वेध माझा ऑनलाइन -
ठाण्यात ९ एप्रिल रोजी होणारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यातील गडकरी रंगायतन समोरील डॉ मुस रोड येथील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र, बंदिस्त सभागृहात किंवा खुला मैदानात सभा घेतली तरच परवानगी मिळणार असा पर्याय पोलीसांनी सुचवला आहे. याबाबत मनसे नेते बाळा नांदगावकर पोलीस आयुक्त जयजीत सिंघ यांची भेट घेणार आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ठाण्यातील ९ एप्रिल रोजी होणाऱ्या उत्तर सभेचे भवितव्य उद्या ठरणार आहे. मात्र ठाण्यातील गडकरी रंगायतन समोरील डॉ मुस रोड या ठिकाणी ठाकरे यांची सभा होणार होती. मात्र ठाणे पोलिसांनी रस्त्यावर होणाऱ्या अडथळे आणि वाहतूक कोंडीचे कारण देत रस्त्यावर सभेला परवानगी नाकारली आहे. शहरातील इतर ठिकाणी बंदीस्थ सभागृहात किंवा खुल्या मैदानात सभा घेण्याचा सूचना ठाणे पोलिसांनी मनसे पद्धाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
दरम्यान, शहरातील राज ठाकरे यांच्या होणाऱ्या सभेला परवानगी देण्यात यावी अशी मागणी करत उद्या मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे पोलीस आयुक्त जयजीत सिंघ यांची भेट घेतल्यानंतर सभेचे ठिकाण ठरणार आहे. सभेच्या पूर्वी गडकरी रंगायतन समोरील डॉ मुस रोड ची मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी आज जागेची पाहणी केली होती.
No comments:
Post a Comment