Friday, November 4, 2022

अब्दुल सत्तारांच्या सिल्लोडमध्ये आदित्य ठाकरेंच्या सभेला परवानगी ; वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन - शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सिल्लोडच्या सभेला अखेर परवानगी मिळाली आहे. पण ही सभा नियोजित ठिकाणी होणार नसून त्याचं ठिकाण बदलण्यात आलं आहे. आदित्य ठाकरे यांची 7 नोव्हेंबर रोजी होणारी सभा ही सिल्लोडच्या आंबेडकर चौकाजवळील मोकळ्या जागेत होणार आहे. 

शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांची एकाच दिवशी म्हणजे 7 नोव्हेंबर रोजी सिल्लोडमध्ये जाहीर सभा होणार आहे. सिल्लोड हा मतदारसंघ शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांचा आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या या सभेची मोठी चर्चा सुरू झाली. त्यातच पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच कारण सांगत सुरुवातीला आदित्य ठाकरे यांच्या महावीर चौकात होणाऱ्या सभेला परवानगी नाकारली. पण त्याचवेळी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जिल्हा परिषदेच्या मैदानावर होणाऱ्या सभेला मात्र परवानगी देण्यात आली होती. ठाकरे गटाची यावर एकूणच अजून कोणतेही प्रतिक्रिया आलेली नाही.

 





No comments:

Post a Comment