वेध माझा ऑनलाइन - कराडच्या एसटी स्टँडची दोन वर्षात दुर्दशा झाली आहे अक्षरशः बसायला ठेवलेली तिथली बाकडी गायब झाली आहेत तर दुसरीकडे स्टॅंड परिसरात कचऱ्याचं प्रचंड साम्राज्य निर्माण झालयाचे चित्र आहे स्टँड परिसराला दारुड्यांचा अड्डा बनवल्यायचे स्वरूपही आले असल्याने मोठ्या निधीतून उभं राहिलेलं हे स्टँड सध्या दुर्दशेच्या गर्तेत अडकलं आहे
कराड हे तालुक्याचे ठिकाण आणि या ठिकाणीच मध्यवर्ती बस स्थानक आहे या बस स्थानकावर विविध ठिकाणाहून बस येत जात असतात. यामुळे या बसस्थानकावर नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते.. याच पार्श्वभूमीवर दोन वर्षांपूर्वी कराडला नवीन एसटी स्टँड बांधण्यात आले आहे या बसस्थानकावर उच्च दर्जाच्या सुविधा देण्यात आल्या होत्या चांगल्या दर्जाची बाकडे बसवण्यात आली होती यामुळे हे कराडचे बस स्थानक एक उत्तम बसस्थानक म्हणून गणले जात होते मात्र गेल्या दोन वर्षात कराडच्या या नव्या कोऱ्या बसस्थानकाची दुर्दशा झाली असून बस स्थानकावर कचर्याचे साम्राज्य पसरले आहे याबरोबरच गुटखा खाऊन थूंकणाऱ्यांनी भिंतीवर नकाशे काढले आहेत तर अत्यंत चांगल्या दर्जाची स्टीलची बाकडे गायब करण्यात आली आहेत तर उर्वरित बाकडी ही बसण्याच्या लायकीची उरलेली नाहीत बहुसंख्य बाकडी मोडक्या अवस्थेत आहेत..एवढेच नव्हे तर या स्टॅंडवर दारुड्यांचा अड्डा बनला असून हे बेवडे या स्टॅन्ड वर बसून चित्रविचित्र चाळे करताना पाहायला मिळतात याकडे कोणाचेच लक्ष नसल्याचे दिसून येत आहे दिसायला देखण असणार बसस्थानक दुर्दशेच्या गर्तेत अडकल्याने पुन्हा याठिकाणी चांगल्या पद्धतीच्या सुविधा द्या... अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे
No comments:
Post a Comment