Wednesday, November 30, 2022

छत्रपतींच्या अपमानाबद्दल पश्चाताप व्यक्त करत नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्रात भाजपाचा कोणीहि नेता फिरू शकणार नाही ; ठाकरे गटाचा इशारा

वेध माझा ऑनलाइन - शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वात गुरुवारी मुंबईत भाजपा नेते आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी ठाकरे गटाने लोढांना इयत्ता चौथीचं इतिहासाचं पुस्तक भेट देत इतिहास वाचा असा खोचक टोला लगावला. तसेच जोपर्यंत भाजपाचे नेते छत्रपतींच्या अपमानाबद्दल पश्चाताप व्यक्त करत नाहीत, तोपर्यंत उभ्या महाराष्ट्रात यापुढे भाजपाचा कुठलाही नेता फिरू शकणार नाही, असा थेट इशारा दिला.

अरविंद सावंत म्हणाले, “त्यांना महाराष्ट्राचा अपमान करायचा आहे. आता त्यांनी जे वक्तव्य केलंय त्याबद्दल त्यांना माफी मागावीच लागेल. मंगलप्रभात लोढा जोपर्यंत राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आज आम्ही लोढांना चौथीच्या इतिहासाचं पुस्तक भेट देत आहोत. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिलेला आहे. ज्यांना इतिहास माहिती नाही त्यांना आम्ही इतिहास शिकवत आहोत.

कराड ग्रामपंचायत निवडणूक ; आजअखेर सरपंच पदासाठी एकूण 47, तर सदस्य पदासाठी 193 अर्ज दाखल ...

लवेध माझा ऑनलाइन - कराड तालुक्यातील मुदत संपलेल्या 44 ग्रामपंचायतींसाठी बुधवार दि. 30 रोजी सरपंच पदासाठी 14 अर्ज, तर सदस्य पदासाठी 84 अर्ज दाखल झाले आहेत. सोमवारी व मंगळवारी मिळून सरपंच पदासाठी एकूण 33 अर्ज, तर सदस्य पदासाठी 109 अर्ज दाखल झाले. आजअखेर सरपंच पदासाठी एकूण 47, तर सदस्य पदासाठी एकूण 193 अर्ज दाखल झाले आहेत.

बुधवारी दिवसभरात सरपंच पदासाठी दाखल झालेल्या अर्जात तारुख 1, दुशेरे 1, गोंदी 2, हिंगनोळे 2, घोलपवाडी 1, आणे 1, अंधारवाडी 1, कळंत्रेवाडी 1, मनू 1, कोरेगाव 1, गणेशवाडी 1, रेठरे खुर्द 1, आटके 1 असे एकूण 14 अर्ज दाखल झाले आहेत.
तर दिवसभरात सदस्य पदासाठी दाखल झालेल्या अर्जात हनुमानवाडी 3, हवेलवाडी 2, दुशेरे 1, गोंदी 1, हिंगनोळे 9, सावळवाडी 3, अंतवडी 3, शामगांव 4, भांबे 5, डेळेवाडी 4, आणे 3, कुसुर 2, पाडळी 1, मनू 7, कोरेगाव 4, गणेशवाडी 4, रेठरे खुर्द 2, जुळेवाडी 5, कासारशिरंबे 3, सुपने2, किवळ 1, आटके 2, चरेगाव 2, तळबीड 5, वडगाव हवेली 5 असे एकूण 84 अर्ज दाखल झाले आहेत.


प्रतापगड संवर्धनासाठी 100 कोटीचा जिल्हा प्रशासनाचा आराखडा ; सुरूवात म्हणून 25 कोटी रूपयांची निधी प्रतापगडाला देणार...मुख्यमंत्री

वेध माझा ऑनलाइन - प्रतापगड संवर्धनासाठी 100 कोटी रूपयांची गरज असल्याचा आराखडा जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. राज्यातील सर्वच गडाचे संवर्धन करण्याची जबाबदारी ही आपणा सर्वांची तसेच सरकारची आहे. त्यामुळे पहिल्यांदा आम्ही सुरूवात म्हणून 25 कोटी रूपयांची निधी प्रतापगडाला देणार असल्याचे जाहीर केले आहे तसेच पुढील काळात जेवढा निधी लागेल तेव्हा उपलब्ध करून दिला जाईल असे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

किल्ले प्रतापगड येथे 363 वा शिवप्रताप दिनास उत्साहात सुरूवात झाली आहे. यावेळी उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, खा. श्रीनिवास पाटील, खा. रणजितसिंह नाईक- निंबाळकर, आ. मकरंद पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. महेश शिंदे, आ. महादेव जानकर, आ. भरत गोगावले उपस्थित आहेत. मुख्यमंत्री यांचे तुतारी वाजवून ढोल- ताशाच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी गडावर भवानी मातेची विधिवत पूजा व आरती मुख्यमंत्र्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, प्रतापगडावर येणाऱ्या प्रत्येक शिवभक्तांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसत होता. आजही या ठिकाणची माती पराक्रमांची साक्ष देत आहे. छ. शिवाजी महाराजांनी इतिहास घडविला. रयतेच्या गवताच्या काडीच्या देठाला हात लागता कामा नये, अशी महाराजांची भूमिका होती. रयतेच्या रक्षणासाठी असलेला एक राजा म्हणजे छ. शिवाजी महाराज होते. शिवभक्तांची इच्छा, भावना व मागणी होती, या गडावरील अतिक्रमण हटले पाहिजे. परंतु आम्ही छ. शिवाजी महाराजांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे सरकार स्थापन केले. सातारा जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांचे मनापासून अभिनंदन करतो. न्यायालयाने जो निवाडा दिला होता, त्यानुसार प्रतापगडावरील अतिक्रमण काढण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तुतारीच्या निनादात जोरदार स्वागत करण्यात आले. छ. शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ पुतळ्याचे दर्शन करत पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच आई भवानी मातेची आरतीही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन मिथून माने यांनी केले

राज्यातील गडकिल्यांचे संवर्धन करण्यासाठी दुर्ग प्राधिकारण स्थापणार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

वेध माझा ऑनलाईन -शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह राज्यातील अनेकांनी छ. शिवाजी महाराज यांचे गडकोट, इतिहास किल्ले जतन करण्याची मागणी केली आहे. गडाचे पावित्र्य, साैंदर्य जपण्यासाठी व संवर्धन करण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्यामुळे राज्यातील गडकिल्ले यांचे संवर्धन करण्यासाठी दुर्ग प्राधिकारण स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रतापगडावर केली.


किल्ले प्रतापगड (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) येथे 363 वा शिवप्रताप दिनाच्या उत्सावात ते मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, खा. श्रीनिवास पाटील, खा. रणजितसिंह नाईक- निंबाळकर, आ. मकरंद पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. महेश शिंदे, आ. महादेव जानकर, आ. भरत गोगावले, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, पोलिस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, गडकिल्ले संवर्धन करण्याची जबाबदारी ही आता दुर्ग प्राधिकरणाची राहील. मुंबईत काही शिवभक्त मला आझाद मैदानावर भेटले. त्यांनी गडकिल्ल्यांचे संवर्धन, जतन करण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. परंतु ही सर्व जबाबदारी शासनाची आहे. त्यामुळे गडकिल्ल्यांसाठी कुठेही निधी कमी पडणार नाही. प्रतापगड येथे ज्या प्रकारे अतिक्रमण हटविण्यात आले. त्याचप्रमाणे सर्व गडकोटवरील अतिक्रमण हटविण्यात येईल

निवडणूक आयोगाची वेबसाईट बंद! ; राज्यभरात गोंधळ : इच्छुक उमेदवारांसाठीअर्ज भरताना मोठी अडचण ; .

वेध माझा ऑनलाइन -  राज्यभरात  ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची लगबग सुरू असतानाच, निवडणूक आयोगाची वेबसाईट चालत नसल्याने राज्यभरात गोंधळ उडाला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांना रात्रभर जागून काढावी लागत आहे. विशेष म्हणजे, अर्ज भरण्यासाठी उद्याचा शेवटचा दिवस असल्याने इच्छुकांची धडपड पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरताना वेबसाईट चालत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. उमेदवार अनेक ठिकाणी आपला अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन केंद्रात रात्र जागून काढत आहे. मात्र, असं असताना उमेदवारांना दोन दोन दिवस अर्ज भरण्यासाठी लागत आहे

टोयोटा या नावाला भारतात ओळख निर्माण करून देणारे उद्योजक विक्रम किर्लोस्कर यांचं निधन ;

वेध माझा ऑनलाइन - वाहन निर्मिती क्षेत्रात नावाजलेले दिग्गज आणि टोयोटा या नावाला भारतात ओळख निर्माण करून देणारे उद्योजक विक्रम किर्लोस्कर यांचं निधन झालं आहे. ते 64 वर्षांचे होते. ह्रदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं निधन झालं.

टोयोटा इंडियाने याबद्दल एक प्रसिद्ध पत्रक जारी केले असून विक्रम किर्लोस्कर यांचं निधन झाल्याची माहिती देण्यात आली आहे. 29 नोव्हेंबर 2022 ला टोयोटा किर्लोस्कर मोटरचे व्हाइस चेयरमन विक्रम एस किर्लोस्कर यांचं दु:खद निधन झालं आहे.
या दुखाच्या प्रसंगात आम्ही सगळे त्यांच्या कुटुंबियासोबत असून त्यांच्या आत्मास शांती लाभो, अशी भावना पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे. आज 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास हेब्बल स्मशानभूमी बंगळुरू इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. विक्रम किर्लोस्कर यांच्या पश्चात पत्नी गितांजली किर्लोस्कर आणि मुलगी मानसी किर्लोस्कर आहे.

Monday, November 28, 2022

राज्यातील काही जणांचा कन्नड रक्षण वेदिकेला छुपा पाठिंबा मिळतोय,; संजय राऊत यांचा आरोप ; राऊत यांचा इशारा कोणाकडे?

वेध माझा ऑनलाइन - संजय राऊत यांना बेळगाव न्यायालयानं समन्स बजावला आहे. 2018 मध्ये त्यांनी बेळगावात सीमावादावरून प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप आहे. यावरून आता त्यांना समन्स बजावण्यात आले आहे. त्यांना एक डिसेंबर रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या समन्सनंतर संजय राऊत आक्रमक झाले आहेत. त्यांनी सीमा प्रश्नावरून पुन्हा एकदा शिंदे, भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सीमावादावर काय वाटतं ते महत्त्वाचं आहे. कन्नड रक्षण वेदिकेवर कधी कारवाई होणार?सीमा प्रश्नासाठी आता मुख्यमंत्री पुन्हा आसामला जाऊन नवस बोलणार आहेत का? असा खोचक टोला संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

 काय म्हणाले राऊत?  
संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.  सीमा प्रश्नावर एकनाथ शिंदे गप्प का आहेत. त्यांना सीमा प्रश्नाबाबत काय वाटतं हे महत्त्वाचं आहे. कन्नड रक्षण वेदिकेवर केव्हा कारवाई होणार, राज्यातील काही जणांचा कन्नड रक्षण वेदिकेला छुपा पाठिंबा मिळतोय, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान या सरकारला महाराष्ट्राचा अभिमान नाही. पाठिचा कणा नाही आणि स्वाभिमान देखील नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आता सीमा प्रश्नावर पुन्हा एकदा नवस बोलण्यासाठी आसामला जाणार आहात का असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना खोचक टोला लगावला आहे.




कृष्णा महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी सौ. कल्याणी तांबवेकर यांची निवड ; तर व्हाईस चेअरमनपदी सौ. शशिकला चव्हाण

वेध माझा ऑनलाइन - येथील कृष्णा महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी  सौ. कल्याणी नितीन तांबवेकर यांची; तर व्हाईस चेअरमनपदी सौ. शशिकला धनाजी चव्हाण यांची निवड करण्यात आली. या नव्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा सुरेश भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या कृष्णा महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. या नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत व निवडणूक निर्णय अधिकारी कमलेश पाचुपते यांच्या अध्यक्षतेखाली कृष्णा सरिता महिला बझार येथे नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत संस्थेच्या चेअरमनपदी सौ. कल्याणी तांबवेकर यांची; तर व्हाईस चेअरमनपदी सौ. शशिकला चव्हाण यांची निवड करण्यात आली.

याप्रसंगी संस्थेच्या संचालिका सौ. स्मिता दुर्गेश चव्हाण, सौ. अपर्णा युवराज शिंदे, सौ. रंजना निवास घोरपडे, सौ. भारती मोहनराव जाधव, सौ. धनश्री धनंजय राजहंस, सौ. दिपाली संजय पिसाळ, सौ. सविता जगन्नाथ फसाले, सौ. रजनी अशोक गुरव, सौ. आशा रमेश माने यांच्यासह व्यवस्थापक आनंदराव पाटील उपस्थित होते. 


राज्यपाल पदमुक्त होणार! फडणवीसांनी दिले संकेत!

वेध माझा ऑनलाइन - मागच्या काही दिवसांपूर्वी  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवरायांविषयी वादग्रस्त विधान केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. राज्यपालांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. दरम्यान यावर भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत कोश्यारी यांच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे. यावेळी ते भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. मेलो असतो तर बर झालं असतं. अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यांच्या वाक्याचा संदर्भ घेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यापालांच्या राजीनाम्याविषयी सूचक वक्तव्य केले आहे.

यावेळी फडणवीस म्हणाले की, खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष कायम आहे. त्यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहोचविण्यात आल्या आहेत, असल्याचे फडणवीस म्हणाले. ते पुण्यात काल पत्रकारांशी बोलत होते.  खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष कायम आहे.
छत्रपती घराण्याचे वंशज कधीच हतबल होऊ शकत नाहीत. त्यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहचल्या आहेत. राज्यपाल हे संविधानिक पद आहे. यात सरकार काही हस्तक्षेप करू शकत नाही. राज्यपालांना पदमुक्त करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.
राज्यपालांविरोधात उदयनराजेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 'राजकीय स्वार्थासाठी शिवरायांचा वापर केला जात आहे. असा आरोप उदयनराजे यांनी यावेळी केला. महाराजांबद्दल गलिच्छ प्रतिमा तयार केली जाते तेव्हा राग कसा काय येत नाही. आता जनतेनं विचार करणं गरजेचं आहे. विकृतीकरण थांबवलं नाही तर नव्या पिढीसमोर कोणता इतिहास मांडणार. असा सवाल उपस्थित केला.शिवरायांचा अपमान होताना सर्वपक्ष गप्प का? थोर पुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा का नाही. हे पाहण्यापेक्षा मेलो असतो तर परवडलं असतं? शिवरायांचा अपमान होतो तेव्हा दुःख होते अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

सुनावणी पुन्हा लांबणीवर ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भात आज होती सुनावणी...

वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्रतेच्या संदर्भात आज न्यायालयात सुनावणी होणार होती. या पाच न्यायमूर्तींपैकी आज न्यायमूर्ती कृष्ण मुरारी हे उपलब्ध नाहीत. त्यामुळं आजची सुनावणी लांबणीवर गेली आहे. आता राज्यातील सत्तासंघर्षावर पुढची सुनावणी कधी होणीर हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

दरम्यान, मागच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं दोन्ही पक्षकारांना लिखित बाजू मांडण्यास सांगितलं होतं. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पक्षकारांना तीन आठवड्यांची मुदत दिली होती. त्यानंतर आज होणारी सुनावणी राज्यातील शिंदे आणि फडणवीस सरकारच्या दृष्टीनं निर्णायक ठरण्याची शक्यता होती. मात्र, ही सुनावणी लांबणीवर गेल्यानं याबाबत कधी निर्णय लागणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Saturday, November 26, 2022

कराड शहर भाजपने केले मुख्यमंत्री शिंदे यांचे स्वागत ; शहरातील विकास कामाला निधी मिळणे बाबत केली चर्चा ; शहराध्यक्ष एकनाथ बांगडी यांची माहिती...

वेध माझा ऑनलाइन - कराडचे ज्येष्ठ नेते स्व..यशवंतरावजी चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त आदरांजली वाहण्यासाठी ज्येष्ठ नेते  मुख्यमंत्री मा.एकनाथजी  शिंदे कराडात आले होते त्यावेळी त्यांचे कराड शहर भाजपच्या वतीने शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांनी स्वागत केले. यावेळी आमदार व भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे उपस्थीत होते. 

भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयाभाऊ गोरे यांनी कराड शहरच्या पदाधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना परिचय करून दिला. यावेळी शहराध्यक्ष बागडी यांनी पुष्पपगुच्छ देवून मुख्यमंत्री शिंदे यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री शिंदे यांनीही भाजपच्या कार्यकारणीची विचारपुस करत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला  यावेळी शहराध्यक्ष बागडी यांनी शहरातील विकास कामाला निधी मिळणे बाबत 39 कोटीचा प्रस्ताव पूर्वी दि.4/11/2022 रोजी मुख्यमंत्री कार्यालयात सादर केलेला आहे तो निधी  मिळणेबाबत चर्चा केली. त्यावरही मुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मकता दाखवत  सुचना केल्या. यावेळी भाजपचे प्रशांत कुलकर्णी, सुदर्शन पाटसकर,प्रमोद शिंदे,श्री पेंढारकर,मुकुंद चरेगावकर,रुपेश मुळे,सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

कराडच्या छत्रपती संभाजी स्मारकास 8 कोटी निधी मंजूर ;

वेध माझा ऑनलाइन - येथील शंभूतीर्थावर स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री मा श्री एकनाथरावजी शिंदे साहेब व पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी खास बाब म्हणून सुमारे 8 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. नगरविकास विभागाच्या वैशिष्टय़पूर्ण योजनेअंतर्गत या निधीचा अध्यादेश पारीत झाला आहे. 

या स्मारकासाठी स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी स्मारक समितीचे सचिव रणजितनाना पाटील व त्यांचे बंधू व श्री सचिन पाटील तसेच श्री शंभुतीर्थ संवाद यात्रेचे प्रताप इंगवले.सागर आमले.सयाजी थोरात.सचिन वास्के दिपक थोरात सुनील शिंदे सचिन राऊत किरण शिंदे या सदस्यांनी केलेल्या अथक पाठपुराव्यास यश आले आहे.  

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार श्रीनिवास पाटील मंत्री ना उद्य सांमत आ. महेश शिंदे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते स्मारकाचे भूमिपूजन झाले आहे. हा निधी कराडकरांच्या भावना लक्षात घेऊन मंजूर केल्याबद्दल मा ना एकनाथरावजी शिंदे याचे कट्टर समर्थक श्री रणजीत नाना पाटील यांनी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांचे आभार मानले आहेत. या निधीत 90 टक्के हिस्सा राज्य शासनाचा तर 10 टक्के नगरपालिकेची लोकवर्गणी भरण्याची अट आहे.
याबाबत माहिती देताना श्री  रणजितनाना पाटील म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनात ऐतिहासिक कराडच्या भूमीचा इतिहास मोठा आहे. कराडच्या भूमीत त्यांच्या राज्याभिषेकाची बीजे आहेत. याची आठवण म्हणून येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक व्हावे.या साठी तत्कालीन नगरविकास मंत्री असताना दि 30 जानेवारी 2022 जागा उपलब्ध करुन दिली. हे स्मारक राज्यात भव्य असावे, हा हेतू ठेवून 10 फेब्रुवारी 22 स्वराज्यरक्षक धर्मवीर श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीची स्थापना करण्यात आली. 
समितीची स्थापना झाल्यानंतर नगरपालिकेकडे भेदा चौकातील साईट व्ही जागेची मागणी केली होती. नगरपालिकेने ठराव करून ही जागा स्मारकासाठी दिली. त्यानंतर विविध विभागांकडील परवानग्या, ना हरकत दाखले मिळवण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. 16 सप्टेंबर २०२२ रोजी सर्व परवानग्यांची पडताळणी करून जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी स्मारकास मंजुरी दिली. हे स्मारक लोकांच्या सहभागा तुन उभारण्याचा संकल्प केला होता. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची 1 नोव्हेंबर 22 दरे या गावी भेट घेऊन त्यांना स्मारकाचे क्ले मॉडेल दाखवत त्यांना भूमिपूजनास येण्याची विनंती केली होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी या संकल्पनेचे स्वागत करत सहकार्याची व 8 कोटी निधी देण्याचा शब्द दिली. त्यानंतर फक्त  तेवीस दिवसात मंत्रालयात व मुख्यमंत्री तसेच पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे अथक पाठपुरावा सचिन पाटील दादा व रणजितनाना पाटील हे समिती सदस्यांना घेऊन करत होते. शेवटी या प्रयत्नांना यश आले असून मुख्यमंत्र्यांनी स्मारकासाठी 8 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला.  
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कराडकरांना दिलेली ही अनोखी भेट आहे. हा निधी मंजूर झाल्याने समिती सदस्यांसह कराडकर नागरिक भारावलेले आहेत. मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांचे समितीतर्फे आभार मानत आहे. लवकरच या स्मारकाच्या उभारणीस प्रारंभ होणार आहे.

Friday, November 25, 2022

सत्तेसाठी हिंदुत्व कधीही सोडणार नाही...एकनाथ शिंदे यांची गर्जना ; राजेंद्रसिंह यादवांसह यशवंत आघाडीचा शिंदे गटात प्रवेश

वेध माझा ऑनलाइन - मला इथ येऊन घरी आल्यासारखं वाटतय...सातारा जिल्हा माझी जन्मभूमी आहे... या जिल्ह्याविषयी मला विशेष प्रेम आहे... अशा शब्दांनी आपल्या भाषणाची सुरुवात करत कराडकरांच्या भावनांचा थेट ठाव घेतच मुख्यमंत्र्यांनी आपले मनोगत व्यक्त करायला सुरुवात केली... ते म्हणाले...    कराड शहराच्या विकासकामांसाठी  माझ्याकडे निधीची मागणी करण्यात आली आहे...लिस्ट खूप मोठी आहे..., पण काळजी करू नका... मी शब्द देतो कराडला विकासनिधीची कमतरता भासणार नाही... भरघोस निधी मिळेल अशी ग्वाही देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कराड येथे बोलताना दिली... बाळासाहेबांची शिवसेनेचा मेळावा दत्त चौकात पार पडला. कराड नगरपालिकेतील यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्यासह नगरसेवकांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळी ते बोलत होते 

यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार महेश शिंदे, आमदार शहाजीबापू पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला युवक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.  

एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही गद्दारी केली असा आरोप आमच्यावर करतात; पण खरेतर टीका करणाऱयांनी बाळासाहेब ठाकरे विचारांशी व हिंदुत्वाशी गद्दारी केली आहे. आम्ही तर त्याला कामाने उत्तर देत आहोत. हा मिंदे गट नव्हे तर हा बाळासाहेबांच्या विचारांचा सच्चा शिंदे गट आहे. आम्ही जे करायचं ते उघड करतो. लपून-छपून काहीच करीत नाही. मी फक्त काम करत राहणार व महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणार आहे.  
बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन आम्ही निघालो आहोत. जुने शिवसैनिक माझ्याबरोबर का येतात? याचे आत्मचिंतन विरोधकांनी केलले बरे  काहीही झाले तरी आम्ही हिंदुत्वाशी गद्दारी करणार नाही असेही ते यावेळी म्हणाले.

राजेंद्रसिह यादव म्हणाले...
राजेंद्रसिंह यादव भूमिका स्पष्ट करताना म्हणाले, एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्याच्या शिरपेचतील मानाचा तुरा आहेत ते आपले वाटणारे आणि तळागाळातून आलेले असे कर्तृत्ववान नेते आहेत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी सहकार्य करावे अशी भावना त्यांनी व्यक्त केली आणि कराडचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय आहे असेही यादव यावेळी म्हणाले 

आमच्या आत्मविश्वासावर बोलण्याचा कोणाला अधिकार नाही ; ३० जूनलाच आम्ही मनगटातील ताकद दाखवून दिली आहे..मुख्यमंत्री शिंदे

वेध माझा ऑनलाइन - राष्ट्रवादी एक नंबर का आमचा पक्ष एक नंबर हे जनता ठरवत असते. आमचा लोकांना उद्योग आणि सुविधा देण्यावर भर आहे. त्यामुळे याचा फायदा लोकांना होत आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. करोनामध्ये मृत्यू झालेल्या लोकांच्या वारसांना कर्जमाफी करण्याचा निर्णय आधीच्या सरकारनं घेतला होता. मात्र, पैसे आम्ही भागवले आहेत.असं एकनाथ शिंदे यांनी आज बोलताना सांगितले. 

ते म्हणाले, आम्हाला कोणाला हात दाखवण्याची गरज नाही, आम्हाला तसली काही आवश्यकता नसून परिस्थिती बदलण्याची ताकद मनगटात असावी लागते. बाळासाहेबांनी आणि दिघे साहेबांनी आम्हाला बळ दिलं असून ३० जूनला आम्ही ते दाखवून दिलंय. आमच्या आत्मविश्वासावर बोलण्याचा कोणाला अधिकार नाही.जे लोक कमजोर असतात ते जोतिषाकडे जातात अघोरी विद्येचा आधार घेतात त्यांचा शेवट अघोरी होतो असंही ते एका प्रश्नावर बोलताना म्हणाले


कृष्णा हॉस्पिटलच्या वैद्यकीय सेवेचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक ; मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट; डॉ. अतुल भोसले व विनायक भोसले यांनी केले स्वागत

वेध माझा ऑनलाइन -  कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय सेवेतील योगदान अभूतपूर्व आहे. कोविड काळात कृष्णा हॉस्पिटलने दिलेली वैद्यकीय सेवा विशेष उल्लेखनीय आहे, असे गौरवोद्गार काढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृष्णा हॉस्पिटलच्या वैद्यकीय सेवेचे कौतुक केले. कराडच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री ना. शिंदे यांनी कृष्णा हॉस्पिटलला सदिच्छा भेट देऊन, कॅम्पसची पाहणी केली. 
         
भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी तथा कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले, श्री. विनायक भोसले, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री ना. शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी विशेष उपस्थित असलेले पालकमंत्री शंभुराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे, आ. महेश शिंदे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलिस अधीक्षक समीर शेख या मान्यवरांचेही स्वागत करण्यात आले. 
         
त्यानंतर मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी कॅम्पसची पाहणी केली. यावेळी डॉ. अतुल भोसले यांनी कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवेबद्दल माहिती देत, कोरोना काळात केलेल्या कार्याचा आढावा घेतला. याचबरोबर कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या शैक्षणिक कार्याची माहितीही मुख्यमंत्र्यांना दिली. तसेच कराड दक्षिणमधील विविध विकासकामांबाबत चर्चा केली. 
         
यावेळी य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, वसंतराव शिंदे, सयाजी यादव, भाजपाचे तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील, जि. प. सदस्य सागर शिवदास, कृष्णा विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. संजय पाटील, उमेश शिंदे यांच्यासह हॉस्पिटलचे डॉक्टर्स, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्वराज्यरक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन...

 वेध माझा ऑनलाईन - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कराडमधील शंभुतीर्थ  येथे उभारण्यात येणाऱ्या स्वराज्यरक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार श्रीनिवास पाटील,खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार महेश शिंदे, आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, श्री उद्यसिंह पाटील उंडाळकर, स्वराज्य रक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष जयंतकाका पाटील, सचिव रणजित पाटील, सचिन तुकाराम पाटील, खजिनदार प्रताप इंगवले, सागर आमले, संजय  थोरात  सचिन वास्के,अॅड दिपक थोरात, सचिन राऊत, सुनिल शिंदे भुषण जगताप आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्मारक समितीचे अध्यक्ष जयंतकाका पाटील व  रणजीत पाटील नाना यांनी स्वागत केले.

स्व यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या नेत्यांचे समाधीस्थळी अभिवादन

वेध माझा ऑनलाइन - स्व यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराड येथील त्यांच्या स्मृतीस्थळावर राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या नेत्यांसह विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

खासदार श्रीनिवास पाटील, माजी सहकार मंत्री, आमदार बाळासाहेब पाटील, जेष्ठ नेते विक्रमसिंह पाटणकर, प्रभाकर देशमुख, माजी सभापती देवराज पाटील आदींसह भाजपचे प्रदेश सचिव अतुल भोसले व भाजप पदाधिकाऱ्यांनीही अभिवादन केले

यावेळी बाळासाहेब पाटील म्हणाले,  यांत्रिकीकरण करण्याच्या माध्यमातून राज्याला पुढे नेले पाहिजे या यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने राज्याची प्रगती आजही चालू आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने आज पुरस्कार सोहळा असल्याने आज शरद पवार कराडला आले नसल्याची माहिती बाळासाहेब पाटील यांनी दिली.

डॉ अतुल भोसले म्हणाले...
सहकारी संस्थांबरोबर ग्रामीण अर्थव्यवस्था संस्था असतील याना बळकट करण्याचे काम यशवंतराव चव्हाण यांनी केले. महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेला नेले असे डॉ. अतुल भोसले यांवेळी म्हणाले

मुख्यमंत्र्यांनी केले कराडच्या भव्य प्रशासकीय इमारतींचे उदघाटन ; अनेक मान्यवरांची उपस्थिती

वेध माझा ऑनलाइन - आज कराड येथील विविध कामांची उदघाटने व लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते पार पडला यावेळी कराडच्या भव्य प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन व लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण  सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री  शंभूराज देसाई तसेच कराड शहरातील काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच कराड तालुक्यातील सर्व काँग्रेस प्रेमी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते

कराड विमानतळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतरीत करणार ; मुख्यमंत्री शिंदे यांची महत्वपूर्ण घोषणा ;

वेध माझा ऑनलाइन -  कराड विमानतळाच्या विकासासाठी कराड विमानतळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतर करण्यात येईल, अशी महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी आज कराड येथे केली
कराड येथे स्व यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाचे उदघाटन प्रसंगी ते बोलत होते
दरम्यान जिल्ह्यात कृषी उद्योग उभारण्यात येईल अशी घोषणा ही त्यांनी यावेळी केली

यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार महेश शिंदे, उपस्थित होते.

जिल्ह्यात विविध पिकांचे संशोधन होण्यासाठी बहुउद्देशीय कृषी संशोधन केंद्र उभारणीसाठी 10 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. लम्पी आजारामुळे ज्या पशुपालकांची जनावरे दगावले आहेत त्यांनाही शासनामार्फत मदत करण्यात येत आहे अतिवृष्टीचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले

राज्यपाल बदली होणार !

वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. अनेक राजकीय नेते आणि संघटनांनी भगतसिंग कोश्यारी यांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. यानंतर आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.

राज्यपाल दिल्लीला रवाना-
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेले आहे. या दौऱ्यात ते भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाची भेट घेऊन राज्यपालांच्या बदलण्याच्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यपाल बदलीबाबत केंद्रीय स्तरावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Thursday, November 24, 2022

कराडमधील कार्यक्रमांना अजितदादांना का बोलावले नाही ? आ पृथ्वीराजबाबा म्हणाले ; असे कार्यक्रम मुख्यमंत्री कार्यालयातून ठरतात ,कोणाला बोलवायचे हेही तेच ठरवतात...

वेध माझा ऑनलाइन -  आज कराडात मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणाऱ्या प्रशासकीय कार्यक्रमांना राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले... कराडमध्ये काही शासकीय कार्यक्रम आहेत तर काही राजकीय आहेत. हा शासनाचा प्रश्न आहे कि तो कार्यक्रम कसा घ्यायचा आणि कुणाला बोलवायचे हे त्यांनी ठरवायचं आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून हा कार्यक्रम ठरवला गेला आहे असे चव्हाण यांनी म्हंटले आहे.

कराड येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रीतिसंगम याठिकाणी आज त्यांच्या स्मृतीस्थळावर काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त म्हणाले की, अजित पवार यांना काही शासकीय कार्यक्रमाचे निमंत्रण दिले गेले नाही. मुख्यमंत्र्यांचे आजचे काही कार्यक्रम हे शासकीय आहेत तर काही राजकीय आहेत. शासकीय कार्यक्रमांचे नियोजन हे मुख्यमंत्री कार्यालयाकडून केले जाते. 

 

कराडातील प्रशासकीय इमारत, शासकीय विश्रामगृह लोकार्पण सोहळ्यास अजितदादाना निमंत्रण नाही ; आमदार बाळासाहेब पाटील नाराज ;

वेध माझा ऑनलाइन - आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रशासकीय इमारत, शासकीय विश्रामगृह याचे लोकार्पण होत आहे. राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे वित्तमंत्री असताना देखील त्यांना कार्यक्रमास निमंत्रण देण्यात आलेले नाही. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री,आ. बाळासाहेब पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कराड येथे यशवंतराव चव्हाण स्मृतीस्थळी आ. बाळासाहेब पाटील यांनी जाऊन अभिवादन केले यावेळी बाळासाहेब पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले, महाविकास आघाडी सरकार असताना किंवा त्या अगोदर असलेल्या सरकारमध्ये या दोन्ही वास्तूंना निधी मिळाला. तेव्हा अजित पवार हे उपमुख्यमंत्री वित्तमंत्री होते. त्यावेळेच्या सरकारने या वास्तूंना निधी दिला, त्यामुळे कराड शहराच्या परिसरात विकासात योगदान देणाऱ्या लोकांना या कार्यक्रमाचे निमंत्रित करणे गरजेचे होते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रण नसल्याची गोष्ट आम्हाला निमंत्रण पत्रिका वरून लक्षात आली आहे. प्रशासनाने मुख्यमंत्र्यांच्या लक्षात ही गोष्ट आणून द्यायला पाहिजे होती. ज्या- ज्या लोकांनी या विकास कामांमध्ये योगदान दिले त्यांना निमंत्रण देणे गरजेचे होते, असे पाटील यांनी म्हंटले.



Wednesday, November 23, 2022

कराड नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी होण्याबाबत पृथ्वीराज बाबांनी दिले संकेत ! ;

वेध माझा ऑनलाइन - स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढण्याचे ठरवले. भाजपला रोखण्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे मग कराड नगरपरिषदेच्या निवडणुकीत हा प्रयोग करणार का...या प्रश्नाचे उत्तर देताना निवडणुका जाहीर झाल्यानंतर जरूर याचा विचार करू असे सांगत आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमध्ये नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी होऊ शकते असे संकेत दिले आहेत

ते आज कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते

दरम्यान महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील राज्यपालांवर निशाणा साधत ते मुद्दामहून   वारंवार अशी वादग्रस्त वक्तव्य करत आहेत असे सांगितले त्यांना खरे तर हिमाचल प्रदेशला पुन्हा जायचं आहे. राजकारणात सक्रिय व्हायचे आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना जाऊ देत नाहीत, त्यांना तिकडे पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हायचे आहे. त्यामुळे ते महाराष्ट्रातुन हिमाचलला जाण्यासाठी अशी मुद्दामून वक्तव्य करत असल्याची खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली
दरम्यान, राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या विधानावरही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले भाजपने हा मुद्दा डोक्यावर घेण्यापेक्षा त्यांनी याविषयीची उत्तरे दिली पाहिजेत असेही आमदार चव्हाण म्हणाले

शुक्रवारी 25 नोव्हेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कराडात ; आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून झालेल्या विविध कामांची करणार उदघाटने ; पृथ्वीराज चव्हाणांची माहिती ;

वेध माझा ऑनलाइन - स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त येत्या शुक्रवारी दिनांक 25 रोजी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कराडात उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते कराड येथील प्रशासकीय मध्यवर्ती कार्यालयाचा लोकार्पण, शासकीय विश्रामगृहाचे उद्घाटनासह व कृष्णा नदीवरील रेठरे व पाचवडेश्वर-कोडोली नवीन पुलाचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिण मध्ये विविध विकास कामे झाली आहेत. मुख्यमंत्री असतानाच्या काळात व त्यानंतरही या विकास कामांची कार्यवाही व इतर कामे सुरू आहेत. आमदार चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड शहरात भव्य प्रशासकीय मध्यवर्ती कार्यालय बांधण्यात आले. या कार्यालयाचा लोकार्पण सोहळा तसेच नवीन विश्रामगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच रेठरे येथिल नवीन पुलाचे भूमिपूजन व पाचवडेश्वर कोडोली दरम्यान होणाऱ्या नवीन पुलाचे भूमिपूजन ही मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळावर श्रद्धांजली कार्यक्रम तसेच राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विकास कामांचा शुभारंभ व भूमिपूजन करण्यात करणार आहेत असेही आ.चव्हाण म्हणाले.

Tuesday, November 22, 2022

17 वे यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन...कृषी प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

वेध माझा ऑनलाइन -   कराड येथे आयोजित 17 वे यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन तसेच जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दि. 25 नोव्हेंबर 2022  रोजी सकाळी 10.30 वाजता  होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली. स्वा. सै. शामराव पाटील फळे व भाजीपाला मार्केट, बैल बाजार येथे दि. 24 ते 28 नोव्हेंबर 2022 दरम्यान या भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 

या कार्यक्रमास महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून जिल्ह्यातील सर्व  लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. 
दरवर्षी माजी उपपंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त शेती उत्पन्न बाजार समिती कराड, जिल्हा परिषद, सातारा, कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. गेली 2 वर्षे कोरोनामुळे हे प्रदर्शन आयोजित करता आले नाही. मात्र यावर्षी कोरोना निर्बंध हटल्यामुळे हे प्रदर्शन पुन:श्च एकदा आयोजित केले जात आहे. यंदाचे या प्रदर्शनाचे 17 वे वर्ष आहे.
लहरी हवामानामुळे बसणारा फटका व हातात आलेले पीक वाचवितांना शेतकऱ्यांची होणारी दमछाक, याचा विचार करता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आच्छादित शेतीकडे वळावे यासाठी यावर्षी संरक्षित शेती ही संकल्पना ठेवण्यात आली आहे. त्यानुसार प्रदर्शनामध्ये विविध प्रात्याक्षिके, प्रारुप व शासकीय योजनांची माहिती सादर केली जाणार आहे.
या प्रदर्शनामध्ये शंभर विविध शासकीय उपक्रम व शेतकऱ्यांसाठी स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ज्यामध्ये सिताफळ प्रक्रिया, नाचणी, खपली गहू, शेवया, आवळा, सेंद्रिय गूळ, सेंद्रिय शेती, जवस, बेदाणा, हळद, प्रक्रिया केलेले आले, ज्वारी, तांदूळ, परदेशी भाजीपाला, दुग्धप्रक्रिया, राजगिरा, कडधान्ये, संत्रा यांचा समावेश आहे.  तसेच कृषी क्षेत्राशी संबंधित तीनशे स्टॉल असे एकूण चारशे स्टॉल या प्रदर्शनात असणार आहेत.  
जिल्हा परिषदेच्या कृषी विकास विभागामार्फत विविध पिकांच्या स्पर्धा आयोजित केल्या असून दि. 24 नोव्हेंबर रोजी ऊस पीक स्पर्धा, दि.25 नोव्हेंबर रोजी केळी घड स्पर्धा, दि.26 नोव्हेंबर रोजी विविध फुले स्पर्धा, दि. 27  नोव्हेंबर रोजी विविध फळे स्पर्धा व दि.28 नोव्हेंबर रोजी भाजीपाला स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रु.3001/-, द्वितीय पारितोषिक रु.2101/-, तृतीय पारितोषिक रु. 1501/- आहे. या स्पर्धेसाठी कृषी विस्तार अधिकारी, पंचायत समिती, कराड यांच्याशी संपर्क साधावा.
 या प्रदर्शनामध्ये ड्रोन फवारणी, सोलर पंप, आच्छादित शेती, स्वयंचलित सूक्ष्म सिंचन, व्हर्टिकल फार्मिंग, बिन मातीची शेती (हायड्रोफोनिक्स), जैवइंधन आदींची प्रात्याक्षिके सादर केली जाणार आहेत. राज्य शासनाच्यावतीने होणाऱ्या जिल्हा कृषी महोत्सव योजनेतील राज्यातील पहिला जिल्हा कृषी महोत्सव देखील या कृषी प्रदर्शनादरम्यान आयोजित होत आहे.
या प्रदर्शनाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा यासाठी प्रत्येक गावातून शेतकरी सहलीचे आयोजन होणार आहे.   यावर्षी लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर पशुपक्षी प्रदर्शनामधून गाय, म्हैस स्पर्धा वगळण्यात आली आहे. मात्र शेळी, मेंढी प्रदर्शन व श्वान प्रदर्शन नेहमीप्रमाणे आयोजित केले जाणार आहे.
कृषी प्रदर्शन यशस्वी होणेसाठी सर्व विभागांनी सक्रीय सहभाग घ्यावा तसेच कृषी, ग्रामीण विकास, पशुसंवर्धन विभाग व अंगीकृत उपक्रम यांनी शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना जास्तीत जास्त शेतकऱ्ंयापर्यंत पोहोचवाव्यात अशा सूचना सर्व संबंधित विभागांना  जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी दिल्या  आहेत.

00000

भाजप नेते रावसाहेब दानवे यांचे अजब विधान ; म्हणाले --- आघाडी सरकार पडेल असे वाटले नव्हते ; आता दोन महिन्यांनी काय होणार ?दानवेंचे मध्यावती निवडणुकांचे संकेत -

वेध माझा ऑनलाइन -  राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे स्थीर असून लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याचे समजते मात्र, दुसरीकडे मध्यावधी निवडणुका लागण्याचे संकेत विरोधकांकडून सातत्याने देण्यात येत आहेत. आता, केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा मध्यावधींचे वेध लागले आहेत. तर, शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी दावनेंच्या विधानावरुन, हे सरकार १०० टक्के पडणार असल्याचं म्हटलंय. त्यामुळे, एकीकडे मंत्रीमंडळ विस्तार आणि दुसरीकडे मध्यावधींची चर्चा रंगली आहे. 

राज्यात लवकरच मध्यावधी निवडणुका लागतील, असा अंदाज विरोधी पक्षातल्या नेत्यांकडून गेल्या काही दिवसांत सातत्यानं व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्यापासून महाविकास आघाडीतील लहानमोठे अनेक नेते मध्यावधी निवडणुका लागण्याचा अंदाज व्यक्त करत आहेत. तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही काही दिवसांपूर्वी तोच सूर आळवला. जानेवारी महिन्यात मध्यावधी निवडणुका लागतील असं विधान राज ठाकरेंनी केलं होतं. आता, केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवेंच्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 
भाजप सेनेची युती तुटली, गेल्या २.५ वर्षांत चाललेलं महाविकास आघाडीचं सरकार पडेल, असं कुणालाही वाटत नव्हतं. पण, अशी जादू झाली की एक रात्रीत सरकार गेलं. आता, असंच राजकारण चाललं तर आणखी दोन महिन्यांनी काय होणार, याचा कोणी अंदाज लावला का? असे केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी म्हटलं. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तर  राज्यातील परिस्थिती पाहता राष्ट्रपती राजवट लावा आणि निवडणुका घ्या असं विधान केलंय. पण विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मध्यावधी निवडणुका लागणार नाहीत असं म्हटलं होतं.

दानवेंच्या विधानावर संजय राऊत म्हणतात...
रावसाहेब दानवे आमचे चांगले मित्र आहेत, त्यांची स्लीप ऑफ टंग होऊन ते खरं बोललेले आहेत. दोन महिन्यांनी वेगळं चित्र असेल म्हणजे मध्यावधीची घोषणा होऊ शकते. किंवा हे सरकार पडू शकतं, याचे संकेत रावसाहेब दानवेंनी दिले आहेत. हे सरकार १०० टक्के पडू शकतं, अशी माझ्याकडे पूर्णपणे माहिती व खात्री आहे, असेही ते म्हणाले.

Monday, November 21, 2022

मोदींना जीवे मारण्याची धमकी ; पाठवल्या 19 ऑडिओ क्लिप आणि 20 मेसेज ; पोलीस यंत्रणा अलर्ट ;

वेध माझा ऑनलाईन - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या कंट्रोल रुमच्या क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची माणसं मोदींची हत्या करतील असे मेसेज पाठवण्यात आले आहे. मागील दोन दिवसांपासून हे मेसेज पाठवले जात आहे. यात आतापर्यंत 19 ऑडिओ क्लिप आणि 20 मेसेज पाठवले आहे.  या घटनेमुळे पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे.

आज सकाळी मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या कंट्रोल रूमच्या क्रमांकावर अनेक व्हॉटसअप मेसेज आले. या मेसेजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे ठार मारण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली. या मेसेजमुळे एकच खळबळ उडाली. याबद्दल तातडीने वाहतूक शाखेनं वरिष्ठ पोलिसांना याबद्दल माहिती दिली. वरळी पोलीस स्टेशनमध्ये याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली असून मेसेज कुणी पाठवला, याचा शोध घेतला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसच्या ट्रॅफिक कंट्रोल मोबाईल क्रमांकावर हा धमकीचा मेसेज आला. यावेळी कंट्रोल नंबरवर अनेक ऑडिओ क्लिपसही आल्या आहेत. त्यापैकी एका क्लिपमध्ये मोदींना ठार मारण्याचा दावा केला आहे. "अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे गुंड देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करणार आहेत” आणि देश उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं या ऑडीओ क्लिपमध्ये म्हटलं आहे.
20 नोव्हेंबर रोजी ट्रॅफिक कंट्रोलच्या क्रमांकावर 7 ऑडिओ क्लिप आणि 11 मेसेज प्राप्त झाल्याची माहिती आहे. आणि 21 तारखेला 12 ऑडिओ आणि 9 मेसेजेस प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. या व्यक्तीपर्यंत पोलीस पोहोचले आहे. तपासात आढळून आले की, मेसेज करणारा व्यक्ती पूर्वी एका डायमंड कंपनीत दागिने घडवणारा कारागीर होता. परंतु मानसिक आजारामुळे त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आल्यानं तो एक वर्षांपासून बेरोजगार आहे. त्यातून त्याने हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. ही व्यक्त केरळमध्ये असल्याची माहितीही समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.

छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य ; औरंगाबाद बंदची हाक...

वेध माझा ऑनलाइन - भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी यांनी दोन दिवसापूर्वी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यभरात त्यांच्या विरोधात मोठा संताप पाहायला मिळत आहे. दरम्यान औरंगाबादच्या कन्नड तालुक्यात आज सुधांशू त्रिवेदी यांचा निषेध म्हणून बंदची हाक देण्यात आली आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी या बंदची हाक दिली आहे. विशेष म्हणजे याबाबत जाधव यांनी एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे.

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या माफीनाम्याचा मुद्दा उपस्थित केल्याप्रकरणी एका वृत्तवाहिनीवर याबाबत चर्चा सुरू होती. दरम्यान यावेळी बोलताना, छत्रपती शिवाजी महाराजांनीही औरंगजेबला पाच वेळा पत्र लिहिलं होतं, असं वक्तव्य सुधांशू त्रिवेदी यांनी केले होते. त्रिवेदी यांच्या या विधानाने राज्यभरात संताप पाहायला मिळतोय. अनेक ठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलने केली जात आहे. तर विरोधकांकडून देखील भाजपवर टीका केली जाते. अशातच त्रिवेदी यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी औरंगाबादच्या कन्नड तालुक्यात आज बंदची हाक देण्यात आली आहे.

एकनाथ खडसेंच्या मुलाची हत्या होती की आत्महत्या ? मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेना डिवचले ;

वेध माझा ऑनलाइन -  माजी मंत्री एकनाथ खडसे आणि विद्यमान मंत्री गिरीश महाजन यांच्यातील शाब्दिक युद्ध संपताना दिसत नाही. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीवरून महाजन-खडसे वाद पुन्हा उफाळून आला. हा वाद इतक्या टोकाला पोहचला की आता एकनाथ खडसेंच्या मुलाचं नेमकं काय झालं? ही हत्या होती की आत्महत्या हादेखील संशोधनाचा विषय आहे असं म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंना डिवचलं आहे. त्यामुळे आता या दोन्ही नेत्यांचा वाद वैयक्तिक पातळीवर पोहचल्याचं दिसून येत आहे. 

मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, मुलगा नसणं हे काही दुर्दैव नाही. मुली असणं सुदैवीच आहे. माझ्या मुली आहेत मला आनंद आहे. त्यांनाही एक मुलगा होता त्याचे काय झाले याचे उत्तरही खडसेंनी द्यावं. मला या विषयात बोलायचं नाही. परंतु ते माझ्या मुलाबाळांपर्यंत पोहचणार असतील तर त्यांच्या मुलाचं ३२ व्या वर्षी काय झालं? कशामुळे झाले? हा संशोधनाचा विषय आहे. मी अजून काही बोललो तर ते त्यांना झोंबेल 
जिल्हा नियोजन बैठकीत गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे समोरासमोर आले होते. तेव्हा दोन्ही नेत्यांमध्ये खडाजंगी झाली. या बैठकीनंतर एकनाथ खडसेंच्या मुलाची हत्या की आत्महत्या असा सवाल गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला. 

खडसेंचा पलटवार
माझ्या मुलाची हत्या झाली की आत्महत्या याबाबत शंका असेल तर ते सत्तेत आहेत. त्यांनी चौकशी केली तर माझी हरकत नाही असं एकनाथ खडसेंनी पलटवार केला. 
त्याचसोबत जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी घरात नव्हतो. रक्षा खडसे आणि दोघेच घरी होते. मग रक्षा खडसेंनी खून केला असे त्यांचे म्हणणं असेल तर त्याबाबत सीबीआयमार्फत चौकशी करावी. माझ्या अनेक प्रकरणाची चौकशी केली. कारण नसताना हे उद्योग चाललेत. माझी सीबीआय, अँन्टी करप्शन चौकशी सुरू आहे. मी ज्यांना मोठे केले त्याच माझ्यावर आरोप लावतायेत. दुर्दैवाने गिरीश महाजनांना मुलगा नसल्याने त्यांना माझे दु:ख कळणार नाही. घाणेरडे, नीच राजकारणात जायचं नाही. माझा एकुलता एक मुलगा गेला. त्यात असे आरोप करणे वेदनादायी आहे. कुणाचं व्यक्तिमत्व कसे आहे? मुलीबाळींशी कोण कसे वागतं हेदेखील सगळ्यांना माहिती आहे असं घणाघात एकनाथ खडसेंनी गिरीश महाजन यांच्यावर केला. 









  

कराडात राज्यपालांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडेमारो आंदोलन ; भगतसिह कोश्यारी यांनी जाहीर माफी मागावी, सर्वपक्षीय, संघटनेच्या नेत्यांकडून मागणी ;

वेध माझा ऑनलाइन - छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे नेते शुधांशू त्रिवेदी यांनी वादग्रस्त वक्तव्य केली. त्यांच्या वक्तव्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. याचे पडसाद ठिकठिकाणी उमटत आहे. कराडातही काँग्रेससह सामाजिक संघटनेचे नेते व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत राज्यपालांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडेमारो आंदोलन केले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी सर्वपक्षीय, संघटनेच्या नेत्यांकडून करण्यात आली.

कराड येथील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर सर्व संघटनेचे पदाधिकारी आज एकत्र आले. यावेळी त्यांनी सुरुवातीला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित महिला कार्यकर्त्यांनी राज्यपालांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारले. त्यानंतर त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी सर्वपक्षीय, संघटनेच्या नेत्यांकडून करण्यात आली.

Sunday, November 20, 2022

महिला पत्रकार साडी का नाही नेसत ? सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याने नवा वाद ! ;

वेध माझा ऑनलाइन - काहीच दिवसांपूर्वी संभाजी भिडे यांनी महिला पत्रकारासोबत बोलताना केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला होता. यानंतर आता सुप्रिया सुळे यांनीही महिला पत्रकारांना साडी का नेसत नाही? असा प्रश्न विचारला आहे.

'चॅनलमधल्या मुली साडी का नाही नेसत? शर्ट आणि ट्राऊजर का घालतात? मराठी भाषा बोलताना? मग मराठी संस्कृतीसारखे कपडे आपण का नाही घालत? आपण सगळ्या गोष्टींचं वेस्टर्नायझेशन करतोय', असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्याचा भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी समाचार घेतला आहे. 'टिकलीवर टीका करणारे साडीवर या नेत्यांना सोलणार का..? चला तुमची परीक्षा एकदा होऊन जाऊ द्या,' असं ट्वीट चित्रा वाघ यांनी केलं आहे. यासोबतच चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचा व्हिडिओदेखील शेअर केला आहे.

कराडचे नगराध्यक्ष दिवंगत पी डी पाटील साहेबांना यशवंतराव चव्हाण साहेबांचे पत्र ;...

वेध माझा ऑनलाइन - स्वर्गीय यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी कराड नगरपालिकेचे तत्कालिन नगराध्यक्ष स्वर्गीय पी डी पाटील साहेब यांना 16 मे 1961 साली एक पत्र लिहिले होते... आज कराड नगरपालिकेने ते पत्र प्रीतिसंगम घाटावरील स्वामींच्या बागेच्या प्रवेशद्वारावरच लावले आहे हे पत्र कराडकरांसाठी लक्षवेधी ठरत आहे... या पत्रावरील मजकुर कराडकर मोठ्या कुतूहलाने आवर्जून त्याठिकाणी थांबून वाचताना दिसत आहेत...

  चव्हाण साहेबांनी पी डी साहेबांना लिहिलेल्या या पत्रातील मचकुर असा की...
"कराडचे सर्वात महत्त्वाचे आकर्षण प्रीतीसंगम... आधुनिक नगररचनेत अशा नद्यांच्या किनाऱ्यांची योजनापूर्वक बांधणी करून आकर्षक बगीचे, फिरण्याची सोय करण्याच्या कल्पनेस महत्त्वाचे स्थान दिले जावे... स्वामींच्या बागेची जागा ताब्यात घेऊन तेथे एक सुंदर संगम उद्यान बनवणे शक्य आहे... भुईकोट किल्ल्याच्या संगमा शेजारील तटावर दुरुस्ती करून संगमाचे पावसाळ्यातील अलौकिक स्वरूप पाहण्यासाठी आकर्षक व्यवस्था करणे जरूर आहे... आपण व्यक्तीश: प्रयत्न करून नगरपालिकेचे या महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधावे म्हणून मी हा प्रश्न या शहराचा एक नागरिक या नात्याने लिहीत आहे"...
दरम्यान, हे पत्र तत्कालीन नगराध्यक्ष स्वर्गीय पी डी पाटील यांना स्वर्गीय चव्हाण साहेबांनी लिहून  त्याठिकाणी उद्यान निर्मितीबाबतची इच्छा व्यक्त केली होती... पी डी साहेबांनी देखील ती इच्छा शिरसावंद्य मानून या विषयाला साक्षात साकारण्यासाठी प्रयत्न करत प्रीतिसंगम बाग निर्माण केली... त्यात कालांतराने स्थित्यंतर झाली असतील..., कदाचित काही बदलही झाले असतील... मात्र मूळ उद्यान हे चव्हाण साहेबांना अपेक्षित असेच ठेवण्याचा पी डी साहेबांचा प्रयत्न राहिला हे आजही स्पष्ट जाणवते आहे...चव्हाण साहेबांनी पी डी साहेबांना लिहिलेल्या या पत्रातून चव्हाण साहेबांचा पी डी साहेबांवरील अतूट विश्वास तर दिसतोच... मात्र पी डी साहेबांनी देखील चव्हाण साहेबांच्या विश्वासाला सम्पूर्ण न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचेही यातून दिसते... चव्हाण साहेबांचे व पी डी साहेबांचे एकमेकांशी असलेले राजकीय गुरू-शिष्याचे नातेदेखील यातुन अधोरेखित होत आहे आणि ही बाब यानिमित्ताने प्रकर्षाने जाणवल्याशिवाय राहत नाही हेही तितकेच खरे ! 
दरम्यान चव्हाण साहेबांनी पाठवलेलं पत्र व त्या पत्राच्या प्रेरणेतून पी डी साहेबांनी त्यांच्या एका शब्दावर  साकारलेले येथील प्रीतिसंगम उद्यान म्हणजे सध्याच्या राजकारणापुढे ठेवलेला हा निष्ठेचा एक सुंदर आदर्शच म्हणावा लागेल...!

नरेंद्र मोदी माझे आवडते पंतप्रधान ; खासदार सुप्रिया सुळे यांचे विधान ;

वेध माझा ऑनलाइन - आताच्या घडीला अनेकविध मुद्द्यांवरून राज्यातील राजकारण तापलेले पाहायला मिळत आहे.  काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी वीर सावरकरांवर केलेल्या विधानांचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. भाजप, शिंदे गटाकडून राहुल गांधींवर जोरदार टीका करण्यात आली. यानंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या विधानांमुळे विरोधकांकडून सत्तधारी भाजपवर जोरदार निशाणा साधला जात आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारचे तोंडभरुन कौतुक करताना नरेंद्र मोदी हे आवडते पंतप्रधान असल्याचे म्हटले आहे. 

एका कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची प्रशंसा केली. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानावर तीव्र शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली. आमच्या छत्रपतींच्या विरोधात बोलणार असाल तर आम्ही खपवून घेणार नाही. चूक एकदा होऊ शकते. मात्र वारंवार करणे म्हंजे ती त्यांची चॉईस. हर हर महादेव चित्रपटामध्ये चुकीच्या गोष्टी दाखवल्या गेल्या. भाजप नेते सुधांशू त्रिवेदी यांनी जे बोलले असा इतिहास कोणी वाचला का? यांना कोणी इतिहास कसा सांगत नाही, अशी विचारणा सुप्रिया सुळे यांनी केली. तसेच छत्रपती यांच्या विरोधात बोलले तर हे काहीही करू शकतात. छत्रपतींच्या विरोधात कोणीही बोलला तर आम्ही खपवून घेणार नाही. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करणार, असा इशाराही सुळे यांनी दिला केंद्र सरकारच्या विरोधात मी लिहीत नाही. ते काही चांगल्या गोष्टी देखील करत आहेत. नरेंद्र मोदी माझे आवडते पंतप्रधान आहेत, असे सुप्रिया सुळे यांनी नमूद केले. तसेच भारत जोडो यात्रा मला आवडते. आम्ही एका विचारांचे आहोत. काँग्रेस नेते राहुल गांधी चांगला प्रयोग करत आहेत. भारत जोडो एक वेगळा प्रयत्न आहे. भारत जोडो यात्रा ही फक्त राहुल गांधीची यात्रा नाही तर सर्व भारतीयांची आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. 


संजय राऊत म्हणतात...तर,महाविकास आघाडी फुटू शकते ; याबाबत,अजितदादा काय म्हणाले? वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन - काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेनिमित्त महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रात असताना राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला. भाजपने राहुल गांधींवर टीकेची झोड उठवली, तर शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी राहुल गांधींची भारत जोडो यात्रा थांबवण्याची मागणी केली. मनसेनेही राहुल गांधींविरोधात आंदोलन केलं. राहुल गांधींच्या या वक्तव्यावरून भाजप, शिंदे गट आणि मनसेकडून शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधण्यात आला. राहुल गांधींच्या या वक्तव्याशी सहमत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे महाविकासआघाडी फुटू शकते, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

जोपर्यंत शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांचे आशिर्वाद आहेत, तोपर्यंत महाविकासआघाडीला किंचितही धोका नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत.
'मला सावरकरांविषयी बोलायचं नाही. महागाई, बेरोजगारी वाढत आहे. राज्यात बरेच भीषण प्रश्न आहेत. राजकीय नेते, मीडिया यांनी कोणत्या विषयाला प्राधान्य द्यायचं, हे ठरवलं पाहिजे. अनेक वर्षांपूर्वी घडून गेलेल्या गोष्टींबाबत, व्यक्तीचा उल्लेख करून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न कुणी करू नये,' अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.'या सरकारने महाविकासआघाडीच्या आमदारांच्या कामाला स्थगिती दिली आहे. या कामांना विधिमंडळाची मंजुरी मिळाली आहे, त्यामुळे स्थगिती देणं योग्य नाही. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनाही प्रत्येक भेटीत हे सांगितलं आहे. नव्या कामांना मंजुरी देण्याबाबत दुमत नाही, पण मागची कामं थांबवण्याचं काही कारण नाही. सत्ता कायम राहत नाही, हे लक्षात ठेवून विरोधकांना सापत्नभावाची वागणूक देऊ नये,' असा सल्ला अजित पवारांनी राज्य सरकारला दिला आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल आणि भाजपच्या प्रवक्त्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान करुन 72 तास झाले. तरीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गप्प का ? संजय राऊत यांचा हल्लाबोल...

वेध माझा ऑनलाइन - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे  राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदि यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. त्यांच्या या विधानाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, छत्रपतींनी जर माफी मागितली तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येऊन शिवरायांचा जयजयकार का करतात? भारतीय नौदलाला  त्यांनी जे काय नवीन बोधचिन्ह दिलय, शिवाजी महाराजांच्या नौसेनेचं ते कशासाठी दिलं आहे? औरंगजेबाच्या आणि अफजलखानाच्या कबरी तोडण्याचे नाटक कशासाठी करत आहात? असे प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केले आहेत.

यावेळी राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 40 आमदारांवर टीका केली. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शिवसेना फोडली, ते स्वाभिमानाचं तुणतुणं वाजवत, स्वाभिमान… स्वाभिमान म्हणत भाजपसोबत गेले ना, मग आता कुठे गेला तुमचा स्वाभिमान? राज्यपाल आणि भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांनी राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर शिवाजी महाराजांचा अपमान करुन 72 तास झाले. तरीही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि त्यांचे 40 लोक यावर साधा निषेधही करु शकले नाहीत. इतके तुम्ही घाबरत आहात? असा टोला राऊत यांनी लगावला.

महाराष्ट्र्- कर्नाटक सीमाप्रश्न ; समितीचे पुनर्गठन ; देवेंद्र फडणवीस, शरद पवार, यांच्यासह आ.पृथ्वीराज चव्हाण यांचाही समितीत समावेश ; उद्या समितीची पहिली बैठक ;

वेध माझा ऑनलाइन -  महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भाबद्दलच्या उच्चाधिकार समितीचे महाराष्ट्र सरकारने पुर्नगठन केले आहे. सर्वपक्षीय समितीमध्ये काँग्रेस कडून पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी कडून शरद पवार, अजित पवार शिवसेनेकडून अंबादास दानवे यांच्यासह शिंदे सरकारमधील काही मंत्र्याचा समावेश आहे.

शासनाने काल जारी केलेल्या एका परिपत्रकाद्वारे महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाबद्दलच्या पुर्नगठीत उच्चाधिकार समितीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अध्यक्ष असतील व विविध राजकीय पक्षांचे इतर १४ सदस्य असतील. सदर समितीमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा. शरद पवार, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, सुरेश खाडे, तानाजी सावंत, रवींद्र चव्हाण, दीपक केसरकर, व शंभूराज देसाई हे मंत्री, तसेच माजी आमदार राजेश क्षीरसागर, विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार, व विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचा समावेश करण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाबद्दल सर्वोच्च न्यायालयात चाललेल्या विवादामध्ये राज्याची बाजू सक्षमपणे मांडण्यासाठी या समितीकडून मार्गदर्शन अपेक्षीत आहे.  या समितीची पहिली बैठक येत्या सोमवारी, दि. २१ नोव्हेम्बर २०२२, रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे होणार आहे.

आ.पृथ्वीराज चव्हाण म्हणतात ... दिवंगत इंदिरा गांधी यांनी सत्तेत असताना सावरकरांना मानत त्यांच्या नावाचं तिकीट काढलं होतं...

वेध माझा ऑनलाईन -  राहुल गांधी यांच्या सावरकरांबाबतच्या वक्तव्यानंतर काँग्रेस नेत्यांकडून आपली भूमिका मांडली जात आहे. काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका कार्यक्रमात राहुल गांधी व सावरकर यांच्याबाबत आपली भूमिका मांडली आहे. ‘कोणत्याही ऐतिहासिक पुरुषाकडे आजच्या स्थितीतून पाहताना प्रत्येकाने सावधगिरी बाळगली पाहिजे. देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी सत्तेत असताना सावरकरांच्या नावाचं तिकीट काढलं होतं हे विसरता कामा नये,” असेही चव्हाण यांनी म्हंटले आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र टाईम्सने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानाबाबत मुंबईत आपले मत व्यक्त केले आहे. यावेळी ते म्हणाले की, ज्याप्रमाणे इतिहासाचे अभ्यासक एखाद्या ऐतिहासिक घटनेकडे पाहतात त्याचप्रमाणे सामान्य माणूस बघत नाही. आपल्याला जे सोयीस्कर वाटते तेच तो पाहतो आणि त्यावरून आपले मत बनवतो. इतिहासातील कोणत्याही व्यक्तीकडे पाहिले तर त्याच्यात काहीतरी गुण-दोष आढळतात त्याच्यातील गुण-दोषांचे योग्य मूल्यमापन झाले पाहिजे. एखाद्याने चांगलयाप्रकारचे काम, कार्य केले असेल तर चांगलेच म्हंटले पाहिजे.देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी या ज्यावेळी सत्तेत होत्या. त्यावेळी त्यांनी सावरकर यांच्या नावाचे तिकीट काढले होते. सावरकरांनी इंग्रजांना पत्रे लिहिली आहेत, त्यांना पेन्शनही मिळत होती त्याचप्रमाणे त्यानी जे योगदान दिले आहे तेही विसरता येणार नाही असेही चव्हाण यांनी म्हटले आहे 


Saturday, November 19, 2022

कराडच्या सोमवार पेठेत अजय उंडाळकर व मित्रपरिवाराने बसवले 13 सीसीटीव्हो कॅमेरे ; उपक्रमाचे सर्वत्र होतंय कौतुक ;

वेध माझा ऑनलाइन -
 सामाजिक कार्यकर्ते अजय कुलकर्णी- उंडाळकर व मित्रपरिवाराच्या वतीने येथील सोमवार पेठेत सीसीटीव्ही कॅमेरे  बसवण्यात आले आहेत उंडाळकर यांच्यावतीने 7 अणि त्यांच्या मित्र परिवाराच्यावतीने 6 असे मिळून एकूण 13 सीसीटीव्ही कॅमेरे याठिकाणी बसवण्यात आले आहेत सोमवार पेठेत चेन स्नेचिंग च्या घटना पुन्हा वाढल्या आहेत  त्यामुळे अजय उंडाळकर व मित्रपरिवाराकडून बसवलेले कॅमेरे आता या चोरट्यांवर नजर ठेवून असणार आहेत अजय उंडाळकर व मित्रपरिवाराच्या वतीने राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे

दरम्यान, अजय उंडाळकर हे सोमवार पेठेतील सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत त्यांनी गेल्या कोविड काळात मोठं काम केल्याचे सर्वजण जाणतात लॉक डाऊन काळात भाजीपाला ,दूध, किरणामाल घरोघरी पोचवणे यांसह कोविड लसीकरण करण्यासंबंधी मोठी जनजागृती करण्यासाठी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगले काम केले आहे कोविड लस कधी कुठे किती वयोगटातील लोकांसाठी उपलब्ध आहे याबाबतचे सविस्तर विवरण त्या-त्या वेळी करत  उंडाळकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबतची जागृती केल्याचे सर्वजणच जाणतात आधार कार्ड काढून देणे, मतदार यादीत संबंधितांना  नोंदणी करण्यासाठी सहकार्य करण्याचे त्यांचे काम गेली 10 वर्षांपासून सातत्याने सुरू आहे त्यांच्या मित्रपरिवाराचे त्यांना सामाजिक कार्यात नेहमी सहकार्य असते
त्यांनी व मित्रपरिवाराने मिळून नुकतेच सोमवार पेठेत  13 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत भैरोबा गल्ली- मयूर गणेश मंडळ चौक, शिखरे चौकातून सोमवार पेठ पाण्याच्या टाकीकडे जाणाऱ्या काळा मारुती मंदिराकडील रस्त्याचा एरिया या कॅमेऱ्यात येतो आहे 
दरम्यान, काही दिवसापूर्वी याच सोमवार पेठ परिसरात चेन स्नेचिंग च्या घटना घडल्या आहेत मात्र उंडाळकर आणि मित्रपरिवाराने नुकत्याच बसवलेल्या या कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे चोरटे कैद होण्यास यापुढे नक्कीच मदत होणार आहे अजय उंडाळकर व मित्रपरिवाराचे या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे

कराडच्या शाहू चौकातील मोबाईल दुकानात चोरी ; तीनजण अटकेत ; मुद्देमाल जप्त

वेध माझा ऑनलाइन - कराडच्या शाहु चाैकातील जय महाराष्ट्र मोबाईल दुकानात अज्ञात चोरट्यांनी 78 हजार रुपये किंमतीच्या साहित्य व मोबाईल हॅन्डसेटची चोरी केली होती याबाबतची फिर्याद दिपक सोनाराम पुरोहीत यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणात वैभव वसंतराव पाटील वय- 23 वर्षे, रा. कोरेगाव ता. कराड, अल्ताफ मगदुम मुल्ला वय- 19 वर्षे, रा. चचेगाव ता. कराड, प्रतिक अजयचंद्र काळोखे वय- 18 वर्षे, रा. सिद्धार्थनगर चचेगाव ता. कराड याना अटक करण्यात आली आहे

वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, कराड शहरामध्ये तीन इसम कमी किंमतीमध्ये मोबाईल हॅन्डसेट व मोबाईलचे साहित्य विक्री करीत आहेत. सपोनि अमित बाबर व पथकास प्राप्त झाले बातमीचा आशय समजावून सांगून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे तपास पथकाने नमुद तीन इसमांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून गुन्हयात चोरीस गेलेल्या मालापैकी 73 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच गुन्ह्यात वापरलेली 40 हजार रुपये किंमतीची मोपेड असा एकुण 1 लाख 13 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, सपोनि अमित बाबर, सपोनि सखाराम बिराजदार, पोलीस अंमलदार सतीश जाधव, रघुवीर देसाई, नितीन येळवे, जयसिंग राजगे, संजय जाधव, प्रफुल्ल गाडे, आनंदा जाधव, महेश शिंदे, संतोष लोहार, रईस सय्यद, सोनाली मोहिते यांनी सदरची कारवाई केली आहे.


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मंत्रालय सहाय्यक कक्ष अधिकारी परीक्षेत घोणशीच्या कु.ऐश्वर्या पवार चे नेत्रदीपक यश ; मुलींमध्ये राज्यात तिसरी ;

वेध माझा ऑनलाइन - घोणशी तालुका कराड येथील कु.ऐश्वर्या आनंदराव गुरव हिने सहाय्यक कक्ष अधिकारी परीक्षेत संपूर्ण राज्यात मुलींमध्ये  तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे कठोर परिश्रम आणि प्रबळ इच्छा शक्तीच्या बळावर वहागावच्या अण्णाजी पवार विद्यालयाच्या या विद्यार्थिनीने हे यश प्राप्त केले आहे तिचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने झालेल्या मंत्रालय सहाय्यक कक्ष अधिकारी एएसओ या परीक्षेत वाहगाव येथील अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयाची विद्यार्थिनी ऐश्वर्या आनंदराव गुरव हिने राज्यात मुलींमध्ये तिसरा क्रमांक मिळवला.. ग्रामीण भागातील सर्वसामान्य घरातील मुलीने मिळवलेले हे यश कराड तालुक्यासह सातारा जिल्ह्याची मान उंचावणारे आहे.. ऐश्वर्याचे माध्यमिक शिक्षण अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालय वाहागाव येथे झाले तर महाविद्यालयीन शिक्षण SGM कॉलेज कराड येथे झाले तसेच अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट वाठार तर्फ वडगाव येथे तिचे इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाले आहे.. याहीपेक्षा वेगळे काहीतरी करण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या ऐश्वर्याने प्रबळ इच्छाशक्ती आई-वडील मित्र-मैत्रिणींचे मार्गदर्शन आणि कठोर परिश्रमाच्या बळावर राज्यात मुलींमध्ये तिसरा क्रमांक मिळवत सहाय्यक कक्ष अधिकारी पदावर मजल मारली या यशामध्ये तिचे वडील आनंदराव बाबुराव गुरव आई अरुणा गुरव तसेच तिची बहीण अपर्णा व ओंकार यांचे अनमोल योगदान लाभले.. ऐश्वर्याने मिळवलेल्या या यशाबद्दल तिच्या मित्र-मैत्रिणींनी गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला ऐश्वर्याने मिळवलेले हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणादायी ठरणारे आहे तिच्या या यशाबद्दल तिचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे

Friday, November 18, 2022

अजित पवारांवर फौजदारी प्रक्रिया ? शिखर बँक घोटाळा प्रकरण ; काय आहे बातमी ?

वेध माझा ऑनलाईन- महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत (शिखर बँक) २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार व अन्य जणांवर फौजदारी प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी करणारा अर्ज शुक्रवारी विशेष न्यायालयात दाखल करण्यात आला.

न्यायालयाने या अर्जावरील पुढील सुनावणी ३ डिसेंबर रोजी ठेवली आहे. या प्रकरणी अद्याप तपास यंत्रणेने एकाही आरोपीला अटक केलेली नाही. 
७५ आरोपींविरोधात फौजदारी प्रक्रिया सुरू करण्यासाठी पुरेशी कागदपत्रे उपलब्ध आहेत, असे अपक्ष आमदार माणिक जाधव यांनी अर्जात म्हटले आहे. या घोटाळ्यात अनेक बड्या राजकीय नेत्यांचा हात आहे. त्यात अजित पवार, शिखर बँकेचे ७५ संचालक आणि जिल्हा सहकारी  मध्यवर्ती बँकेच्या संचालकांचाही समावेश आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर २०१८ मध्ये ईओडब्ल्यूने या प्रकरणी तपास करण्यास सुरुवात केली, असे जाधव यांनी अर्जात म्हटले आहे.
महाविकास आघाडी सत्तेत असताना तपास अधिकाऱ्यांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केला. मात्र, आता सत्तांतर झाल्याने हा तपास पुढे जाऊ शकतो, असे जाधव यांनी अर्जात म्हटले आहे. जाधव यांनी ॲड. सतीश तळेकर यांच्याद्वारे विशेष न्यायालयात नव्याने अर्ज दाखल केला आहे. 
घोटाळ्यात केवळ शिखर बँकेचा समावेश नाही, तर राज्यातील ३१ जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचाही समावेश आहे. त्यासंदर्भातही तपास होणे आवश्यक आहे, असे जाधव यांनी अर्जात म्हटले आहे. या घोटाळ्यात काही माजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा समावेश आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

अखेर बँकांचा संप मागे, चर्चेनंतर संप मागे घेण्याची ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनची घोषणा...19 नोव्हेंबर रोजी देशव्यापी संपाची हाक दिली होती...

वेध माझा ऑनलाइन - ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनकडून उद्या देशव्यापी बँक संप मागे घेण्यात आला आहे. त्यामुळं उद्या देशभरातील बॅंका सुरु राहणार आहेत आणि त्यापुढेही कामकाजाच्या दिवशी बँका सुरु राहतील. कर्मचाऱ्यांच्या मागील 5 वर्षांपासून लावून धरलेल्या मागण्यांवर तोडगा काढण्यास इंडियन बॅंक असोसिएशन आणि आर्थिक सेवा विभागाकडून होकार देण्यात आला आहे. मुख्य कामगार आयुक्तां सोबत बॅंक संघटनांच्या झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

आऊटसोर्सिंग आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रान्सफर्स बॅंकिंग इंडस्ट्रीजच्या मान्यतेविना होणार नाही. सोबतच बॅंकांकडून कामगार कायद्यांची अंमलबजावणी सक्तीनं करणार, कामगार कायद्यांचे पालन होत नसल्याचा बॅंकिंग संघटनांचा आरोप होता. काही बॅंकांचे कर्मचाऱ्यांसोबत असलेल्या वादावर देखील लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय कामगार आयुक्तांनी पुढाकार दाखवला आहे. या चर्चेनंतर अखेर ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनकडून उद्यापासून पुकारण्यात आलेला संप मागे घेतला आहे. 
ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन ने कॅथोलिक सीरियन बँक आणि डीबीएस बँकेच्या कर्मचार्‍यांना 11 व्या द्विपक्षीय वेतन सुधारणा नाकारण्यासह कायमस्वरुपी नोकऱ्यांचे आऊटसोर्सिंग आणि काही बँकांमधील नोकरीच्या सुरक्षिततेला धोका यासह अनेक मुद्द्यांच्या निषेधार्थ 19 नोव्हेंबर रोजी देशव्यापी संपाची हाक दिली होती.त्यानंतर आज या मागण्यांबाबत चर्चा होऊन तोडगा निघाला त्यामुळे ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने संप मागे घेण्याची घोषणा केली. 


कराडात भाजपाच्या वतीने राहुल गांधींचा जाहीर निषेध ; काँग्रेस,आणि राहुल गांधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी ;

वेध माझा ऑनलाइन - स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल  आक्षेपार्ह व अपमानकारक विधान करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आज भारतीय जनता पार्टी कराड शहर तसेच कराड दक्षिण - उत्तर कार्यकारणीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला यावेळी राहुल गांधी व काँग्रेस विरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली

यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस महेंद्रकुमार डूबल,शहराध्यक्ष एकनाथ बागडी,कराड उत्तर तालुका अध्यक्ष महेश जाधव,नगरसेवक सुहास जगताप,उपाध्यक्ष प्रमोद शिंदे,उपाध्यक्ष मुकुंद चारेगावकर, सूर्यकांत पडवळ,नितीन वास्के,सागर लादे,अल्पसंख्याक शहराध्यक्ष नितीन शाह,कामगार आघाडी शहराध्यक्ष विश्वनाथ फुटाणे,ओबीसी जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे,सुनील नाकोड,युवा मोर्चा उपाध्यक्ष शैलेंद्र गोंदकर,गणेश कापसे,ऋषिकेश मोटेकर,संकेत फडके,शरद साळुंखे,संकेत फडके,ओंकार ढेरे,रोहित डूबल,अंकुश लोहार,अक्षय चव्हाण,शहाजी मोहिते,सयाजी मोहिते,ओंकार कर्णिक,प्रकाश जाधव,श्रीकांत साने, त्याचबरोबर सावरकर समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजप हिंसा, द्वेष, दहशत पसरवतंय ; राहुल गांधींचा शेगावात हल्लाबोल

वेध माझा ऑनलाइन - भाजप हिंसा, द्वेष, दहशत पसरवतंय, याविरोधातच भारत जोडो यात्रा आहे असं म्हणत राहुल गांधींनी शेगावात भाजप वर जोरदार हल्लाबोल केला...
राहुल गांधी म्हणाले की, 70 दिवसांआधी ही यात्रा कन्याकुमारीपासून सुरु झाली. समुद्रकिनारी यात्रेला सुरुवात झाली. प्रत्येक दिवशी 25 किलोमीटर ही यात्रा चालते. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगाणा, आंध्र आणि आता महाराष्ट्रात ही यात्रा आली. विरोधकांनी सवाल केला होता की, यात्रेची गरज काय? काय फायदा आहे? देशात आज भाजपनं हिंसा, द्वेश आणि दहशत पसरवली आहे. या दहशत, द्वेष आणि हिंसेच्या विरोधात ही यात्रा सुरु केली. या यात्रेचं ध्येय कुणाला काही समजवायचं नाही. या यात्रेचा उद्देश आपला आवाज, आपलं दु:ख समजून घेण्याचा आहे, असं काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी आज शेगावमध्ये आयोजित सभेमध्ये बोलत होते. 

सुरुवातीला त्यांनी संत गजानन महाराजांचा जयघोष केला राहुल गांधी म्हणाले की, भीती, हिंसा, द्वेषानं तोडलं जातं तर प्रेमानं सर्व जोडलं जातं. भारत जोडोचं ध्येय हे 'मन की बात' करण्यासाठी नाही, असा टोलाही राहुल गांधींनी लगावला भारत जोडो यात्रेदरम्यान आज राहुल गांधींची आज शेगावमध्ये सभा झाली. सभेआधी राहुल गांधी यांनी शेगावच्या गजानन महाराज मंदिरात दर्शन घेतलं. राहुल गांधी यांनी शेगावच्या गजानन महाराज मंदिरात रांगेत उभे राहत महाप्रसाद ग्रहण केला. आपले ताट स्वत: उचलून वॉश बेसिनमध्ये नेले. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल आणि काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते. राहुल गांधी यांना मंचावर पोहोचताच वारकऱ्यांचा फेटा घालण्यात आला. या सभेआधी मनसेनं राहुल गांधींविरोधात निदर्शनं केली. पोलिसांनी शेगावला पोहोचण्याआधीच काही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं.

 

उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार ? महाविकास आघाडी फुटणार ?

वेध माझा ऑनलाइन -  काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विनायक दामोदर सावरकर यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने देशभरात खळबळ माजली आहे. राज्यातील महाविकास आघाडीतील मित्र पक्षांची यामुळे अडचण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आघाडीत बिघाडी झाल्याचं स्वतः शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज सकाळी प्रतिक्रिया देताना स्पष्ट संकेत दिलेत. सावरकरांच्या मुद्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मोठी कोंडी झालीय. शिवसेनेची भूमिका आणि काँग्रेसची भूमीका दोन्ही परस्पर विरुद्ध असल्यामुळे राहुल गांधींची सावरकरांबद्दलची भूमिका ठाकरे गटात अस्वस्थाता निर्माण करत आहे. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राहुल गांधी यांनी सावरकर यांच्यावर केलेलं वक्तव्य हे शिवसेनेला मान्य नाही. सावरकर हे महाराष्ट्रासाठी देशासाठी आदराचं आणि श्रद्धेचा विषय आहे विशेषता आमच्यासाठी, असं संजय राऊत यांनी स्पष्ट सांगितलं. भारत जोडो यात्रेचा हा अजेंडा नव्हता, हा विषय नव्हता, आमची भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही आमच्या भूमीकेवर ठाम आहोत आणि राहणार. आम्ही सावरकरांवर केलेली टिपणी सहन करणार नाही, असंही संजय राऊत म्हणाले दरम्यान, महाविकास आघाडीत फूट पडू शकते असही संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी संजय राऊत यांना फोन करुन त्यांच्याशी संवाद साधला आहे.




पुण्यात भाजप कार्यकर्त्यांकडून काँग्रेस कार्यालयावर निषेध मोर्चा ; जोरदार घोषणाबाजी ; राहुल गांधी मुर्दाबादच्या घोषणा ; पंडित नेहरुंनी सावरकरांची माफी मागितल्याचे पोस्टर पुण्यात लावण्यात आले ;

वेध माझा ऑनलाइन - स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबतीत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता भाजप आक्रमक झाली आहे. पुण्यात भाजप कार्यकर्त्यांकडून काँग्रेस कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत राहुल गांधी मुर्दाबादच्या घोषणा दिल्या तसेच पंडित जवाहरलाल नेहरुंनी सावरकरांची माफी मागितल्याचे पोस्टर लावण्यात आले. दरम्यान याबाबत पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत भाजप कार्यकर्त्यांची धरपकड केली. यावेळी काही काळ वातावरण तणावाचे बनले होते.

पुणे काँग्रेस भवनातील भारत जोडो याञा वाहनावरील राहुल गांधी यांच्या फोटोलाही काळ फासलं. तसच नेहरू  यांनीही माफी मागितल्याचे पोस्टर लावले होते ते सर्व पोस्टर काँग्रेस कार्यकर्त्यांनी लगेच काढूनही टाकले. पुणे पोलिसांनी याप्रकरणी 15 भाजप कार्यकर्ते ताब्यात घेतले आहेत. दरम्यान काही काळ जोरदार घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता. यावेळी काही काळ वातावरण तणावाचे बनले होते.

Thursday, November 17, 2022

शिवसेना कुणाची ? ; ठाकरे आणि शिंदे गटातली लढत आता निर्णायक टप्प्यावर ;एका दिवसात 1 लाख 10 हजार शपथपत्र दाखल केल्याचा ठाकरे गटाकडून दावा ; निवडणूक आयोगाने 23 नोव्हेंबरपर्यंत कागदपत्रं सादर करण्यासाठी दिली मुदत;

वेध माझा ऑनलाइन - शिवसेना कुणाची हा वाद सध्या निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे. शिवसेनेतली ठाकरे आणि शिंदे गटातली लढत आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे, कारण ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे ट्रक भरून कागदपत्रं दाखल करण्यात आली आहेत. आजच्या एका दिवसातच 1 लाख 10 हजार शपथपत्र दाखल केल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे.निवडणूक आयोगाने 23 नोव्हेंबरपर्यंत कागदपत्रं सादर करण्यासाठीची मुदत दिली आहे, तोपर्यंत दोन्ही गटांकडून पक्षाचा ताबा मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत.

विधानपरिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांसोबत बंड केलं. शिंदेंच्या या बंडामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं, त्यामुळे महाविकासआघाडी सरकार कोसळलं. यानंतर भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. शिवसेनेतलं हे बंड आमदारांपर्यंतच थांबलं नाही तर 18 पैकी 13 खासदारांनीही शिंदेंना साथ दिली, याचसोबत शिवसेनेचे पदाधिकारीही शिंदे गटात दाखल झाले.लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी थेट शिवसेनेवरच दावा ठोकला. हा वाद सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने निवडणूक आयोगाला याबाबत निर्णय घ्यायला सांगितला.शिवसेना कुणाची हा वाद सुरू असतानाच अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक लागली, त्यामुळे निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं आणि दोन्ही गटांना वेगवेगळी नावं दिली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिलं. ठाकरे गटाला मशाल आणि शिंदे गटाला ढाल-तलवार हे चिन्ह देण्यात आलं.दोन्ही गटांकडून कागदपत्र दिल्यानंतर निवडणूक आयोगात या कागदपत्रांची छाननी केली जाईल, त्यानंतर निवडणूक आयोग गरज पडली तर संबंधित व्यक्तींना बोलवूनही घेऊ शकते. राज्यातल्या महापालिका निवडणुका पेंडिंग आहेत, त्यामुळे निवडणूक आयोगाने निकाल दिला नाही तर या निवडणुका दोन्ही पक्षांना मशाल आणि ढाल-तलवार यावर लढवाव्या लागू शकतात.

खासदार अमोल कोल्हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार! ; राष्ट्रवादीवर नाराज असल्याच्या चर्चा ; राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरासाठी होते गैरहजर

वेध माझा ऑनलाइन - राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशा चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू आहेत. अमोल कोल्हे राष्ट्रवादीवर नाराज असून येत्या काळात ते मोठा निर्णय घेऊ शकतात, असंही बोललं जातंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरासाठी अमोल कोल्हे गैरहजर राहिले, यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या एका निर्णयामुळे या चर्चांवर शिक्कामोर्तब झालं का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक आहेत, पण गुजरात विधानसभा निवडणुकीच्या स्टार प्रचारक यादीतून अमोल कोल्हे यांचं नाव वगळण्यात आलं आहे, यानंतर अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सगळं काही आलबेल नसल्याच्या चर्चा आणखी वाढल्या आहेत.
मागच्या 3 वर्षात अमोल कोल्हे मतदारसंघात वेळ देत नाहीत, असा आरोप होत आहे, त्यातच मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या काही वरिष्ठ नेत्यांना त्यांच्या सेलिब्रिटी असल्यामुळेही अडचण होत असल्याचं बोललं जातं, त्यामुळे अमोल कोल्हे यांना मतदारसंघात विरोधकांसोबतच पक्षातील नेत्यांकडूनही टीकेला सामोरं जावं लागतं.
अमोल कोल्हे मधल्या काळात भाजपमधील केंद्रीय नेत्यांच्या संपर्कात असल्याने त्यांच्या भाजपसोबतच्या जवळीकीला दुजोरा मिळतोय. काहीच दिवसांपूर्वी अमोल कोल्हे यांचा शिवप्रताप गरुडझेप हा चित्रपट प्रदर्शित झाला, यावेळी ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटले. ही भेट देखील राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अनेकांना खुपली आहे. 

Wednesday, November 16, 2022

मंत्री शंभूराज देसाई यांचा वाढदिवस दणक्यात झाला ; आता..."त्या" मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियाना मंत्री देसाई काय मदत देणार ? याकडे जिल्ह्याचे लक्ष ;

वेध माझा ऑनलाइन - सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा नुकताच वाढदिवस साजरा झाला या वाढदिवसानिमित्त जंगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.दरम्यान कारखाना परिसरात या होणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने विद्युत रोषणाई करताना विजेच्या खांबावर चढलेला कारखान्यातील वीज कर्मचारी विशाल अशोक यादव याला विजेचा शॉक लागून तो खांबावरच मृत पावल्याची दुर्घटना मंगळवारी घडली होती त्यामुळे मृताच्या कुटुंबीयांना पालकमंत्री काय आणि कधी मदत देणार ? याकडेच संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आहे या मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सढळ हाताची मदत मंत्री देसाई यांच्या हस्ते लवकरात लवकर होणे गरजेचे आहे अशी चर्चा आहे

ठाकरेंना सोडून शिंदे गटात सर्वात पहिल्यांदा  गेलेले सातारा जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा मंत्री झाल्यानंतर पहिलाच वाढदिवस साजरा झाला. त्यामुळे तो दणक्यातही झाला. दरम्यान याच वाढदिवसाच्या तयारीसाठी कारखाना स्थळावर सुरू असलेल्या विद्युत रोषणाईची तयारी करत असताना कारखाना वीज कर्मचाऱ्यांचा शॉक लागून त्याठिकाणी मृत्यू झाला होता त्यांनतर, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ग्रामस्थांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता मृताच्या वारसाना मदत जाहीर केल्याशिवाय मृतदेहाचे शवविच्छेदन करू देणार नाही व  मृतेदह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याचे समजले होते दरम्यान पालकमंत्री देसाई यांनी आपला वाढदिवस दणक्यात साजरा केला आहे...आता घडलेल्या दुर्दैवी घटनेकडे व त्या दुर्दैवी कुटुंबाकडे ते कधी पाहतात ? त्या कुटुंबाला काय तातडीची मदत करतात ? हेच पहाणे गरजेचे आहे...याविषयी जिल्ह्यत चर्चाही जोरदार सुरू आहेत

जामीनावर बाहेर आलेल्या संजय राऊत यांना ईडीकडून पुन्हां नोटीस ; चौकशीसाठी हजर रहा...

वेध माझा ऑनलाइन - जामीनावर बाहेर आलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीकडून नोटीस आली आहे. चौकशीसाठी हजर राहण्याचं या नोटीसमध्ये म्हटलं आहे. विशेष पीएमएलए कोर्टातून संजय राऊत यांना जामीन देत असताना चौकशीसाठी व तपासासाठी सहकार्य करावे अशी अट ठेवण्यात आली होती. त्यामुळे पत्राचाळ प्रकरणातील तपास ईडीने अजूनही पुढे सुरू ठेवला आहे, आणि त्याच प्रकरणातील चौकशीसाठी पुन्हा एकदा संजय राऊत यांना हजर राहण्यासंबंधी नोटीस पाठवण्यात आली आहे. 18 नोव्हेंबर रोजी संजय राऊत यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. 

तब्बल 100 दिवसानंतर शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांना बुधुवारी (9 नोव्हेंबर 2022) कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला होता. आता ईडीनं चौकशीसाठी संजय राऊत यांना पुन्हा नोटीस पाठवली आहे. 18 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस ईडीकडून राऊतांना पाठवण्यात आली आहे. त्याशिवाय संजय राऊत यांचा जामीन रद्द करावा, अशी याचिका ईडीनं कोर्टात केली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांच्या जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट...

वेध माझा ऑनलाइन - सामान्य कार्यकर्ता व पदाधिकारी हीच खरी भाजपची ताकद आहे, पक्ष नेहमीच त्यांच्या पाठिशी ठामपणे उभा राहिला, पालिका निवडणुकीत ती ताकद दाखवून विजय खेचून आणण्यासाठी सज्ज राहा, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेकऱ बावनकुळे यांनी केले.प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी शहराध्यक्ष एखनाथ बागडी यांनी बावनकुळे यांचा शाल,. श्रीफल देवून सत्कार केला यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील,  प्रदेश सचिव विक्रम पावसकर, ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा लोकसभा प्रभारी अतुल भोसले, सौ. सुमन बागडी, प्रमोद शिेद, प्रशांत कुलकर्णी उपस्थीत होते.

 बावननकुळे म्हणाले, कार्यकर्ते हीच पक्षाची ताकद आहे. कार्यकर्त्यांनीही पक्षाची सारी ध्येय धोरणे सामान्यपर्यंत पोचवली पाहिजेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या योजना अधिकाधिक लोकापर्यंत पोचविण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीकडे वाटचाल करत आहे. केवळ भारतच नव्हे तर जगातील १५० देशांनी त्यांना आपला नेता मानले आहे. जगभरात विश्वगुरु म्हणून त्यांना ओळखले जात असून, येत्या काळात जगाचे नेतृत्व भारताकडे राहणार आहे. यासाठी आपण सर्व समाजबांधवांनी आपल्या कुटुंबातील मुलांना उच्चशिक्षित करुन, त्यांना देशविकासात योगदान देण्यासाठी तयार करावे. यावेळी जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांचेही भाषण झाले. श्री.बागडी यांनी आभार मानले.



निवडणूक आल्याने आता पप्प्या घेणे मिठ्या मारणे असे प्रकार साताऱ्यात सुरू होतील- आ शिवेंद्रसिंहराजे यांची उदयनराजेंवर टीका...

वेध माझा ऑनलाईन - पालिका निवडणुक आली की सातारकरांना आम्ही कशी पालिका चांगली चालवली हे सांगतील आणि पुन्हा निवडून द्या म्हणतील. परंतु सध्याच्या मुलभुत प्रश्नांकडे जाणिवपुर्वक सातारा विकास आघाडी आणि त्यांचे नेते लक्ष देत नसल्याची टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी खासदार उदयनराजे भाेसले यांच्यावर केली.दरम्यान,.. निवडणूक आल्याने आता सातारकरांना मिठ्या मारणे, पप्प्या घेणे असे प्रकार पुन्हा साता-यात सुरु हाेतील अशी टीका देखील यावेळी शिवेंद्रसिंहराजे यांनी उदयनराजेवर केली 

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले माध्यमांशी बाेलत हाेते. ते म्हणाले सातारा पालिकेत सध्या प्रशासक आहे. परंतु सत्तेत असलेली सातारा विकास आघाडी सध्या काेणत्याही मुलभूत प्रश्नांकडे लक्ष देत नाही दरम्यान या टिकेवर आता उदयनराजे भाेसले काय उत्तर देतात हेच पाहायचे आहे.

Tuesday, November 15, 2022

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन पुन्हा जाणार गुवाहाटीला...काय आहे बातमी.....

वेध माझा ऑनलाईन - महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरचे नाटक अजून कोणीही विसरले नसताना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या आमदारांना घेऊन पुन्हा गुवाहाटी येथे जाणार आहेत. गुवाहाटीतील एका हॉटेलमध्येच राज्यातील सत्तानाट्य घडले होते. येत्या 21 नोव्हेंबर रोजी पुन्हा सर्व आमदार, एकनाथ शिंदेंसह गुवाहाटीला जाणार असल्याचे निश्चित झाले आहे.

सत्तांतराच्या काळात मुख्यमंत्री शिंदेनी कामाख्या देवीच्या दर्शनाला जाऊन मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा दर्शनाला येईन, असा नवस देवीला बोलला होता. त्यामुळेच मुख्यमंत्री सर्व खासदार आमदार आणि पदाधिकाऱ्यांना घेऊन कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहे. हा एक दिवसाचा हा दौरा असेल. दौऱ्यासाठी पूर्वतयारी सुरू करण्यात आली असून, सर्वांना याबद्दल सूचना देण्यात आल्या आहेत.

शेतकऱ्यासमोरच बिबट्याने पाडला शेळीचा फडशा : - ढेबेवाडी जवळील वाजोली येथील घटना

वेध माझा ऑनलाइन - ढेबेवाडी जवळील वाजोली येथे शेतकऱ्यासमोरच बिबट्याने शेळीचा फडशा पाडल्याची घटना घडल्याने त्याठिकाणी बिबट्याचा वाढता उपद्रव आता स्पष्ट झाला आहे  त्याठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने बिबट्याच्या बंदोबस्तासाठी ग्रामस्थांनी वनविभागाला साकडे घातले आहे

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार ढेबेवाडी विभागातील वाजोली येते शेतकऱ्यांसमोरच बिबट्याकडून शेळीवर हल्ला झाला.. या हल्ल्यात शेळी ठार झाल्याची घटना घडली वाजोली येथील शिंगणी नावाच्या शिवारानजीकच्या डोंगरात नेहमीप्रमाणे काही शेतकरी जनावरे चरण्यासाठी घेऊन गेले होते दुपारी तीनच्या सुमारास झुडपात दबा भरून बसलेल्या बिबट्याने अंजना आचरे यांच्या शेळीवर अचानक हल्ला केला शेतकऱ्यांसमोर हा प्रकार घडल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर शेळीला तेथेच टाकून बिबट्या पळून गेला या घटनेत शेळीचा मृत्यू झाला असून घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल एल व्ही पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुभाष राऊत मुबारक मुल्ला पोलीस पाटील विजय सुतार माजी सरपंच अशोक मोरे शिवाजी मोरे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे नुकसानग्रस्त शेतकरी महिलेला वनविभागाने तातडीने मदत देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली असून पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणीही करण्यात आली आहे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अशोक मोरे यांनी बिबट्याच्या उपद्रवात मोठी वाढ झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत पीक राखणीला जाणारे शेतकरी धास्तावले आहेत तरी वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे

अबू आझमी यांच्याशी संबंधित तब्बल ३० ठिकाणी प्राप्तीकर विभागाच्या धाडी ; सहा शहरांमधील मालमत्तांवर धाडी...

वेध माझा ऑनलाइन -  आज दुपारच्या सुमारास अबू आझमी यांच्याशी संबंधित तब्बल ३० ठिकाणी प्राप्तीकर विभागानं धाडी टाकल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना सुरूवात झाली आहे. मुंबईसह देशभरातील एकूण सहा शहरांमध्ये या धाडी टाकण्यात आल्या आहेत.

अबू आझमी, त्यांचे निकटवर्तीय दिवंगत गणेश गुप्ता आणि त्यांच्या पत्नी आभा गणेश गुप्ता यांच्या काही मालमत्तांवर प्राप्तीकर विभागानं धाड टाकली आहे. बेहिशेबी मालमत्ता, गुंतवणूक आणि काळा पैसा यासंदर्भात या धाडी प्राप्तीकर विभागानं टाकल्याची माहिती समोर येत आहे. अबू आझमी समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असताना आभा गुप्ता या पक्षाच्या सचिव होत्या.

सहा शहरांमधील मालमत्तांवर धाडी
या सगळ्या धाडींना आभा गुप्ता आणि अबू आझमी यांच्या कुलाब्यातील कमल मॅन्शनमधील कार्यालयांपासून सुरुवात झाली. देशभरातील एकूण ३० ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये मुंबईसह वाराणसी, कानपूर, दिल्ली, कोलकाता आणि लखनौ या शहरांचा समावेश आहे.
वाराणसीमधील विनायक निर्माण लिमिटेड या कंपनीवर प्राप्तीकर विभागानं धाड टाकली आहे. आभा गुप्ता यांनी त्यांची बेहिशेबी मालमत्ता या कंपनीत गुंतवल्याचा प्राप्तीकर विभागाला संशय आहे. शिवाय, कोलकात्यामध्ये धाड टाकण्यात आलेल्या कार्यालयाच्या ऑपरेटरचा वापर हवाला मार्गाने पैशांचे व्यवहार करण्यासाठी केला जात असल्याचाही विभागाला संशय आहे. याशिवाय, वाराणसीमधील विनायक रिअल इस्टेट या कंपनीवरही प्राप्तीकर विभागाला संशय असल्याची माहिती इंडिया टुडेनं सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.



 

धनुष्यबाण चिन्हबाबत मोठा निर्णय ; उद्धव ठाकरेना मोठा धक्का

वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंधित सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना पक्षाचे नाव, चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी उद्धव ठाकरेंची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर पक्षचिन्हावर दोन्ही गटांनी दावा केला होता. आता याबाबत निवडणूक आयोगाने निर्णय घेत धनुष्यबाणाचं चिन्हच गोठवलं. याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने न्यायालयात धाव घेत शिवसेना कोणाची हे ठरेपर्यंत शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं नंतर शिवसेना पक्षाचे नाव, चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उद्धव ठाकरेंनी दाखल केली होती. ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे.

बाल दिनाचे औचित्य साधून कराड रोटरी क्लबच्या वतीने विविध उपक्रम साजरे ;

वेध माझा ऑनलाइन -  बाल दिन 14 नोव्हेंबरला साजरा केला जातो. बालदिनाचे औचित्य साधून कराड रोटरी क्लबच्या वतीने   विविध उपक्रमांचे विविध ठिकाणी आयोजन करण्यात आले होते

अर्थमित्र रविंद्र देशमुख आणि आय सी आय सी आय म्युच्युअल फंड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा, दक्षिण तांबवे याठिकाणी निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन कऱण्यात आले होते . या स्पर्धेमधून प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांना प्रमाणपत्र देण्यात आली.  

याप्रसंगी रोटरी क्लब कराडचे सेक्रेटरी चंद्रशेखर पाटील, लिटरसी डायरेक्टर गजानन माने, प्रोजेक्ट चेअरमन रविंद्र देशमुख, शिवराज माने, राजेंद्र कुंडले, अनघा बर्डे व सुप्रित यादव व शाळेचे शिक्षक,कर्मचारी उपस्थित होते. 
नगरपालिका शाळा क्र. ७ व अगंणवाडी क्र.८० येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. याठिकाणी बालरोग तज्ञ डॉ. मनोज जोशी यांनी ६० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली यावेळी राजीव खलीपे व शाळेचे शिक्षक,कर्मचारी उपस्थित होते. तसेच कै.काशिनाथ नारायण पालकर प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले . या शिबिरामध्ये बालरोग तज्ञ डॉ. श्रुती शहा  यांनी ४५ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली  यावेळी शाळेच्या संचालिका सौ.वैशाली पालकर, सौ सीमा पुरोहित तसेच शाळेचे शिक्षक,कर्मचारी उपस्थित होते.