Wednesday, April 6, 2022

मोदींशी भेट कशासाठी ? ; पवारांनी केलं स्पष्ट...

वेध माझा ऑनलाइन - राष्ट्रावादीचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची संसद भवनात भेट घेतली. त्यांनतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. भेट नक्की कोणत्या कारणामुळे झाली, भेटीत नक्की काय झाले? असे प्रश्न सर्वांना पडले होते. परंतु आता शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. यावेळी त्यांनी संजय राऊतांच्या कारवाईवरही पंतप्रधानांशी चर्चा झाल्याचे पवारांनी सांगितले. त्याचबरोबर अनेक दिवसांपासून प्रलंबीत असलेल्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा प्रश्नही पंतप्रधानांच्या कानावर टाकल्याचे शरद पवार म्हणाले.

''कारवायांविरोधात आम्ही लढा देत राहू''

मागच्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांवर ईडी, सीबीआय, आयटी यांची कारवाई होत आहे. ही कारवाई राजकीय हेतूपोटी केली जात असल्याची टीका राज्यातील सत्ताधारी नेते करत आहेत. आज झालेल्या भेटीत शरद पवार या कारवायांविषयी पंतप्रधानांशी बोलले असतील अशी चर्चा होती, परंतु महाराष्ट्रातील कारवायांविरोधात पंतप्रधानांशी कुठलीही चर्चा न झाल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केले आहे. आणि पुढे ते म्हणाले की केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात राष्ट्रवादी- शिवसेनेने आवाज उठवला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या विरोधात आम्ही असाच लढा देत राहू असंही शरद पवार म्हणाले.

संजय राऊतांवर कारवाई करायची काय गरज होती? असा सवाल करत आपण आज पंतप्रधानांशी केवळ १२ आमदाराच्या प्रश्नावर चर्चा केली असून ते विचार करुन निर्णय घेतील असं वक्तव्य शरद पवारांनी केलं आहे. मात्र यावेळी नवाब मलिकांवरील कारवाईवर कोणतीही चर्चा झाली नसल्याचही शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. ते पुढे म्हणाले राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजपविरोधात उभी आहे. आम्ही कधीच भाजप सोबत नव्हतो असंही पवार म्हणाले

No comments:

Post a Comment