वेध माझा ऑनलाइन - राज्याच्या गृह राज्यमंत्री ना शंभुराज देसाई यांच्या पाटण तालुक्यात आज पून्हा एका पंधरा वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना चर्चेत आली या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे कोयना नगर पोलीस स्टेशनमध्ये या गुन्ह्याची नोंद झाली आहे
याबाबत माहिती अशी की...
कोयना परिसरातील 15 वर्षीय युवतीवर अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याचे आज उघड झाले संबंधित पीडिता 9 महिन्याची गरोदर आहे या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या तालुक्यात अत्याचाराच्या घटनेचा कळस झाला आहे या तालुक्यात महिला सुरक्षित नाहीत हे आता स्पष्टच झाले आहे अत्याचाराची गुन्हेगारी याच तालुक्यात अधिक प्रमाणात वाढत असल्याने या तालुक्याचे आमदार असलेले राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार देसाई यांचा पाटण तालुक्यातील गुन्हेगारीवर आता वचकच राहिला नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेतली आहे पोलिसांनी अल्पवयीन आरोपीस अटक केली आहे त्याची बाल सुधार गृहात रवानगी करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे संपूर्ण जिल्ह्यासह या तालुक्यात सलग घडलेली ही तीसरी घटना आहे
No comments:
Post a Comment