Monday, June 20, 2022

महाविकास आघाडीचे अनेक आमदार फुटले असल्याचं वृत्त ; शिवेसेनेचे 11 आमदार सध्या गुजरातच्या सूरतमध्ये ; आमदार भाजपच्या संपर्कात ; गुजरातचे गृहमंत्री सुरतचे भाजपचे आमदार हर्ष सांघवी हे या आमदारांसाठी सर्व नियोजन करत असल्याचं वृत्त ;

वेध माझा ऑनलाइन - विधान परिषद निवडणूक निकालानंतर राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. या निकालानंतर महाविकासआघाडीला मोठा धक्का बसला आहे. सोबतच शिवसेनेचे दोन उमेदवारही अगदी काठावर पास झाले आहेत. महाविकासआघाडीचे अनेक आमदार फुटले असल्याचं समोर आलं आहे. अशात आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवेसेनेचे 11 आमदार सध्या गुजरातच्या सूरतमध्ये आहेत.

यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हे आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचं समोर आलं आहे. गुजरातचे गृहमंत्री असलेले सुरतचे भाजपचे आमदार हर्ष सांघवी हे या आमदारांसाठी सर्व नियोजन करत असल्याचं समोर आलं आहे. सांघवी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत. हे सर्व आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचंही समोर आलं आहे.

No comments:

Post a Comment