपही प्रवीण राऊत यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment