Saturday, April 2, 2022

अल्पवयीन मुलीस देहविक्री करायला भाग पाडणाऱ्या दोघांवर कराड शहर पोलिसांकडून कारवाई...

वेध माझा ऑनलाइन - अल्पवयीन मुलीस देहविक्री करायला भाग पाडणाऱ्या दोघांवर कराड शहर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे अल्पवयीन मुलीनेच याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले

स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी ग्राहकांना अल्पवयीन मुलगी पुरवुन तिला देहविक्री करण्यास भाग पाडल्याची घटना नुकतीच उघडकीस आली असून अल्पवयीन मुलीनेच या प्रकाराची फिर्याद कराड शहर पोलीस ठाण्यात दिली यानंतर कराड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर पोलीस नाईक संजय जाधव प्रवीण पवार सागर बर्गे आसिफ जामदार दीपक कोळी ज्योति काटरे यांनी तात्काळ तपास गतिमान करत अल्पवयीन मुलीला देहविक्री करायला भाग पाडणाऱ्या विजय गणपतराव बामणे व या गुन्ह्यासाठी लॉज उपलब्ध करून देणाऱ्या महादेव परसु पवार यांच्यावर भारतीय दंड विधान कलम 370 व देहविक्री अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 चे कलम 4 व 5 अंतर्गत कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित पाटील शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित बाबर पोलीस नाईक संजय जाधव प्रवीण पवार सागर बर्गे आसिफ जामदार दीपक कोळी ज्योती काटरे यांनी केली आहे

No comments:

Post a Comment