वेध माझा ऑनलाइन - कराड तालुक्यातील येणके गावात यापुढच्या सर्व निवडणुका बिनविरोध करण्याचा ऐतिहासिक निर्णय येणके ग्रामस्थांनी घेतला आहे या अगोदर झालेल्या ग्रामपंचायत व विकास सोसायटीची निवडणूक देखील ग्रामस्थांनी बिनविरोध केली आहे...
कराड तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून येणके हे गाव ओळखले जाते गावाची निवडणूक म्हटलं की आडवायच आणि जिरवायच राजकारण आलच! यामुळे प्रत्येक निवडणुकीच्या वेळी गावचे वातावरण हे तापलेले असायचे वाद विकोपाला जायचे मात्र माघार घेतली जायची नाही.. गावातली शांतता भंग होण्यापेक्षा गावात शांतताच कायमस्वरूपी नांदली पाहिजे या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ ग्रामस्थ युवावर्ग एकत्र आले आणि त्यांनी इथून पुढे गावच्या निवडणुका बिनविरोध घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला गेल्या तीस वर्षात पहिल्यांदाच ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात ग्रामस्थांना यश आले तर 25 वर्षात पहिल्यांदाच विकास सोसायटी बिनविरोध पार पडली यासाठी गावातले सर्व पक्षीय कार्यकर्ते ग्रामस्थ एकत्र आल्याचे दिसून आले नुकत्याच झालेल्या विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी राहुल गरुड तर व्हाइस चेअरमन पदी रामभाऊ कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.. निवडणुका बिनविरोध करण्यासाठी गावच्या हनुमान मंदिरात ग्रामस्थांच्या बैठका झाल्या खलबते झाली आणि गाव करील ते राव काय करील या उक्तीप्रमाणे ग्रामस्थांच्या बैठकींना यश आलं आणि येणके ग्रामस्थ म्हणाले आता आमचं ठरलंय.. यापुढे गावात निवडणूकच होणार नाही..
No comments:
Post a Comment