वेध माझा ऑनलाइन - साताराजिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांना जयकुमार गोरे यांच्या बाबतीतील प्रश्न विचारताच लगेच त्यांनी विषय बदलून पलटी मारली व मी राजकारणावर बोलत नाही असे गुळगुळीत उत्तर देत वेळ मारून नेली...निमित्त होते त्यांनीच आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेचे...
दोन दिवसांपूर्वी नामदार पाटील यांनी पत्रकार परिषद बोलावली होती...त्यामधून त्यांना काही महत्वाची माहिती पत्रकारांबरोबर शेअर करायची होती, ती त्यांनी केली... नंतर पत्रकार विचारू लागलेल्या प्रश्नांची उत्तरेही ते देत होते... त्याचवेळीं त्यांना...आमदार जयकुमार गोरे भाजपचे जिल्हाध्यक्ष झाले आहेत आणि त्यांनी जिल्ह्यातील काँग्रेस- राष्ट्रवादीतील अनेकजण भाजप मध्ये आणणार असे सांगितले आहे याबाबत जिल्ह्याचे व राष्ट्रवादीचे नेते म्हणून त्यांचे मत विचारले असता त्यांनी पत्रकारांच्या लक्षात येईल इतपत विषय बदलला... व आमदार गोरे यांच्याबद्दल बोलणे टाळले...पत्रकारांना चहा दिला का...असे विषय बदलण्यासाठी त्यांनी त्यांच्या कार्यालयातील लोकांना विचारण्याची त्यावेळी औपचारिकता दाखवली... पण त्यांनी उत्तर देणे टाळले आहे हे लगेच पत्रकारांना समजले...त्यांनी याच प्रश्नावर उत्तर देणे का टाळले...? हा प्रश्न सर्वांसमोर होताच... नंतर त्यांनी स्वतःच सांगितले की मी राजकीय भाष्य करणार नाही..एकीकडे ते असे म्हणाले मात्र दुसरीकडे त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची बाजू घेत जरंडेशवर कारखान्याच्या प्रश्नावर आपले राजकीय भाष्य केले...मग जयकुमार गोरे यांच्या प्रश्नाबाबतच त्यांनी उत्तर का दिले नाही...? का टाळाटाळ केली...? याबाबत काही पत्रकारांच्यात त्यावेळी चर्चा रंगली...
जयकुमार गोरे हे जिल्ह्यातील भाजपचे आक्रमक नेते आहेत सातारा जिल्ह्यात अनेकजण भाजप मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करतील असा त्यांचा विश्वास आहे...
सातारा जिल्ह्यातील कराड उत्तर विधानसभा मतदार संघाबद्दल बोलायचे झाल्यास... कराड उत्तर चे नेते धैर्यशील कदम हे आमदार गोरे काँग्रेसमध्ये असल्यापासून त्यांचे जवळचे मानले जातात... ते सध्या शिवसेनेत आहेत... कराड उत्तरचे सध्याचे राजकारण पाहता "उत्तर' चे आणखी एक नेते मनोज घोरपडे यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठी मते घेत आपले आव्हान विरोधकांपढे निर्माण केले होते... भाजपचा "कराड उत्तर' चा चेहेरा असे त्यांना मानले जायचे... मात्र सध्या ते तुरुंगवारीत आहेत... त्यामुळे होणारी भविश्यातील "उतर'ची निवडणूक धैर्यशील कदम व नामदार पाटील यांच्यातच थेट होईल असे राजकीय भाकीत केले जात आहे... त्यामुळे यापूर्वी "तीन' उमेदवार उभे असताना होणारी मतांची विभागणी यापुढे होण्याची शक्यता नाही... शिवाय आमदार गोरे यांच्या नेतृत्वाखाली कदम भाजप मध्ये प्रवेशकर्ते झाले तर ही निवडणूक नाराज लोकांना हाताशी धरून तगडा विरोध करत ते लढू शकतात... असे राजकीय जाणकार सांगतात... त्याची सुरुवात जयकुमार गोरे त्यांच्या नेतृत्वाखाली धैर्यशील कदम भाजपमध्ये आल्यानंतर होईल...अशीही चर्चा उत्तरेत आहे... यामुळेच यापुढे होणारे हे सगळेच राजकारण आतापासूनच अंगावर ओढून घ्यायला नको कदाचित या उद्देशाने जयकुमार गोरेबाबत विचारलेल्या प्रश्नावर बाळासाहेब पाटील यांनी उत्तर देणे टाळले असावे... अशी काही पत्रकारांच्यात चर्चा होती...असो... चर्चा तर होणारच !!
No comments:
Post a Comment