Thursday, November 3, 2022

सातबारा उतारा देण्यासाठी लाच मागितली ; लाच स्वीकारताना तलाठ्यास अटक...

वेध माझा ऑनलाइन - माण तालुक्यातील कुळकजाई येथील तलाठी लाच घेताना रंगेहात सापडला आहे. नोंदणीकृत कुलमुखत्यार पत्र व साठे खताचे दस्ताची नोंद करून तसा सातबारा उतारा देण्यासाठी पैशाची मागणी केली होती. तलाठी यांच्या विरोधात 59 वर्षीय व्यक्तीने तक्रार केली आहे. कुळकजाई येथील तलाठी युवराज एकनाथ बोराटे (वय- 55 वर्ष, रा. धनवडेवाडी ता. माण) यांनी 4 हजार रूपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर लाच स्विकारताना तलाठ्यास रंगेहात पकडण्यात आले. 

No comments:

Post a Comment