वेध माझा ऑनलाइन - कराड नगर पालिकेने कारवाई अंतर्गत जप्त केलेल्या सिंगल युज प्लास्टिक पासून तसेच शहरातून जमा केलेल्या प्लास्टिकच्या माध्यमातून चक्क विश्रांती ची 34 बाकडी तयार केली आहेत हे बनवण्याची संकल्पना मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची आहे तसेच 14 ट्री गार्डही पालिकेला यातून उपलब्ध झाले आहेत
पालिकेने कारवाई करत जप्त केलेले प्लास्टिक तसेच शहरातून संकलित झालेल्या कचऱ्यातून मिळालेले प्लॅस्टिक असे एक टन प्लॅस्टिक पालिकेकडे जमा झाले होते या प्लास्टिकच्या माध्यमातून पालिकेने टाकाऊतून टिकाऊ व मजबूत वस्तू बनवण्याची संकल्पना उत्तम प्रकारे राबवली होती प्लास्टिक मधूनही असंच काहीतरी बनवण्याची संकल्पना मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना सुचल्याने त्यांनी चंद्रपूर येथील कंपनीच्या मदतीने कचऱ्यातील प्लास्टिक मधून सुंदर बाकडी आणि ट्री गार्ड बनवले विशेष म्हणजे हे आकर्षक विश्रांती बाकडे पाहिल्यानंतर याची निर्मिती कचऱ्यातून मिळालेल्या प्लास्टिक पासून झाली आहे यावर विश्वासच बसत नाही .. पालिकेने या अगोदरही टाकाऊतून टिकाऊ उपक्रमांतर्गत अनेक वस्तूंची निर्मिती केली आहे
प्लॅस्टिक रिसायकल करून असे बाय प्रोडक्ट तयार करण्याबाबत स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत पालिकेला सक्तीचे आहे त्याला मार्क्स आहेत म्हणून कराड पालिकेच्या एकूण 14 वार्डात प्लास्टिक पासून तयार केलेली बाकडी आपण त्याठिकाणी लावली आहेत
मुख्याधिकारी
रमाकांत डाके
No comments:
Post a Comment